Karmyogee – Karmayogeee https://karmyogee.com Amadar Shivajirao Patil Mon, 07 Sep 2026 18:52:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1 https://karmyogee.com/wp-content/uploads/2026/06/cropped-Karmayogi-Logo-92x92.jpg Karmyogee – Karmayogeee https://karmyogee.com 32 32 https://karmyogee.com/Karmyogee/2581/ https://karmyogee.com/Karmyogee/2581/#respond Mon, 07 Sep 2026 18:51:59 +0000 https://karmyogee.com/?post_type=docs&p=2581 Read more at Karmayogeee

]]>
karmayogi web 001

Read more at Karmayogeee

]]>
https://karmyogee.com/Karmyogee/2581/feed/ 0
पद आणि प्रतिष्ठा https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%aa%e0%a4%a6-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a0%e0%a4%be/ https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%aa%e0%a4%a6-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a0%e0%a4%be/#respond Mon, 08 Jun 2026 18:16:47 +0000 https://karmyogee.com/?post_type=docs&p=2545 Read more at Karmayogeee

]]>
शिवाजीराव पाटील तथा दादांनी विविध भूमिकेतून केलेली जनसेवा 

आमदार, विधान परिषद महाराष्ट्र राज्य 

अध्यक्ष: 

महाराष्ट्र टी.डी.एफ., मुंबई. 

पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महासंघ (विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र). 

उपाध्यक्षः 

रयत शिक्षण संस्था, सातारा. 

ऑल इंडिया फेडरेशन ऑफ हेडमास्टर्स असोसिएशन्स, पुणे. महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना मेळावा. 

कार्याध्यक्षः 

महाराष्ट्र शैक्षणिक व्यासपीठ. (अध्यक्ष, देवीसिंग शेखावत अमरावती) 

सदस्य: 

महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय व शिक्षक समन्वय समिती महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व मार्गदर्शन संस्था. 

महाराष्ट्र राज्य ग्रंथालय समिती 

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे 

महाराष्ट्र राज्य शिक्षण सुधार राज्य सल्लागार समिती. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (एस. एस. सी. बोर्ड) पुणे. 

पुणे विद्यापीठ विधीसभा, 

पुणे जाईंट कौन्सिल, शिक्षण खाते – महाराष्ट्र राज्य. 

विभागीय अध्यक्ष 

राज्य परिवहन महामंडळ, पुणे विभाग 

रयत शिक्षण संस्था सातारा: 

उपाध्यक्ष, रयत शिक्षण संस्था, सातारा 

जनरल बॉडी सदस्य 

आजीव सभासद, रयत शिक्षण संस्था सातारा 

अध्यक्ष, आजीव सभासद मंडळ, रयत शिक्षण संस्था सातारा 

इन्स्पेक्टर रयत शिक्षण संस्था, उत्तर विभाग अहमदनगर मॅनेजिंग कौन्सिल सदस्य 

दादांचा मुख्याध्यापक संघाचा संघटनात्मक कार्याचा तपशीलः 

१. १९७६ ते १९७८ सेक्रेटरी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा 

मुख्याध्यापक सह महामंडळ, 

२. १९८२ ते १९८४ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा 

मुख्याध्यापक महामंडळ. 

३. १९७८ ते १९८३ अध्यक्ष, पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा 

मुख्याध्यापक संघ. 

४. २० जून १९७३, सायन, मुंबई येथे मुख्याध्यापक भवनासाठी रिकामा प्लॉट 

मिळविण्यात यश. 

५. ३० सप्टेंबर, १९७३ सायन, मुंबई येथे मुख्याध्यापक भवन बांधकाम करण्याचे 

ठरले. 

६. १६ ऑक्टोबर, १९७७ मुख्याध्यापक महामंडळाचे वार्तापत्र असलेल्या महाराष्ट्र 

जर्नलचा रौप्य महोत्सव समारंभ पुणे येथे संपन्न 

७. १७ डिसेंबर, १९७७ श्री. शिवाजी मराठा हायस्कूल पुणे, येथे संपाची रूपरेषा 

ठरविण्यासाठी कौन्सिल सभा. 

८. ०६ नोव्हेंबर, १९७७ मुख्याध्यापक महामंडळाच्या मुख्याध्यापक भवन बांधकाम 

समितीमध्ये दादांचा समावेश. 

९. ११ नोव्हेंबर १९७८ दादांच्या नेतृत्वाखाली मुख्याध्यापक महामंडळाची स्वतंत्र 

घटना समिती नेमून नवीन घटना तयार करण्यात आली. 

१०. १९७८, सायन, मुंबई येथे मुख्याध्यापक भवनाच्या तीन मजली इमारतीचे 

बांधकाम पूर्ण. 

११. २३ डिसेंबर, १९७९ नागपूर येथे मुख्याध्यापक महामंडळाच्या ३५ जिल्ह्यांच्या 

कौन्सिल सदस्यांची सभा. 

१२. २६ ऑक्टोबर, १९८० साधना विद्यालय हडपसर पुणे येथे माध्यमिक शिक्षक 

कायदा अनुषंगाने सेवाशर्ती नियमावली यासाठी नेमलेल्या ९ जणांच्या समितीमध्ये दादांचा समावेश. 

१३. ०५ ऑक्टोबर, १९८० महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन शिक्षण संचालक मा. व्ही. 

व्ही. चिपळूणकर ह्यांच्यासमवेत साधना विद्यालय हडपसर, पुणे येथे शैक्षणिक प्रश्नांबाबत चर्चा, विचारविनिमय, 

१४. २५ ऑगस्ट, १९८२ राज्यातील मुख्याध्यापक संघाचे सेक्रेटरी व पदाधिकारी 

ह्यांच्यासमवेत राज्यातील शैक्षणिक प्रश्नाबाबत चर्चासत्र 

१५. ०९ सप्टेंबर, १९८२ कोल्हापूर येथे मुख्याध्यापक महासंघाच्या राज्यस्तरीय 

अधिवेशनाचे आयोजन. 

१६. ०१ मार्च, १९८३ पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महासंघाच्या कार्यालयाचे कुलगुरु मा. राम जोशी यांच्या शुभहस्ते उद्घाटन १७. ०७ ऑगस्ट १९८३ मुलींना मोफत शिक्षण मिळण्यासाठी मुख्याध्यापक 

महासंघाची सभा 

१८. १० ऑगस्ट १९८३. राज्यातील शैक्षणिक धोरण व प्रश्नांबाबत तत्कालीन 

शिक्षणमंत्र्याशी चर्चा 

१९. ०९ सप्टेंबर १९८३, जामनेर जि. जळगाव येथे राज्य कार्यकारिणी कौन्सिल 

सभे प्रसंगी मुख्याध्यापकांना मार्गदर्शन. 

२०. १७ जानेवारी, १९८४ मा. शिक्षण संचालक तंत्रशिक्षण, प्रशिक्षण संचालनालय, 

मुंबई येथे मुख्याध्यापक महासंघाच्या सभेत शिक्षणातील अडीअडचणी 

मागण्या व समस्यांवर समाधानकारक चर्चा होऊन महासंघाचे उपोषण मागे घेण्यात आले. 

२१. १२ फेब्रुवारी, १९८४ एस. एस. सी. बोर्ड परीक्षेसाठी खाजगीरीत्या बसणारे विद्यार्थी, त्यांची परीक्षा व प्रवेश ह्याबाबत शिक्षण मंडळाचे चेअरमन मा. महाजनसाहेब ह्यांचेसोबत चर्चा. 

२२. १६ मार्च, १९८४ मुख्याध्यापक महासंघ व शासकीय कर्मचाऱ्यांच्या 

संघटनांबरोबर समन्वय समिती स्थापन करण्यात आली. तसेच सन १९७० ते १९८४ पर्यंत राज्य मुख्याध्यापक महासंघाच्या अधिवेशनात सादर केलेले शोधनिबंध एकत्रित करून त्यांची एक पुस्तिका दादांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली. 

Read more at Karmayogeee

]]>
https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%aa%e0%a4%a6-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a0%e0%a4%be/feed/ 0
विधानपरिषदेतील शोक प्रस्ताव https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%95-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%8d/ https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%95-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%8d/#respond Mon, 08 Jun 2026 18:15:48 +0000 https://karmyogee.com/?post_type=docs&p=2543 Read more at Karmayogeee

]]>
कै. शिवाजीराव मारुतराव पाटील, माजी विधानपरिषद सदस्य 

१. श्री. एकनाथ खडसे (विधानपरिषद सभागृह नेता व महसूल मंत्री) 

सभापती महोदय, शिवाजीराव मारुतराव पाटील, माजी विधानपरिषद सदस्य यांच्या निधनाबद्दल मी खालील शोक प्रस्ताव मांडतो. कै. शिवाजीराव मारुतराव पाटील यांचा जन्म १२ नोव्हेंबर, १९२९ रोजी बुलढाणा जिल्हयातील खामगाव येथे झाला. त्यांचे शिक्षण बी. ए. बी. टी पर्यंत झाले होते. 

कै. शिवाजीराव पाटील यांनी अनेक वर्षे रयत शिक्षण संस्थेमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अध्यापनाचे कार्य केले. या काळात त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने महाळुंगे पडवळ व हडपसर, जिल्हा पुणे तसेच विंचूर, जिल्हा नाशिक येथे माध्यमिकशाळांच्या इमारती उभ्या केल्या. तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिकपरीक्षा मंडळ, पुणे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे व महाराष्ट्र राज्य शिक्षण सुधार सल्लागार समितीचे सदस्य, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, पुणे विद्यापीठाच्या विधीसभेचे सदस्य, ऑल इंडिया फेडरेशन ऑफ हेडमास्टर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ व महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही उत्तम कार्य केले होते. पुणे जिल्हयातील अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. 

कै. शिवाजीराव पाटील १९८४ मध्ये पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून महाराष्ट्र विधानपरिषदेवर निर्वाचित झाले होते. अशा ज्येष्ठ समाजसेवकाचे मंगळवार दिनांक ९ जून, २०१५ रोजी दुःखद निधन झाले. 

२. श्री. धनंजय मुंडे ( विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधानपरिषद) सभापती महोदय, सभागृहाचे नेते माननीय मंत्री श्री. एकनाथ खडसे यांनी श्री. शिवाजीराव मारुतराव पाटील, माजी विधानपरिषद सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल जो शोक प्रस्ताव मांडलेला आहे त्याला पाठींबा देऊन, त्यावर माझे विचार मांडण्यासाठी मी उभा आहे. 

कै. शिवाजीराव मारुतराव पाटील हे या सभागृहाचे माजी सदस्य होते. आपण त्यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या ज्येष्ठ मार्गदर्शकाला मुकलो आहोत. रयत शिक्षण संस्थेमध्ये अध्यापनाचे कार्य करण्याबरोबरच ग्रामस्थांच्या मदतीने महाळुंगे पडवळ व हडपसर, जिल्हा पुणे तसेच नाशिक जिल्हा येथे शाळांच्या उभारणीचे फार मोठे काम त्यांनी केले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा परीक्षा मंडळ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे, महाराष्ट्र राज्य शिक्षण सुधार सल्लागार समितीचे सदस्य, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, पुणे विद्यापीठाच्या विधीसभेचे सदस्य म्हणून विविध शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कम केले. विधानपरिषदेत शिक्षक व शिक्षणाच्या प्रश्नांबाबत ते नेहमी पोटतिडकीने भांडत होते. शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या अशा या ज्येष्ठ सदस्यांना मी विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता या नात्याने सर्व विरोधी पक्षांच्यावतीने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या सर्व दिवंगत नेत्यांच्या आत्म्यांस चिरशांती लाभो एवढी प्रार्थना करतो. धन्यवाद ! 

३. श्री. माणिकराव ठाकरे (विधानसभेने निवडलेले) 

सभापती महोदय, सदनाच्या सन्माननीय नेत्यांनी सदनात मांडलेल्या शोकप्रस्तावावर भावना व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे. 

सभापती महोदय, कै. शिवाजीराव मारुतराव पाटील, माजी विधानसभा सदस्य. त्यांचे शिक्षण बी. ए. बी. टी. पर्यंत झाले होते. ते शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर १९८४ मध्ये निवडून आले होते. त्या सहा वर्षांच्या काळातील दोन तीन वर्षांच्या कालावधीत मी विधानसभेचा आमदार होतो. ते अत्यंत अभ्यासू आमदार असल्यामुळे त्यांचे नाव सभागृहाच्या बाहेर आम्हाला व लोकांना चांगले परिचित होते. त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने कामे केली होती. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यादानाचे काम केले होते. नाशिक जिल्हयात त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारची माध्यमिक शाळा उभारली आहे. अशाप्रकारे राज्यातील चांगले नेतृत्व आपल्या दृष्टीआड झाले आहेत. त्यांचे दुःख आम्हा सर्वांना होत आहे. 

सदनाचे नेते माननीय श्री. एकनाथराव खडसे यांनी जो शोक प्रस्ताव मांडला आहे. त्या प्रस्तावाला मी पाठिंबा देतो. माझ्यावतीने माझ्या पक्षांच्या वतीने माझ्या पक्षातील सर्व सन्माननीय सदस्यांच्यावतीने मी कै. शिवाजीराव मारुतराव पाटील आदरांजली अर्पण करतो. व माझे भाषण संपवितो. 

४. श्री. भाई जगताप (मुंबई स्थानिक प्राधिकारी संस्था) 

सभापती महोदय, नियमाला अपवाद करुन आज आपण मला शोक प्रस्तावावर बोलण्याची संधी दिली आहे. त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. 

कै. शिवाजीराव पाटील सन १९८४ मध्ये पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून महाराष्ट्र विधानपरिषदेवर निर्वाचित झाले होते. त्यांचे मंगळवार दिनांक ९ जून २०१५ रोजी दुःखद निधन झाले. मी सर्व दिवंगत सदस्यांना माझ्या कुटुंबीयांच्यावतीने व माझ्या पक्षाच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करतो व माझे दोन शब्द संपवितो. 

५. प्रा. जोगेंद्र कवाडे (नामनियुक्त) 

सभापती महोदय, सभागृहाचे नेते मा. श्री. एकनाथराव खडसे साहेबांनी कै. शिवाजीराव मारुतराव पाटील यांच्या दुःखद निधनाबद्दल जो शोक प्रस्ताव मांडलेला आहे. त्यावर बोलण्यासाठी मी उभा आहे. 

कै. शिवाजीराव पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य केलेले आहे. त्यांनी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून कार्य केले होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कै. शिवाजीराव पाटील यांनी फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन शैक्षणिक क्षेत्रात गौरवास्पद कार्य केलेले आहे. ते आज आपल्यातून निघून गेल्यामुळे आपण त्यांच्या कार्याला मुकलो आहोत. आजच्या या प्रसंगी सभागृहाच्या नेत्यांनी सभागृहाच्या दिवंगत सदस्याबद्दल जो शोकप्रस्ताव मांडला आहे. त्या दिवंगत सदस्यास मी माझ्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने, रिपब्लिकन जनतेच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करतो. 

धन्यवाद. 

६. डॉ. नीलम गो-हे (विधानसभेने निवडलेल्या) 

सभापती महोदय, सभागृहाचे नेते सन्माननीय मंत्री श्री. एकनाथराव खडसे यांनी श्री. शिवाजीराव मारुतराव पाटील यांच्या निधनाबद्दल जो शोकप्रस्ताव मांडला आहे त्या दिवंगत सदस्यास मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. सभापती महोदय, कै. शिवाजीराव मारुतराव पाटील यांचा शिक्षणमहर्षी असाच उल्लेख करावा लागेल. हडपसर परिसरात मी ज्यावेळी काम करीत होते, त्यावेळी आमदार इतका साधा असू शकतो हे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर जाणवत असे. मी नुकतीच विद्यार्थी चळवळीतून काम करावयास लागले त्यावेळी साधा कार्यकर्ता असणारा शिक्षक आमदार असे त्यांचे व्यक्तिमत्त्व पहावयास मिळाले. वेगवेगळे विषय मांडण्याची संधी त्यांनी साधली होती. एक महत्त्वाचे वाक्य मला याठिकाणी उद्धृत करावयाचे आहे. जिवंत असताना लाथा देती, मरता घेती खांद्यावरती. अशा व्यक्तिमत्त्वाच्या कारकिर्दीमध्ये जे काही मतभेद झाले असतील. त्यांच्याशी प्रत्यक्षात कसे वागलो ते सर्व गंगार्पण करावयाचे आहे एवढे मला याठिकाणी नमूद करावेसे वाटते. कै. शिवाजीराव मारुतराव पाटील यांना मी श्रद्धांजली अर्पण करते व माझे भाषण पूर्ण करते. 

७. अॅड. रामहरी रुपनवर (नामनियुक्त ) 

सभापती महोदय, सभागृहाच्या नेत्यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. कै. शिवाजीराव पाटील, यांच्या निधनाबद्दल सभागृहाच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करतो. 

८. श्री. रामराजे नाईक निंबाळकर (सभापती महाराष्ट्र विधानपरिषद) 

सभागृहाचे नेते मा. श्री. एकनाथराव खडसे पाटील यांनी श्री. शिवाजीराव मारुतराव पाटील यांच्या दुःखद निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला आहे. त्यावर सन्माननीय विरोधी पक्षनेते श्री. धनंजय मुंडे, सन्माननीय गटनेते व सन्माननीय सदस्य यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

कै. शिवाजीराव पाटील यांनी अनेक वर्षे रयत शिक्षण संस्थेमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अध्यापनाचे कार्य केले. याकाळात त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने महाळुंगे पडवळ व हडपसर जिल्हा पुणे तसेच विंचूर, जिल्हा नाशिक येथे माध्यमिक शाळांच्या इमारती उभ्या केल्या. तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मंडळ, पुणे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे व महाराष्ट्र राज्य शिक्षण सुधार सल्लागार समितीचे सदस्य, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, पुणे विद्यापीठाच्या विधी सभेचे सदस्य, ऑल इंडिया फेडरेशन ऑफ हेडमास्टर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ व महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही उत्तम कार्य केले होते. त्यांचे ९ जून, २०१५ रोजी दुःखद निधन झाले. श्री. शिवाजीराव मारुतराव पाटील यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो व भावपूर्ण आदरांजली वाहतो. सन्माननीय सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा ; अशी माझी विनंती आहे

Read more at Karmayogeee

]]>
https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%95-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%8d/feed/ 0
नाते मनामनाचे https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87/ https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87/#respond Mon, 08 Jun 2026 18:14:52 +0000 https://karmyogee.com/?post_type=docs&p=2541 Read more at Karmayogeee

]]>
श्री. विठ्ठल बांगर पिंपळगाव (खडकी), पुणे 

साधारणपणे २००० च्या सप्टेंबर महिन्यापासून मी उदयरावांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून कामाला सुरुवात केली तसे माझ्या ओळखीच्या अनेकांनी मला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. “अरे! तू दादांकडे कसा काय कामाला लागलास ? दादा तर खूप रागीट आहेत. शिवाय त्यांना कोणतेही काम अगदी परफेक्ट लागते अन् तू तिथे कसा काय कामाला गेलास ?” हे सर्व ऐकूण माझ्या मनात दादांबद्दल एक भीती निर्माण झाली. मग याच कारणाने मी सुरुवाती सुरुवातीला दादांपासून थोडा लांबच राहू लागलो. त्यांच्यासमोर जायचे टाळू लागलो. परंतु जसजसे दिवस जाऊ लागले तसतसा मला दादांचा, दादांच्या स्वभावाचा व दादा करत असलेल्या कामाचा अंदाज येऊ लागला. तेव्हा खऱ्या अर्थाने दादा मला समजू लागले. 

काही दिवसानंतर माझ्या लक्षात आले की, अरे दादा जे काम करताहेत ते तर समाजहिताचे आहे. ते सर्वांसाठी, सामान्यांसाठी धडपडत आहेत. समाजासाठी, समाजाच्या प्रगतीसाठी ते झटताहेत. त्यांनी तर आपले जीवन समाजकार्यासाठी वाहिले आहे. आणि मग मलाही त्यांचे विचार, काम व वर्तन पाहून आपणही त्यांच्या या कार्यात हातभार लावून आपलाही खारीचा वाटा उचलला पाहिजे असे वाटू लागले. त्याच प्रेरणेने मग मी त्यानंतर सतत दादांबरोबर राहण्याचा प्रयत्न करु लागलो. त्यांच्या सोबत त्यांच्या गाडीवर जाऊ लागलो. बंगल्यावर असताना मी जेव्हा जेव्हा रिकामा आसायचो त्या त्या वेळी दादांच्या सोबत रहायचो. त्यांच्याशी गप्पा मारायचो. अर्थात सुरुवाती सुरुवातीला मी हे सर्व दादांच्या स्वभावाला घाबरत घाबरत करायचो. 

पण पुढे जसजसा काळ लोटला, दादांचा सहवास मला जास्त लाभला तेव्हा मला दादांचा मूळ स्वभाव हळूहळू समजायला लागला. त्यातून कळले की, दादा रागीट नव्हते तर त्यांना कोणतेही काम व्यवस्थित, उत्तमप्रकारे तेही वेळेतच केलेले हवे असे. आपण त्यांना हवे तसे काम केले तर ते कधीही कोणावर रागवत किंवा संतापत नसत. उलट मला तर वाटते दादांसारखा माया करणारा दुसरा कोणी माणूस नसेल. दादा वरवर कडक होते पण आतून ते खूप प्रेमळ स्वभावाचे होते. फक्त ते कडक शिस्तीचे होते. म्हणून माणूस चुकला की ते रागावत. पण त्यांचा राग तेवढ्या वेळेपुरताच मर्यादित असायचा. तो क्षण गेला की त्यांचा राग लगेचच शांत होई. त्या क्षणानंतर त्या माणसावर ते लगेच माया करायचे. नॉर्मलपणे त्याच्याशी ते बोलायचे. ते हळव्या स्वभावाचे होते असे अनेक प्रसंग मी स्वतः अनुभवले आहेत. 

दादा स्वतः एवढीच त्यांच्याबरोबर असणाऱ्या इतरही माणसांची काळजी घेत. मी दादांबरोबर जर त्यांच्या गाडीवर सलग ३-४ दिवस गेलो तर पुढील दिवशी ते मला न सांगता, मला बरोबर न घेता स्वतःच गाडी चालवत आपल्या दौऱ्यावर निघून जात. आल्यावर मी त्यांना त्यांनी ‘ असे का केले ?’ असे विचारले तर ते मला म्हणत, “अरे विठ्ठल ! तू पण माणूसच आहेस ना तुला, तुझ्या शरीराला, मनालाही सतत गाडी चालवून कंटाळा येत असेल ना. तुला आरामाची गरज आहे. म्हणून मी तुला न सांगता गेलो.” एवढा ते समोरच्या माणसाचा विचार करत. त्यांचा माझ्यावर व माझ्या गाडी चालवण्यावर प्रचंड विश्वास होता. मी गाडी चालवताना ते निर्धास्त असायचे. ते मला माझ्या ड्रायव्हिंगबद्दल बोलताना म्हणायचे, “विठ्ठल, मी गाडी चालवताना माझ्या हाताने गेलो तर मला काही वाटणार नाही. तसेच तुझ्या हातून गेलो तरी मला काही वाटणार नाही. पण इतरांच्या हाताने नको. 

” 

त्यांच्या सहवासात माझी १५-१६ वर्षे कशी निघून गेली ते कळले नाही. पण या काळात दादांचे अनेक स्वभावगुण मला जाणवले. ते इतरांचे काम करायचे तेसुद्धा स्वखर्चाने. एखाद्याचे काम आहे म्हणून त्यांनी कधी कोणाला खर्च करू दिला नाही. या काळात त्यांनी मला कधीही अंतर दिले नाही. मी सतत त्यांच्याबरोबर राहिलो. ते जेथे जेथे जात तेथे तेथे मी सोबत असे. सावलीसारखा मी बरोबर राहिलो. पण कधी ते माझ्याशी ड्रायव्हर म्हणून वागले नाहीत. उलट ते कोणालाही माझी ओळख करून देताना, ‘हा आमचा विठ्ठल’ अशीच ओळख करून देत. यांच्या एवढ्या दिवसांच्या सहवासात त्यांनी मला ‘ड्रायव्हर’ अशी हाक कधीही मारली नाही. त्यांना कधी कोठे प्रवासाला जायचे असेल आणि मी बरोबर हवा असेल तर ते मला म्हणत, “विठ्ठल तुला वेळ आहे का रे? वेळ असेल तर माझ्याबरोबर चल. नसेल वेळ तर राहू दे.” त्यांनी मला कधीही तू माझ्याबरोबर चलच अशी सक्ती केली नाही की आदेश दिला नाही की मालक म्हणून कोणतीही जोर जबरदस्ती केली नाही. 

दादांच्या सहवासात राहिल्यामुळे त्यांचे अनेक स्वभावविशेष मला जाणवले. दादांचा नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षण व शिक्षक या दोन्ही गोष्टींवर खूप भर असे. ते रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष होते तेव्हा अनेकजण त्यांच्याकडे शिक्षकाची नोकरी मागण्यासाठी येत. तेव्हा दादा त्या व्यक्तीशी गप्पा मारत मारतच त्याला शिक्षणाशी संबंधित प्रश्न विचारून त्यातून त्याची गुणवत्ता तपासत. ती जर त्यांना जाणवली तरच ते त्याला नोकरी देण्याचा शब्द देत आणि त्याला जर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत तर त्याला ते सरळ सरळ ‘तुझे काम होणार नाही’ असे सांगत. त्यावर मी त्यांना हे असे का? म्हणून एकदा विचारल्यावर त्यांनी मला सांगितले, “हे बघ विठ्ठल, जर शिक्षक चांगला हुशार असला, तयारीचा असला तर तो चांगले शिकवेल व त्यातून गुणवंत विद्यार्थी निर्माण करेल आणि शिक्षणाचा दर्जा सुधारेल. शिक्षणाचा दर्जा वाढला की देशाची आणि समाजाची प्रगती होईल. देशाच्या प्रगतीत उत्तम शिक्षक व उत्तम शिक्षण फार महत्त्वाचे आहे.  

दादा एवढे निःस्वार्थी होते की त्यांच्या घरी आनंदाची बातमी सांगायला काही लोक पेढ्यांचा पुडा घेऊन येत तर दादा त्यावेळेस घरातील माणसे मोजून माणसांएवढेच पेढे घेऊन तो पेढ्यांचा पुडा परत त्या माणसाला परत देत. एवढेच नव्हे तर ते शिक्षक आमदार असताना त्यांना हायवेवरचे टोल माफ होते तसा त्यांच्याकडे पासही होता परंतु दादांनी कधीही या पासचा वापर केला नाही. ते प्रत्येक टोलवर टोलचे पैसे देत असत. विचारले की म्हणत, “असू दे रे विठ्ठल ! त्यानिमित्ताने आपला देशाचा विकासाला थोडाफार हातभार लागतो.” त्यांनी आमदारकीचे भूषण कधीही मिरवले नाही. ते सर्वत्र एका सामान्य माणसाप्रमाणे वागत, बोलत. कधी त्यांनी आमदारकीची घमेंड बाळगली नाही की फुशारकी मारली नाही. सतत ते सामान्यातील सामान्य होऊनच राहिले. 

दादा कधीही जवळचे पाहायचे नाहीत नेहमी ते दूरचा विचार करायचे, याचा अनुभव एकदा मला आला. एकदा दादा असेच संध्याकाळी माझ्या घरी आले तर माझ्या घरामध्ये फार डास होते ते डास बघून दादा म्हणाले, “अरे तू अशा एवढ्या डासांच्या घरात कसा राहतोस? आपण तुझ्यासाठी एक मच्छरदाणी घेऊ!” त्यानंतर आम्ही एक दोन ठिकाणी मच्छरदाणी पाहिली पण ती मच्छरदाणी काही दादांना पसंत पडेना म्हणून एक दिवस दादांनी पुण्याला खास मार्केटमध्ये जाऊन मच्छरदाणी घेतली. घेताना मी लहान मच्छरदाणी निवडली तेव्हा दादा मला म्हणाले, “अरे लहान कशाला घेतोस ? मोठी घे. पुढे मागे उपयोग होईल. लहान मूल वगैरे झाले तर तुला त्याचा उपयोग होईल.” अन् दादाम्च्या वाक्याची मला खरोखरच प्रचिती आली. त्यानंतर काही दिवसानंतर माझ्या घरामध्ये पाळणा हालला. तेव्हा मला कळले की दादा किती लांबचे पाहत. त्यांचा तो शब्द माझ्या जीवनात एक आनंद घेऊन आला. 

दादांना प्रवास करण्याची आणि प्रवासाची फार आवड प्रवासात ते कधीही झोपत नसत किंवा त्यांच्यासोबत असणाऱ्या कोणालाही ते झोपू देत नसत. तो माणूस झोपला किती त्याला उठवत आणि म्हणत, “अरे, झोपतोस काय ? अरे, आपल्या भोवतालचा निसर्ग बघ. ती झाडी बघ, ते डोंगर बघ. आपण जिथून प्रवास करतो तिथला निसर्ग आपण पाहिला पाहिजे. अनुभवला पाहिजे. त्याचापण आनंद लुटला पाहिजे. काय माहित आपण पुन्हा इकडे येऊ की नाही. त्यामुळे आपल्याला जे दिसेल जे आपल्यासमोर येईल ते आपण सर्व पहावं, त्याच्यात आपण आनंद लुटावा पण झोपू नये.” म्हणून दादा कोणालाही झोपू देत नसत निसर्गाचा आनंद घ्यायला ते शिकवत. 

अशा दादांच्या सहवासात बराच काळ मी घालवला पण दादांनी मला कधीच अंतर दिले नाही की दुखावले नाही. नेहमी माझी काळजी घेतली. मी जेव्हा दादांबरोबर परगावी जायचो तेव्हाही दादा माझी काळजी घेत. सतत मला बरोबर घेत. मग ते जेवण असो की रात्री झोपणे. आम्ही दोघे सोबतच असायचो. कोणत्याही मिटींगला दादा गेले आणि मी गाडीत बसलेलो असेल तर दादा तेथील शिपायाकडून माझ्यासाठी गाडीत नाष्टा पाठवत. त्यांनी मला सोडून कधी एक घासही खाल्ला नाही. 

व्यवहाराच्या बाबतीतही दादा खूप काटेकोर व चोखंदळ होते. त्यांनी कधीही कोणाला आर्थिक त्रास दिला नाही. कोणाचा एक रुपयासुद्धा त्यांनी घेतला नाही की कोणाला खर्च करू दिला नाही. कोणत्याही माणसाला काही वस्तू विकत आणायला सांगण्याअगोदर ते त्याला पैसे देत मग ती वस्तू आणायला सांगायचे. ते नेहमी सांगायचे आपल्यासाठी कोणाला पै- पैचाही त्रास होता कामा नये, आपल्याला झळ बसली तरी चालेल. असे हे दादा खूप उत्साही, आनंदी जीवन जगले, ते संपूर्ण जीवनभर निरोगी राहिले. म्हणून तर वयाच्या ७६-७७ व्या वर्षी घरासमोर निघालेला भला मोठा नाग त्यांनी २०० ते २५० मीटर धावत त्याचा पाठलाग करून मारू शकले. जो नाग बघून मी घाबरलो होतो. तो त्यांनी एकट्यानेच मारला. त्यांचे निधन होण्याअगोदर केवळ दोनच दिवस ते मंचर- खामगाव – अकोला असा फार मोठा प्रवास करून आले. अशा दादांचे आणि माझे ‘या मनीचे त्या मनी’ असे मनाचे नातेसंबंध निर्माण झाले होते. मी त्यांच्याशी व ते माझ्याशी खूप मनमोकळे गप्पा मारत असायचो. राजकारण, समाजकारण, कुटुंब, शेती अशा अनेक विषयांवर आम्ही बोलत असायचे, आमच्यात आता कोणते अंतर किंवा कोणतीही औपचारिकता राहिली नव्हती. आणि अशाच एके दिवशी अचानक दादा आम्हाला सोडून गेले. ज्याने गेली पंधरा-सोळा वर्षे त्यांच्या गाडीचे सारथ्य आनंदाने केले त्याला त्याच्या अंत्ययात्रेच्या रथाचेही सारथ्य करावे लागले. ही गोष्ट खरोखरच खूप दुःखदायी, वेदना देणारी मनाला घरे पाडणारी होती. तो दिवस आणि ती वेळ मी माझ्या जीवनात कधीही विसरू शकत नाही पण मला एक गोष्ट कळत नाही. त्यांच्या अंत्ययात्रेचा रथ चालविणे हे मी माझे भाग्य समजावे की दुर्भाग्य… त्याचा अभिमान बाळगावा की दु:ख…

Read more at Karmayogeee

]]>
https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87/feed/ 0
माझा दादा https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%be/ https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%be/#respond Mon, 08 Jun 2026 18:13:52 +0000 https://karmyogee.com/?post_type=docs&p=2539 Read more at Karmayogeee

]]>
सौ. शकुंतला बाळासाहेब वाघ रौळस, पिंपरी, नाशिक

दादा म्हणजे आमच्या पाटील कुटुंबाचा कारभारी. माया, प्रेम, जबाबदारी आणि आदरयुक्त भीती असं एक सर्वांना पोषक असं मिश्रण. असंख्य दीनदलितांचा कैवारी अशा या उत्तुंग हिमालयाच्या सावलीत आमचा पाटील परिवार विसावला होता. दादांच्या भेटीतील जिव्हाळा, हितगुज आणि सुखसंवादाने जीवनातील काही क्षण मंतरले जायचे व या क्षणांची शिदोरी माझ्यासारख्या सासुरवासिनींना पुढील बराच काळ ऊर्जा प्राप्त करुन द्यायची. केवढा मोठा आधार होता तो आम्हा सर्व भावंडाचा आणि परिवाराचा! आमच्या सुख-दुःखात घट्ट पाय रोवून आमच्या पाठीशी उभा राहणारा आमचा दादा असा एका क्षणात सर्वांनाच दुःखसागरात लोटून गेला; सगळा भूतकाळ आठवतो. पण दादाच्या बाबतीत लिहिताना भूतकाळी वाक्यरचना करणेही अवघड होऊन बसते व मग सुरु होतात अश्रूंच्या धारा. लिहित असलेली अक्षरेही भूतकाळासारखी धूसर दिसू लागतात. मग थोडेसे थांबायचे, स्वतःला स्वतःच सावरायचे आणि पुढे लिहायचे अशी अवस्था हा लेख लिहिताना व्हायची. 

आमचे बाबा स्त्रीशिक्षण पुरस्कर्ते. त्यामुळे आम्हा सर्वांनाच शिक्षण उत्तम प्रकारे दिले गेले. नंतर मात्र आमचा दादाच आमचा ‘बाबा’ बनला. कालांतराने वहिनींचा प्रवेश झाला. आमची आई आणि वहिनी एकाच खाणीतल्या, म्हणजे विदर्भवासिनी असल्यामुळे दोघींचा मेळ चांगला बसला. ज्या घरात सासू सुना एकमेकींवर जीवापाड प्रेम करणाऱ्या असतात ती घरे पुढे समाजाची एक आदर्श पिढी निर्माण करत असतात. तसेच झाले. आमच्या आईने वहिनीला मुलीप्रमाणेच वागवले आणि जपलेही. आम्ही वहिनींशी मैत्रिणीसारखेच वागायचो वहिनींनेही कुटुंब छान सांभाळले. कुटुंबातील सर्वांशी समरस होणे, वडिलधाऱ्यांचा मान ठेवणे, डोक्यावर पदर घेणे या गोष्टी बालवयातच आमच्यावर बिंबवल्या व त्या आम्हाला भावल्या आणि आमच्या वैवाहिक जीवनात उपयुक्तही ठरल्या. वहिनी धार्मिक होत्या. दादा मात्र तसा नव्हता. परंतु हळूहळू त्यांनी दादामध्ये हा बदल घडवून आणला. 

आमच्या वडिलांसारखाच तापट स्वभाव असायचा. शिस्तप्रिय तेवढाच हळवा आणि मायाळूही. दादा महाळुंग्याला मुख्याध्यापक असताना मीही महाळुंग्याला असायची. त्यामुळे शाळेत एखादा तास घेणे, संध्याकाळी ग्राऊंडवर खेळणे असा नित्यक्रम असायचा. त्याकाळातील वहिनींचे प्रेम आणि संस्काराची शिदोरी मला आयुष्यभर पुरली व आमच्या सासरी आम्ही सुखी आणि सर्वप्रिय झालो. 

पुढे माझा विवाह सहकार महर्षी काकासाहेब वाघांच्या अतिशय मोठ्या व प्रतिथयश घराण्यातील बाळासाहेब वाघ यांच्याशी झाला. दादाची कमाई तुटपंजीच असायची पण दादाच्या काटेकोर आर्थिक नियोजनामुळे लग्नकार्ये, सणवार, अशा प्रसंगी कुठेही कमी पडला नाही. या सर्व जबाबदाऱ्या त्याने आनंदाने स्वीकारल्या आणि यशस्वीपणे पारही पाडल्या. 

दिवाळीच्या किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत आवर्जून भेटीला येणार. सगळं कुशल विचारुन निघून जाणार. मुक्कामाला मात्र कधी थांबायचा नाही कुणाकडेच. ती जबाबदारी आता उदय आणि सौ. छाया मनोभावे पार पाडत आहेत. दादाची कमतरता आम्हाला भासू नये. याची यथायोग्य काळजी ते दोघेही घेत आहेत. तरीही दादाची उणीव मात्र पिच्छा सोडत नाही. शेवटी एकच वाटते दादा म्हणजे एक दुर्मिळ रसायन जे एकदाच बनले त्याची पुनः निर्मिती नाही. एकच पुस्तक व त्याचीही एकच प्रत. ती एकच प्रत आयुष्यभर सांभाळायची.

Read more at Karmayogeee

]]>
https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%be/feed/ 0
शिवाजी मामा : एक जगण्याचा विश्वास https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b5/ https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b5/#respond Mon, 08 Jun 2026 18:12:45 +0000 https://karmyogee.com/?post_type=docs&p=2537 Read more at Karmayogeee

]]>
सौ. विदुला नितीन साळुंखे अहमदनगर

डॉ. नितीन साळुंखे हे शिवाजीमामांचे भाचे व त्यांची मी पत्नी. भाचे सून असूनही मी पाटील कुटुंबात पहिल्यापासूनच सामावून गेले. उदयदादा, सौ. छायावहिनी, रणजितभाई आणि मामा-मामी हे सर्व कुटुंब आमच्या कुटुंबाशी अगदी एकरूप. त्यात सर्वात महत्त्वाचा वाटा शिवाजीमामांचा. “मोठे मामा’ हे पद त्यांनी मोठेपणानेच सांभाळले. आमच्या गोतावळ्यातील प्रत्येक निर्णय हा शिवाजीमामांना विचारूनच असायचा. 

मला आमच्या आईचं नेहमीच कौतुक वाटायचं. अगदी १५ दिवसांनी भेटले तरी बहीण भाऊ अगदी गळा भेट घ्यायचे. एकमेकांची विचारपूस करायचे. सर्व बहिणी व भावांनी हे नाते इतके सुरेख जपले आहे. त्यात श्रेय सर्वांचच आहे. सर्वजण एकमेकांच्या सुखात जेवढे सहभागी असतात तेवढेच दुःखातही असतात. शिवाजीमामा हे व्यक्तिमत्त्व म्हणजे या सर्व वृक्षाचे मूळ. सर्व उत्साहाचा केंद्रबिंदू. मामांचा जसा सर्व नातेवाईकांशी संपर्क तसाच महाराष्ट्र व बाहेरच्या राज्यातही रयत शिक्षण संस्थेच्या कार्यासाठीचा संपर्क होता. स्वतः जातीनं सर्व कार्यक्रमांना हजर असायचे. प्रत्येकाला जातीनं भेटायचे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन, साधी 

राहणी उच्च विचारसरणी असे जीवन मामांनी व्यतीत केले. मामा नेहमी म्हणत “तुमच्या जवळ पुस्तकं आणि मित्र हे नेहमी चांगलेच असू दया.” मामांचं वाचन, लेखन खूप असायचं. म्हणूनच त्यांचं व्यक्तिमत्त्व भव्य दिव्य घडलं. मामांच्या जाण्यानं खूपच मोठा आघात झाला, कुटुंबाला, महाराष्ट्राला, संस्थेला. आज मामी, उदयदादा, छायावहिनी आणि रणजित सर्वांनी हा भार उचलला आहे. आघात सोसूनही सर्वजण न डगमगता उभे आहेत. इतरांना आधार देत आहेत.

Read more at Karmayogeee

]]>
https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b5/feed/ 0
आंबेगावच्या सर्वांगीण प्रगतीचे शिल्पकार https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a3-%e0%a4%aa%e0%a5%8d/ https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a3-%e0%a4%aa%e0%a5%8d/#respond Mon, 08 Jun 2026 18:11:46 +0000 https://karmyogee.com/?post_type=docs&p=2535 Read more at Karmayogeee

]]>
श्री. सचिन मधुकर बांगरयुवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य

महाराष्ट्राच्या शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक इतिहासात मा. आमदार शिवाजीराव दादा पाटील हे नाव आदर, समर्पण आणि संघर्ष यांचे प्रतीक मानले जाते. त्यांनी महाराष्ट्रातील युवकांना सामाजिक जाण, नेतृत्व आणि मूल्यांची प्रेरणा दिली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक विलक्षण समतोल होत तो कणखर भूमिका आणि शांत संयमाचा. मा. शिवाजीराव दादा पाटील यांनी विधानपरिषद आमदार म्हणून काम करताना आंबेगाव तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या विकासात मोलाची भूमिका बजावली. आंबेगावच्या सर्वांगीण प्रगतीचे खरे शिल्पकार तेच राहिले. घोडनदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ही त्यांच्या दूरदृष्टीची आणि जलसंकल्पनेची उल्लेखनीय देणगी ठरली. ग्रामीण भागातील रस्ते, शिक्षण, पाणीपुरवठा, वीज आणि शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून अनेक प्रश्न मार्गी लावले. दादांच्या कामाचा ठसा आजही आंबेगावच्या मातीत आणि लोकांच्या मनावर स्पष्टपणे उमटलेला आहे. 

दादांचा आवाज नेहमी ठाम असे, पण त्यामागे ममत्व, आपलेपण आणि मार्गदर्शनाची उब असायची. ते विद्यार्थ्यांना नेहमी सांगायचे की, शिक्षण हे फक्त पदवीचे नाव नाही. ते तुमच्या आयुष्याचा दृष्टिकोन बदलणारे सामर्थ्य आहे. शिक्षणाच्या अभावामुळे होणारी पिढ्यानपिढ्यांची हानी, बेरोजगारीची झळ बसलेल्या ग्रामीण कुटुंबांची स्थिती, आणि विद्यार्थ्यांवर येणारे असंख्य प्रश्न या सर्वांवर काम करणे ही तरुणांची जबाबदारी आहे, असा त्यांचा ठाम संदेश होता. 

१९९९ साल माझ्या आयुष्यातील एक निर्णायक वर्ष ठरले. मंचर येथील रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात मी ११ वी शास्त्र शाखेत शिकत असताना एका कार्यक्रमात मला भाषण करण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांच्या समस्यांवर मी उत्साह आणि आवेशाने बोललो. त्या सभागृहात जमलेल्या लोकांतून टाळ्यांचा कडकडाट झाला, पण माझ्या भाषणातील तीव्रतेचा दादांनी बारकाईने वेध घेतला. कार्यक्रमानंतर त्यांनी मला जवळ बोलावले. माझ्या समोर उभे असलेले दादांचे विशाल व्यक्तिमत्त्व, त्यांचा सामाजिक प्रभाव आणि आंबेगाव तालुक्यातील लोकांमधील त्यांचा दरारा हे सर्व पाहून मी क्षणभर थबकलो. परंतु दादांची नजर प्रेमळ आणि शांत होती. माझ्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले, चांगले बोलतोस, मुद्दे बरोबर मांडतोस. पण नेतृत्वासाठी संयम हे सर्वात मोठे शस्त्र असते. आवाज मोठा असण्यापेक्षा विचार मोठा असणे महत्त्वाचे. त्या एका वाक्याने माझ्या आयुष्याचा पाया रचला. 

दुसऱ्याच दिवशी मी महाविद्यालयातील काही सहकाऱ्यांसह सायकल घेऊन दादांच्या शिवनेरी बंगल्यावर गेलो. त्यांच्या दारापर्यंत पोहोचताना मनात भीती आणि संकोच दोन्ही होते. आम्हाला भेट मिळेल का, वेळ देतील का, अशा अनेक शंका होत्या. परंतु आम्ही पोहोचताच दादांनी आपलेपणाने आवाज दिला. त्यांनी आम्हाला घरातील बाग दाखवली, आमच्यासोबत मनमोकळ्या गप्पा केल्या, आणि पोहे व कोकम सरबत देऊन आदरातिथ्यही केले. त्या भेटीत दादांच्या मनातील विशालता आणि माणसाला जवळ घेण्याची त्यांची ताकद समजली. त्या दिवशी त्यांनी दिलेला कानमंत्र म्हणजे, प्रश्न मोठे असतात म्हणून आपण मोठे होणे आवश्यक नसते; प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मन मोठं असायला लागतं. हा विचार आजही माझ्या सार्वजनिक जीवनातील मूलभूत मूल्य आहे. 

आज मी ज्या पद्धतीने युवक, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवतो, युवकांसाठी रोजगारनिर्मितीची धडपड करतो, ग्रामीण भागातील विकास प्रकल्पांसाठी संघर्ष करतो आणि सामाजिक सौहार्द व लोकाभिमुखता टिकवून काम करतो त्या प्रत्येक कृतीत दादांचा प्रभाव ठामपणे दिसतो. माझ्या कामातील शांतता, शिस्त, विश्वास आणि नैतिकता हा दादांनी रुजवलेला संस्कार आहे. माझ्या नेतृत्वातील नम्रता आणि कणखरता या दोन्हींची मुळे दादांच्या मार्गदर्शनातच आहेत. त्यांनी मला शिकवले की नेता होणे ही मोठी गोष्ट नाही, पण लोकांचा विश्वास जिंकणे हे खऱ्या नेतृत्वाचे लक्षण आहे. आजही दादांचे एक वाक्य सतत कानात घुमते, सचिन, काम करताना थकलास तर विसावा घे; पण समाजासाठी काम करणं कधी थांबवू नकोस. या शब्दांनी माझ्या राजकीय व सामाजिक प्रवासाला दिशा दिली. त्यांचे मार्गदर्शन हे माझ्या जीवनातील अमूल्य संपत्ती आहे. मी आजही स्वतःला त्यांच्या विचारांचा पालनकर्ता मानतो. आजही मी दादांच्या घरी जातो. त्यांचे चिरंजीव उदयदादा, सौ. छायाताई आणि रणजित यांच्यासोबत दादांच्या आठवणींमध्ये रमल्यावर ती ऊर्जा पुन्हा नव्याने उभी राहते. संपूर्ण पाटील कुटुंब हे आंबेगावच्या मातीचे तेजस्वी रत्न आहेत. या कुटुंबाचा सहवास म्हणजे दादांच्या कार्याची आणि विचारांची परंपरा आजही जिवंत असल्याचा प्रत्यय. दादा नाहीत. पण त्यांचे संस्कार, त्यांचे मूल्य, त्यांची तत्त्वनिष्ठा आणि त्यांच्या नेतृत्वाचा परीसस्पर्श माझ्या प्रत्येक कृतीत आजही धगधगत आहे.

Read more at Karmayogeee

]]>
https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a3-%e0%a4%aa%e0%a5%8d/feed/ 0
माणूस घडवणारा शिक्षक https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%82%e0%a4%b8-%e0%a4%98%e0%a4%a1%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%95/ https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%82%e0%a4%b8-%e0%a4%98%e0%a4%a1%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%95/#respond Mon, 08 Jun 2026 18:10:42 +0000 https://karmyogee.com/?post_type=docs&p=2533 Read more at Karmayogeee

]]>
श्री. भास्कर सावंत कार्यवाहक, राणा प्रताप मंच, मंचर, पुणे

रयत शिक्षक संस्थेत उपशिक्षक म्हणून आपल्या सेवेचा आरंभ करून पुढे शिक्षक आमदार आणि संस्थेचे उपाध्यक्ष या पदापर्यंत पोहचणारे शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणारे स्व. शिवाजीराव पाटील म्हणजे मंचरच्या मातीने घडविलेले असामान्य व्यक्तिमत्त्व. खरं तर ज्यांच्याविषयी बोलावं अशा व्यक्ती, बहुसंख्य राजकारणी व्यक्ती आपल्या सभोवताली असतात परंतु ज्यांच्या कर्तृत्त्वाविषयी लिहावं, ज्यांचे चारित्र्य, ज्यांची गुणवत्ता आणि ज्यांची विद्वत्ता अभ्यासावी अशा मोजक्या व्यक्ती आपल्या भोवती असाव्यात अशा व्यक्तिंमध्ये शिवाजीराव पाटील यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. 

ज्ञान हे समाजभर पाझरत, पसरत जावं या उद्देशाने प्रेरित होऊन अनेक शाळांची त्यांनी स्वतः पाया बनून उभारणी केली. खेड्यापाड्यातील डोंगराळ भागात शिक्षणाची कवाडे उघडून पालक, विद्यार्थी, शिक्षक यांना शिक्षणाची, परिवर्तनाची कास धरण्यास सांगून वाट मोकळी करून दिली. विद्वान, तत्त्वज्ञ, विचारांची तडजोड न करणारा शिक्षक म्हणून ज्यांची ख्याती महाराष्ट्राभर होती अशा थोर विभूतीचा जीवनपट चार-दोन ओळी किंवा पुस्तकरूपाने उलगडणे अवघड आहे. त्यांचे जगणे माझ्यासारख्या लाखो विद्यार्थ्यांना दस्तऐवज ठरो. 

त्यांचा आणि माझा संबंध मी विद्यार्थी दशेत असताना आला. मला आठवतं मी महात्मा गांधी विद्यालय, मंचर येथे शिक्षण घेत असताना त्यांची प्राचार्य म्हणून नेमणूक झाली. नेमकं आठवत नाही, १९८७ साल असेल कदाचित. मी शाळेत टवाळ आणि थिल्लर, शिक्षकांना त्रास देणारा विद्यार्थी म्हणून कुप्रसिद्ध होतो. शिवाजीरावांनी पदभार स्वीकारल्यानंतर ते कडक शिस्तीचे पाईक असल्याकारणाने ‘सावंत’ला शाळेतून काढून टाकतील, या ईर्षेने काही निवडक शिक्षकांनी ‘मला शाळेतून काढून टाकावे’ अशी तक्रार केली. 

प्राचार्यांनी लगेच शिपायामार्फत फर्मान सोडले शिपाई एक पाय दारात नि एक वर्गात. “सावंत, तुला प्राचार्यांनी कार्यालयात बोलाविले आहे.” मला धस्स झालं. हृदयाचे ठोके वाढले कारण त्यांच्या इतर ठिकाणी केलेल्या कारवायांबद्दल आणि दंडकांबद्दल मी अनभिज्ञ नव्हतो. माझ्या मनात नाना प्रकारच्या शंका आकार घेऊ लागल्या, ‘वडिलांना बोलावणार की शाळेतून काढून टाकणार’ हा विचार करतच मी कार्यालयासमोर आलो. 

“सर, आत येऊ?” 

“ये. काय नाव तुझं ? ” 

‘’सावंत.’” सरांनी माझ्याकडे नजर टाकली आणि म्हणाले,” उदया येताना डोक्यावरचे केस कापून ये. जा. ” 

आतापर्यंत विचारांच्या गांधील माशांनी रक्तबंबाळ झालेलं माझं मन शांत होऊन जीव भांड्यात पडला. सरांची कडक शिस्त सर्वश्रुत असल्याने मी शाळा सुटल्यानंतर केस कापून पुन्हा दुसऱ्या दिवशी शाळेत हजर झालो. घंटा झाली, शाळा भरली, वर्गात बसतो न बसतो तोच शिपाई दारात. “सावंत, तुला प्राचार्यांनी बोलवलं आहे.” मी सरांच्या कार्यालयात गेलो. माझ्याकडे पाहत सर मला म्हणाले, 

”सावंत, जंगलाचा राजा कोण ? 

“सिंह.’ ” 

”वाघ आणि सिंह यांत हिंस्त्र कोण ? ‘ “वाघ.” 

मग, सिंह जंगलाचा राजा कसा ? 

मी निरूत्तर झालो आणि नंतर त्यांनी मला सांगितले की, ” सिंह जंगलाचा राजा त्याच्या आयाळामुळे (केस) नव्हे तर त्याच्या मनगटात असणाऱ्या पंजाच्या ताकदीमुळे असतो. म्हणून पुरुषाचे सौंदर्य हे त्याच्या केसात नाही तर त्याच्या ‘मनगटात’ असते आणि स्त्रीचे सौंदर्य तिच्या वाढवलेल्या केसात असते.” आज २५ वर्षाहून अधिक काळ लोटला या घटनेला, माझे केस पुन्हा कधी कानावर आले नाहीत. यावरून त्यांच्या चिकित्सक वृत्तीचा आणि लहानसहान चुकांकडे पाहण्याचा कटाक्ष लक्षात येतो. 

तक्रारदार शिक्षकांना सरांनी सांगितले, “त्याच्याइतका आज्ञाधारक मुलगा मी आत्तापर्यंतच्या सेवेत पाहिला नाही. कारण त्याला एकदाच केस कापण्यास सांगितले आणि त्याने ते ऐकले, म्हणजे तो ‘आज्ञाधारक’ आहे. त्याच्याव्यतिरिक्त आणखी एकूण १४०० विद्यार्थी शाळेत शिक्षण घेतात. तुम्हास एक विद्यार्थी सुधरवता येत नसेल तर, तुम्ही फुकट…” असे खूप नाही परंतु सरांचे तुरळक प्रसंग माझ्या जीवनात आले. माझ्या नोकरीच्या निमित्ताने सरांनी प्रयत्न केले नाहीत असे नाही. पण प्रत्येक ठिकाणी नियमांच्या कठोरतेचे प्रत्यंतर येत गेले. पुढे मी माझ्या व्यवसायाला वाहून घेतले. साधारण २००१-२००२ चा काळ असेल, सरांच्या घरी जाण्याचा योग आला. सरांनी बाईंना (मॅडम) चहा करायला सांगून माझी विचारपूस केली “अरे! मी तुला अब्राहम लिंकनचे पत्र दिले होते. ते तुझ्याकडे आहे की नाही ?” मी नकारार्थी मान हलवत ‘नाही’ म्हणालो. 

आम्ही एवढे मोठे असूनही आम्हाला जीवन जगताना या पत्राचे मोलाचे मार्गदर्शन घडते. नंतर त्यांच्या बंगल्यातील बैठक खोलीतील (हॉल) भिंतीवरील दक्षिणाभिमुख असणारे अब्राहम लिंकनचे पत्र लिहून घ्यावयास सांगितले. ते पत्र आजही माझ्याकडे आहे. 

२०१२ साली मित्रांसमवेत बसलो असताना सरांची गाडी समोरून आली आणि सरांनी मला पाहिले आणि गाडी थांबविली आणि मला विचारले, “काय करतोस?” “सर, मी थ्री व्हिलर मालवाहतूक गाडी चालवतो.” “अरे! त्यात भागतं का? मुलं किती ?” मी म्हणालो, “दाल-रोटी सुटते” हे ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव दाटून आले होते. कदाचित ह्याच्यासाठी आपण काही करू शकलो नाही, अशी खंत त्यांना वाटत असावी. 

“ते काही नाही उदया बंगल्यावर ये.” सर म्हणाले. 

“सर मी एजबार झालो आता. 

“असू दे रे बाबा” सर म्हणाले. 

” मी उत्तरलो. 

मी रिटायर शिक्षक असून मिळालेल्या पेन्शनमधून स्वतःच्या खर्चाने तुम्हाला फुकट चहा पाजतोय, तुम्हा विद्यार्थ्यांना भेटायलासुद्धा येता येत नाही. मी घर बांधलंय म्हटल्यानंतर मग तुझ्याच घरी चहा घेऊ. 

मृत्यूच्या आदल्या दिवशी म्हणा किंवा दुपारी महात्मा गांधी विद्यालयाचा शिपाई (कांबळे मामा) शिपाई कसला आलाय त्यांच्यावर जिवापाड प्रेम करणारा दूतच तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘ मोबाईल रिचार्जच दुकान कुठे आहे ? दादांच्या मोबाईलला रिचार्ज मारायंचय.” त्याला ते दुकान सांगून मी त्याच्याजवळ दादांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यावर तो म्हणाला, 

“त्यांना काय झालंय ? धडधाकट आहेत अजूनही गाडी चालवताहेत. त्याच वेळेस सरांना फोन करुन त्यांची खुशाली विचारविशी वाटली. परंतु फोन करण्याएवढे आपण त्यांचे मोठे विद्यार्थी नाही या विचारांनी मी त्यांना फोन करणे टाळले. नंतर अशाच एके दिवशी त्यांच्या मृत्यूची बातमी कळाली आणि मी खूप हळहळलो वाटले, आपण एका प्रगल्भ विचारसरणीच्या गुरुला मुकलो. त्यांच्या विचारांनी घडलेले विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा आजही ठसा उमटवत आहेत. जगणं हे आपलं असलं तरी इतरांच्या वाट्याला ते अधिक प्रमाणात यायला हवे, म्हणजे मृत्यूही तशाच प्रकारचा येतो हे त्यांनी आपल्या जाण्याने दाखवून दिले. म्हणूनच मृत्यूनंतरही विद्यार्थ्याला जगायला शिकविणारा शिक्षक म्हणजे स्व. शिवाजीराव पाटील होय. अनेक आघात सहन करूनही मी आज उभा आहे पण प्रत्येक वेळी राखेतून फिनिक्सचा जन्म होईलच असे नाही. त्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्तीही असावी लागते, ती माझ्यात सरांनी निर्माण केली, म्हणून मी… मी आज जो कोणी घडलो आहे ती सरांचीच कृपा.

Read more at Karmayogeee

]]>
https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%82%e0%a4%b8-%e0%a4%98%e0%a4%a1%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%95/feed/ 0
आठवणी दादांच्या https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%86%e0%a4%a0%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/ https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%86%e0%a4%a0%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/#respond Mon, 08 Jun 2026 18:08:35 +0000 https://karmyogee.com/?post_type=docs&p=2531 Read more at Karmayogeee

]]>
श्री. संतोष बाणखेले मंचर, पुणे.

मा. आमदार शिवाजीराव पाटील तथा दादा आज आपल्यात नाहीत हा विचारच मनाला पटत नाही. प्रासादिक, प्रसन्नतेचा दरवळ असणारे नवोन्मेषशाली व्यक्तिमत्त्व हरपले. रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षण चळवळीतील ‘राम’ गेला. एक शिक्षण महर्षी, एक शब्द कुबेर, शिक्षण क्षेत्रातील वारकरी वैकुंठाच्या यात्रेस निघून गेला. मंचर नगरीतील शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक मैफल कायमची विराण झाली. शिक्षण क्षेत्रातील श्वास गेला. 

आपल्या आईवर व जन्मभूमीवर त्यांची अपार श्रद्धा होती. मंचर नगरी ही शिवाजीदादा पाटील यांची जन्मभूमी परंतु संपूर्ण महाराष्ट्र त्यांची कर्मभूमी राहिली. ५४ वर्षांच्या कारकिर्दीत शिवाजीदादांनी राबविलेल्या शैक्षणिक चळवळींना आगळीवेगळी चमक लाभली. आंबेगाव तालुक्यातील अनेकांच्या शैक्षणिक जीवनाला आकार देणारे ते एक शिल्पकार ठरले. ज्यांची प्रत्येकाच्या मनातील प्रतिमा नंतर आयुष्यात कधीच बदलू शकली नाही ते म्हणजे आमच्या शैक्षणिक क्षेत्रातील दैवत मा. शिवाजीराव पाटील हे होत. ते मूळचे मंचरचे रहिवासी होते. शैक्षणिक कार्यातून नंतर ते शिक्षक मतदारसंघातून १९८४ साली विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. त्यांनी अनेक पदावर कामे केली. 

माझा आणि दादांचा संबंध १९९८ साली महात्मा गांधी विद्यालय, मंचर येथील स्थानिक स्कूल सल्लागार समितीच्या माध्यमातून आला (१९९८ ते २०१५). या १७ वर्षांच्या कारकिर्दीत मा. शिवाजीदादा पाटील यांच्या सहवासात शाळेच्या कामांच्या माध्यमातून त्यांचा आधार व आदर्श, अनुभव, आदरयुक्त भीती आणि आपुलकी मला लाभली आणि मी खरा भाग्यवान ठरलो. कारण ज्यांना शिवाजीदादांचा परिसस्पर्श झाला त्यांच्या आयुष्याचे खरोखरच सोने झाले किंबहुना त्याहुनही जास्त काही. त्यांच्यामुळे वेळेचे पालन, शिस्तीचे महत्त्व, प्रामाणिकपणा, व्यायाम, समाजसेवा, स्पष्टोक्तेपणा या सर्व गोष्टी शिकायला मिळाल्या. 

जर विद्यार्थ्याला आर्थिक अडचण असेल तर स्वतःच्या पेन्शनमधील पैशातून कितीतरी मुलांना ते वर्षानुवर्षे मदत करत असत. विंचूर येथे मुख्याध्यापक असताना शाळेत मुलांना पाण्याची गरज आहे हे ओळखून त्यांनी स्वतः विहीर खोदण्यासाठी पहार हातात घेतली आणि आपल्या सहकाऱ्यांबरोबर पाच परुस विहीर खोदून मुलांना पाण्याची सोय करून दिली. त्यांना होणाऱ्या अपार समाधानाने धन्य होणारे आपल्या मालमत्तेएवढीच रयत शिक्षण संस्थेच्या मालमत्तेची देखभाल करणारे दादा दुर्मिळच.  मिळकतीबरोबरच आपली प्रतिमा, लेखणी, वाणी हे सारे समाजाचे धन मानून त्यांनी त्याच भावनेने या साधनांचा वापर केला. शिक्षणमहर्षी वडिलांचा वारसा त्यांनी आयुष्यभर जोपासला. 

अचाट स्मरणशक्ती, अफाट बुद्धिमत्ता आणि तितकीच तीव्रतम संवेदना अशा त्रिगुणात्मक वैशिष्टयांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात झालेला होता. संस्कृत, प्राकृत, इंग्रजी, उर्दू, मराठी, हिंदी अशा सर्व भाषातील ग्रंथाचा त्यांनी जाणिवपूर्वक अभ्यास केला होता. त्यांनी अनेक विद्यार्थी घडवलेच पण एकेकाळी त्यांचे विद्यार्थी परदेशातदेखील उच्च पदावर कार्यरत होते. ही त्यांच्या शिक्षकी पेशाची खरी सार्थकता होती. महाराष्ट्रातील प्रत्येक सारस्वताच्या पाठीवर त्यांची कौतुकाची थाप पडली आहे. दादांनी फक्त शैक्षणिक क्षेत्रातच काम केले असे नाही तर घोडनदीवरील बंधारे मंजूर करून घेऊन आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीस पाणी उपलब्ध करून देण्यात दादांचा फार मोठा वाटा आहे. सामुदायिक विवाह चळवळीची सुरूवात देखील दादांनी महाळुंग्यात मुख्याध्यापक असताना १९६४ साली शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या समारंभात पाच सामुदायिक विवाह सोहळे पार पाडून केली. त्या काळात कोठेही सामुदायिक विवाह सोहळे झाल्याचे ऐकिवात नव्हते. असे हे आमचे आदर्श दैवत मा. शिवाजीदादा पाटील त्यांच्या या विचारातून त्यांच्या नितळ, पारदर्शी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते. आपल्या जन्मभूमीतील मातीशी नाते जोडून शिवाजीदादांनी शेतीमध्ये हिरवं स्वप्न पाहिलं तेच स्वप्न आपल्या परिसरातील शाळा कॉलेजमध्ये देखील पाहिलं आणि प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये फळाफुलांच्या बागा फुलविल्या. दादा हे शैक्षणिक कर्म करणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते. 

“फुलांचा भार न व्हावा कधी कोणत्याही देठा, 

चालणाऱ्या पावलांसाठी दर्शविल्या मोकळ्या वाटा. ” 

आमच्या जीवनाची बाग संस्कारित करणारे आमचे गुरु मा. शिवाजीराव पाटील यांच्या चरणी हे कथन अर्पण करीत आहे. ज्यांचा स्वभाव मधुर होता, ज्यांची वागणूक लाघवी होती अशा व्यक्तिमत्त्वाच्या पारदर्शी शैक्षणिक दिंडीच्या ह्या अग्रणी वारकऱ्याचे स्मरणसुद्धा एक प्रेरणा आहे

Read more at Karmayogeee

]]>
https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%86%e0%a4%a0%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/feed/ 0
विश्वास https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8/ https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8/#respond Mon, 08 Jun 2026 18:07:33 +0000 https://karmyogee.com/?post_type=docs&p=2529 Read more at Karmayogeee

]]>
श्री. दशरथ शेटे मंचर, पुणे

सन १९९० साली दादा आमदारपदासाठी निवडणूक लढवीत आहेत ही वार्ता कळताच खूप आनंद झाला. मी १९ दिवसांची रजा टाकली व मंचर मुक्कामी दादांच्या प्रचारात सक्रिय झालो. आम्ही सर्वजण सकाळी ६.३० वाजता दादांसोबत गावोगावी प्रभावीपणे प्रचार करत होतो. परतीची वेळ रात्री उशिरा असे. 

आम्ही निमगाव सावा या गावामधील प्रचार संपवून रात्री ११ वाजता मंचरकडे परतीचा प्रवास करीत असता, रांजणी, कार फाटा सोडून जेमतेम एखादा किलोमीटर पुढे आलो असू इतक्यात दादांनी अर्जंट गाडी थांबवली. आमच्या जीपचे ड्रायव्हिंग करीत असलेले बाजीरावशेठ गुंजाळांनी दादांना विचारले, “दादा काय झाले ?” त्यावर दादा बोलले, “अरे समोरून एक लांडगा आडवा गेला. तो टोळीचा म्होरक्या आहे, तो सावज शोधायला गेला आहे अन्य साथीदार पाठीमागे थांबलेत. थोडावेळ थांबा तो परत येईल.” साधारण १०-१५ मिनिटात खरोखरच तो परत रस्ता ओलांडून गेला. मी म्हणालो, चला आता. तथापि दादा बोलले, “अरे त्याला जर सावज भेटले असेल तर तो सर्व साथीदारांना घेऊन पुन्हा सावज टिपण्यासाठी जाईल.” इतक्यात आश्चर्य म्हणजे एका पाठोपाठ एक असे १४ लांडगे आमच्या समोरून रस्ता ओलांडून गेल्याचे आम्ही सर्वांनी पाहिले. नंतर जीप सुरू करून थोडे पुढे गेलो. डाव्याबाजूस गरीब शेतकऱ्यांची घरे होती. दादांनी गाडी थांबविली व खाली उतरून मध्यरात्री १२.३० च्या सुमारास तेथील मंडळींना जागे केले व लांडग्यांची टोळी आली आहे, तुम्ही तुमच्या जनावरांची काळजी घ्या,” असे त्यांना सांगितले. आमचा प्रवास पुढे सुरू झाला. गाडीमध्ये दादांनी कधीकाळी वाचलेल्या एका इंग्रजी आफ्रिकन पुस्तकांमध्ये वाचलेल्या वर्णनाची माहिती आम्हाला सांगितली. काही दिवसांनी मी दादांकडे नेहमीप्रमाणे गेलो असता मी सहज लांडग्यांचा विषय काढला. त्यांनी त्यांचे पुस्तकाचे दालन उघडले पाहतो तर काय लायब्ररीच होती ती. पुस्तकांचा मोठा संच दोन भागामध्ये ठेवण्यात आला होता. त्यापैकी एका भागातून आफ्रिकन इंग्रजी पुस्तक शोधताना सांगितले की, “ही पुस्तके वाचून झाली आहेत व दुसऱ्या भागातील वाचावयाची आहेत.” मी सहज म्हणालो, दादा एवढी पुस्तके वाचन करावयास वेळ केव्हा मिळतो, तर ते म्हणाले, ‘मी जर रात्री झोपताना पुस्तक हातात घेतले तर ते पूर्ण करूनच झोपतो.” यावरून मला मात्र त्यांच्यातील गाढ्या अभ्यासकाची वास्तवता पटली अन् अचंबा वाटला. नंतर त्यांनी मला लांडग्यांच्या शिकारीचा भाग वाचावयास दिला. 

दादा म्हणजे हिमालयाच्या उंचीचा विद्वान नेता होता. त्यांच्याकडे भेदभाव तिळमात्र नव्हता. त्यांना शेतगड्यांबरोबर मांडीला मांडी देऊन जेवल्याचे मी डोळ्याने पाहिले आहे. त्यांना निमंत्रण मिळाल्यावर अगदी गरीबातल्या गरीबाकडेही ते अगत्याने जात असत. त्यांना त्यांच्या पदाचा यत्किंचितही गर्व नव्हता. त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येकाचा योग्य मानसन्मान, चहापान, उठबस होत असे. कधीही कुणाला सापत्न वागणूक मिळाल्याचे स्मरणात नाही. त्यांच्याकडे अन्य व्यवहाराचे एकदोन रुपये राहिले तरी आठवणीने पाठविण्यास ते विसरले नाहीत. त्यांनी उभ्या आयुष्यात भ्रष्ट पैशाला स्पर्श केल्याचे उदाहरण नाही. ते शुद्ध, स्वच्छ, चारित्र्यसंपन्न होते म्हणून कोठेही व कधीही स्पष्ट बोलण्यास कचरले नाहीत. कधीकधी त्यांच्या बोलण्याने लोक दुखावले जायचे. परंतु त्यापाठीमागील हेतू पाहिला तर ते समोरच्या व्यक्तीच्या हितासाठीच बोलायचे ही वस्तुस्थिती असायची. मात्र जी व्यक्ती त्यांच्या तत्वात पूर्ण बसलेली असे अशा व्यक्तीस त्यांनी कधीही दुखावले नाही. माझ्या बाबतीत सांगतो ही अतिशयोक्ती नसून वास्तविकता आहे. त्यांना मी पुत्रवत असूनही मला मात्र अखेरपर्यंत ‘दशरथराव’ म्हणूनच संबोधित केले व माझी पात्रता पाहून आमच्या १८/२० जणांच्या सामाईक शिवकृपा उपसा जलसिंचन सहकारी संस्थेचा सर्व व्यवहार ४ वर्षांपूर्वी अध्यक्षपदासह माझ्या हाती सुपूर्द केला व भ्रमणध्वनीवरून कळविले की, “ही संस्था निर्लेप आहे फक्त तुम्हीच तिचा यथायोग्य सांभाळ करू शकता, माझ्यासाठी ती तुमच्या ताब्यात घ्या.” दादा मी तुमच्या विश्वासाला कालत्रयी तडा जाऊ देणार नाही एवढे अभिवचन देऊन तुमच्या पुण्यस्मृतीस आदरांजलीचे हे फूल वाहतो.

Read more at Karmayogeee

]]>
https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8/feed/ 0