Karmyogee - Karmayogeee https://karmyogee.com Amadar Shivajirao Patil Tue, 30 Jun 2026 15:22:38 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.1 https://karmyogee.com/wp-content/uploads/2026/06/cropped-Karmayogi-Logo-92x92.jpg Karmyogee - Karmayogeee https://karmyogee.com 32 32 संपादकीय https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af/ https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af/#respond Mon, 08 Jun 2026 06:20:11 +0000 https://karmyogee.com/?post_type=docs&p=2159 Read more at Karmayogeee

]]>
संपादकीय 

८ जूनची ती काळरात्र संपताच सकाळी (९ जून) फोन आला. “दादा गेले”. “कशाने ?” “कळलेच नाही.” “पण सध्या ते आजारी होते का?” कारण आजारी असले किंवा प्रकृत्ती चिंताजनक असेल तर किमान मनाची तयारी तरी असते. हा ‘कर्मयोगी’ असा एकाएकी कसा काळाच्या पडद्याआड गेला ? हे तर कर्मयोग्याचं जाणं! 

माझ्यावर मोठा आघातच झाला. अशा वेळी मदतीला धावून आले ते ग. दि. माडगुळकरांचे शब्द… 

“मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा, 

दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. 

दादांवर प्रेम करणाऱ्यांचं सांत्वन करता आले तर एवढ्या शब्दानेच करता आलं असतं. दादांच्या आठवणींनी दचकायलाच झालं. मोठ्या काळाचा स्नेहबंध. त्यामुळे घरातील कुणीतरी दुरावल्याची बेचैनी मनावर आली. थोडा वेळ सुन्न बसून राहिलो. पण शेवटचे भेटायला हवे, या विचाराने उठलो आणि गाडी घेऊन तडक ‘शिवनेरी’ बंगल्यात पोहोचलो. तो पोहोचण्याचा छोटा काळही मोठा भासत होता. बंगल्यात गेलो तर दादा शांत, प्रसन्न चेहऱ्याने ‘चिरविश्रांती’ घेत होते. पंचवीस वर्षांहून अधिक काळ लोटला होता पण आज होत असलेल्या आमच्या गाठीभेटीत प्रथमच दादांकडून नेहमीचे स्वागत करणे घडत नव्हते. बंगल्यात मोठी गर्दी असूनही हालचाली मंदावलेल्या, संपूर्ण वातावरण जडपणाने भारलेलं. कोणी कोणाशी बोलत नाही. सारं कसं निःशब्द… साश्रुपूर्ण… 

अश्रूंनी डबडबलेल्या आणि भावनांनी उचंबळून आलेल्या माझ्या हृदयात त्याप्रसंगी अनेक चलचित्रे आणि गत आठवणींचे डोंगर उभे राहिले. कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, अत्यंत तत्त्वदर्शी, कडक शिस्तीचे शिक्षक, प्राचार्य ते सेवाव्रती आमदार आणि त्याहीपेक्षा माझ्यासारख्या अनेकांना अर्थपूर्ण जगणं शिकविणारे एक मार्गदर्शक आधारवड. समोर शरपंजरी पडलेल्या भिष्मासारखे महान भासू लागले. त्यांचं कार्य-कर्तृत्व, राजकारण, समाजकारण समोर दिसू लागले. उभी हयात स्वाभिमानाने वावरणारे आणि शिक्षण तसेच लोककार्यासाठी समर्पित जीवन जगून अन्याय, गुलामी लाथाडणारे त्यांचे विचार विजेसारखे मनात चमकू लागले. त्यांनी घडविलेल्या, अनेक ज्ञानक्षेत्रे पादाक्रांत करणाऱ्या समाजधुरिणांची मांदियाळीच डोळ्यांसमोर तरळू लागली आणि त्याचबरोबर एवढं मोठं डोंगराएवढं काम उभं करणाऱ्या शिक्षणमहर्षी, सेवाव्रती कर्मवीरांच्या प्रतीरुपाचा, क्रांतीचा विचार प्रेरणेच्या रुपाने येणाऱ्या नव्या भावी पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे, असं एक मन दुसऱ्या मनाला आर्जव, हट्ट करु लागले आणि त्याच वेळी दादांवर स्मृतिग्रंथ निर्मितीची कल्पना सुचली. 

मरणोपरांत इतर क्रियाकर्मे आटोपल्यानंतर दादांच्या सहकारी, स्नेही, विद्यार्थी, मान्यवर आणि कुटुंबीयांसमोर एकत्रितपणे स्मृतिग्रंथ निर्मितीचा विचार ठेवून सर्वांच्या प्रांजळ संमतीने स्मृतिग्रंथ प्रकाशित करण्याचा एकमुखी निर्णय घेऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. या स्मृतिग्रंथाच्या निमित्ताने आम्ही दादांच्या संपर्कातील राजकारणी, नेतेमंडळी, आमदार, खासदार, सहकारी, स्नेही, विद्यार्थी, शिक्षक व प्राध्यापक यांना भेटू लागलो, तसा तसा दादांचा मोठेपणा आभाळाला भिडू लागला. कुठेतरी या साऱ्यांचा मनातून हेवा वाटू लागला. कारण या सर्वांना दादांचा सहवास उदंड लाभला होता. खरंच खूप सुदैवी होती ही मंडळी ! एका धिरोदत्त तत्त्वज्ञानी… तरीही राजकारणी, समाजकारणी आणि एका शिक्षण धुरिणाचा सहवास त्यांना लाभला. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून दादा नावाचा गुलामीची, कर्मकांडाची ऐतिहासिक विकृतीची चिरफाड करणारा नायक समोर येऊ लागला; समाज जागृत करण्यासाठीचा त्यांचा संघर्ष समोर येऊ लागला. बुद्ध, चार्वाक, महावीर ते शिव-शाहू, फुले, आंबेडकरांचा पदपथ लक्षात येऊ लागला. 

हजारो वर्षांपासून या देशात सांस्कृतिक संघर्ष चालू आहे. त्या काळात येथील मूळ लोकसंस्कृती नष्ट करुन गुलामी लादण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्याविरुद्ध बुद्धापासून छत्रपती शिवरायांपर्यंत सर्वांनी आपले जीवन संघर्ष करुन संपविले आहे. या महापुरुषानंतर त्यांचे वंशज पुन्हा गुलामगिरीकडे गेले आहेत. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांना समजाऊन न घेणे. ज्यांच्यासाठी संघर्ष करावा तिच माणसे नादान निघतात. जिवंतपणी अहंकारातून विरोध करतात. त्यांच्यासाठी महामानवाचे ‘तीळ तीळ तुटणे’ व ‘लाभावीण प्रीती’ करणे त्यांना कळत नाही. पुन्हा पुतळा संस्कृतीचा, उत्सव, जयंत्या – मयंत्याचा उगम होतो, परंतु तेव्हा वेळ गेलेली असते. महापुरुषांना जिवंतपणे न स्वीकारणे हा येथील मराठा व बहुजन समाजाचा मोठा दुर्गुण आहे. त्यामुळे क्रांत्या असफल झाल्या आहेत. पुन्हा पुन्हा गुलामीकडे बहुजन समाजाची वाटचाल झाली आहे. यातून पुढे नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, दादांच्या कार्यकर्तृत्वातून क्रांतिकारी पदपथ निर्माण होऊन पथदर्शी पिढीचं निर्माण व्हावं. स्वराज्य-सुराज्य-शिवराज्य – शिवराष्ट्राच्या कल्पनांना बळ यावं यासाठी ‘कर्मयोगी आमदार शिवाजीराव पाटील’ हा प्रस्तुत स्मृतिग्रंथ प्रकाशित करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. 

दादांवर आधारीत स्मृतिग्रंथाचं संपादन होतंय, असं समजल्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून लेखांचा प्रचंड पाऊस पडला. आम्ही केलेले नियोजन व पानांची मर्यादा यामुळे सर्वच लेख प्रस्तुत ग्रंथात समाविष्ट करणे शक्य नव्हते. तसेच ग्रंथाचे काम पूर्ण झाल्यावरही काही मान्यवरांचे लेख मिळाले. वेळेअभावी त्यांचा समावेश यात करता आला नाही याचे शल्य राहिले. दादांच्या राजकारणी, समाजकारणी, तत्त्वज्ञानी, शिक्षक, प्राचार्य या ओळखीबरोबरही दादांची कौटुंबिक, पार्श्वभूमी माहित व्हावी म्हणून त्यांचे कौटुंबिक लेखही या ग्रंथात समाविष्ट केले आहेत. त्यामुळे वाचकांची जिज्ञासापूर्ती होईल, यात शंका नाही. शब्दमर्यादांच्या पलीकडचे ‘दादा’ हे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जीवनातील शेकडो पैलूंवर लेखन करता येईल. त्यांच्या एकंदर जीवनातील हा एक टक्काही भाग नाही, याची नम्र जाणीव आम्हाला आहे. 

या स्मृतिग्रंथासाठी लेख पाठविणाऱ्यांचे सहकार्य करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार! ग्रंथातील लेख व आशयाचे पुनरावलोकन, संस्करण, शुद्धलेखन आणि साहित्यमूल्य यासाठी मेहनत घेणारे बँक ऑफ बडोदाचे मुख्य व्यवस्थापक, मा. बळीराम आवटेसाहेब, यांना धन्यवाद देतो, त्यांना सहायक म्हणून काम केलेले डॉ. ज्ञानेश्वर थोरात, संत साहित्याचे अभ्यासक यांनाही मनःपूर्वक धन्यवाद देतो आणि संपादकीय मंडळातील सर्व सदस्यांच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद प्रकट करतो. 

प्रस्तुत ग्रंथसंपादनाला संमती देऊन सर्व प्रकारचे सहकार्य करणारे श्री. उदय शिवाजीराव पाटील, चि. रणजित, आई व सौ. छाया वहिनी यांचे आभार प्रकट करणे परकेपणाचे होईल. म्हणून त्यांच्या ऋणातच राहणे आत्मनंदाचे होईल. 

प्रस्तुत स्मृतिग्रंथ संपादनाचे शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी माझ्यावर टाकून दिलेले निरलस प्रेम व स्वातंत्र्याने माझा सन्मान वाढविल्याने मी संपादकीय मंडळाचा मनःपूर्वक कृतज्ञ आहे. 

प्रस्तुत स्मृतिग्रंथाने नवी पिढी क्रांतिकार्यासाठी चेतावी, सत्यासाठी, समृद्ध, मानवतावादी, शिवराज्याच्या निर्माणासाठी सिद्ध व्हावी व दादा त्यांचेसाठी कायम प्रेरणादायक राहतील, असा विश्वास वाटतो. कविवर्य नारायण सुर्वेच्या शब्दांत दादांचे प्रतिबिंब दिसते… 

“झूठ बोलून आयुष्य कुणालाही सजवता येते, 

अशी आमंत्रणे आम्हालाही आलीत, नाहीच असे नाही. असे किती हंगाम शीळ घालीत गेले घरावरून शब्दांनी डोळे उचलून पाहिलेच नाही, असे नाही. 

शास्त्राने दडवावा अर्थ, आम्ही फक्त टाळच कुटावे 

आयुष्याचा अनुवादच करा सांगणारे खूप, नाहीत असे नाही. अरे इमान विकत घेणारी दुकाने पाड्या पाड्यावर, डोकी गहाण टाकणारे महाभाग, नाहीत असेही नाही. अशा बेईमान उजेडात एक वात जपून नेताना, 

विझता विझता स्वतःला सावरलेच नाही, असेही नाही. ‘ 

।। जय जिजाऊ ।। ।। जय शिवराय. ।। 

ॲड. सुनील मा. बांगर 

(शिवचरित्र अभ्यासक), 

संस्थापक/अध्यक्ष-राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य. 

Read more at Karmayogeee

]]>
https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%af/feed/ 0
आमदार शिवाजीराव पाटील : व्यक्तित्त्व आणि कर्तृत्व https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b5%e0%a5%8d/ https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b5%e0%a5%8d/#respond Mon, 08 Jun 2026 06:24:14 +0000 https://karmyogee.com/?post_type=docs&p=2161 Read more at Karmayogeee

]]>
आमदार शिवाजीराव पाटील : व्यक्तित्त्व आणि कर्तृत्व 

महाराष्ट्राच्या कर्मभूमीत सामाजिक आणि शैक्षणिक परिवर्तनाच्या संदर्भात विचारसरणीचा तेजस्वी वारसा लाभलेले थोर महापुरुष उदयाला आले आणि आपल्या कर्तृत्वाने मानवजातीच्या उद्धारार्थ प्रेरणादायी जीवन जगले, अशा महापुरुषांपैकी शिक्षक आमदार शिवाजीराव पाटील तथा दादा एक कर्तृत्ववान प्रभावी व्यक्तिमत्त्व होते. 

शिक्षक आमदार शिवाजीराव पाटील तथा ‘दादा’ यांना लाभलेला कौटुंबिक वारसा अत्यंत उज्ज्वल आणि वैभवशाली होता. त्यांचे आजोबा अर्थात विदर्भातील नगरपालिका असलेले खामगाव जि. बुलढाणा येथील जमीनदार खंडेराव बोबडे होते. त्यांना ९०० एकर जमीन होती. एक बागायतदार शेतकरी म्हणून त्यांचा लौकिक सर्वदूर पसरला होता. अर्थात दादांचे आजोळ सर्वांगाने आणि सर्वार्थाने अत्यंत श्रीमंत होते. घोडागाडी, बग्गी, नोकर-चाकर आणि विशाल हवेलीवजा मोठा बंगला अशी वैभवसंपन्नता त्यांना लाभली होती. त्यांचे बंधू बाजीराव बोबडे विदर्भातील नावाजलेले ख्यातनाम वकील होते. त्यांचा वकिली क्षेत्रातील लौकिक सर्वांच्या आदराचा आणि आस्थेचा विषय होता. खंडेराव बोबडे ह्यांना दोन मुली आणि एक मुलगा होता. त्यापैकी ज्येष्ठ कन्या भागीरथी ह्या दादांच्या मातोश्री. भागीरथीबाईंचा जन्म बोबडे कुटुंबात प्रथम झाला म्हणून त्या सर्वांच्या लाडक्या होत्या. भावाचे नाव प्रतापराव आणि बहिणीचे नाव वत्सला असे होते. अशी तीन अपत्ये. बाजीरावांना चार मुले आणि तीन मुली होत्या. दोन्ही भाऊ प्रतापराव आणि शंकरराव एकत्रीत राहत होते, कुटुंब मोठे होते. शंकरराव पुढे खूप वर्षे खासदार होते. नगराध्यक्ष आणि महाराष्ट्र कॉटन फेडरेशनचे अध्यक्ष होते. अत्यंत वैभवशाली आणि शैक्षणिकदृष्ट्या विकसित झालेल्या प्रगतशील शेतकरी कुटुंबातील खंडेराव बोबडे ह्यांची ज्येष्ठ सुकन्या भागीरथीबाई आणि मंचरचे थोर शिक्षण महर्षी भाऊराव गेणूजी पाटील ह्यांच्या पोटी दिनांक १२ नोव्हेंबर, १९२९ रोजी दादांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगावी झाला. दादांना हा वैदर्भीय वारसा लहानपणापासूनच लाभला होता. विदर्भातील उदात्त गुण दादांच्या व्यक्तिमत्त्वात उतरले होते. वैदर्भीय मनाचा मोठेपणा आणि विशालता, दानशूरता आणि विचारशीलता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव झाला होता. त्यांची राहणी साधी असली तरीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वैभवसंपन्नतेची झालर होती. हे गुण जणू त्यांच्या मातेच्या उदरातूनच त्यांना उपजत प्राप्त झाले होते. त्यांचे काही वर्षांचे बालपण खामगावीच गेले होते. 

दादांचे वडील भाऊराव गेणूजी पाटील तथा बी. जी. पाटील उच्च विद्याविभूषित होते. त्यांचे बी. ए., एल. एल. बी. पर्यंत शिक्षण झाले होते. त्यांचा भाऊ आजारी पडल्यामळे त्यांना एल. एल. बी. ची शेवटची परीक्षा देता आली नाही. अर्थात वकिली करता येणार नाही, हे निश्चित झाले होते. भाऊरावांनी शिक्षक व्हायचे ठरविले. त्यांना नाशिकला हायस्कूलवर नोकरी मिळाली. पगार महिना रुपये ४० असा होता. भाऊरावांनी आपले कुटुंब नाशिकला हलविले. लवकरच त्यांना वणीच्या श्री. रावसाहेब थोरात ह्यांनी महर्षी शिंदे ट्रेनिंग कॉलेज, नाशिक येथे प्राचार्य म्हणून नियुक्त केले. त्यामुळे दादांचे बालपण व प्राथमिक शिक्षण नाशिकला झाले. शिवाजीराव पाटील हे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव होते. 

सन १९४७ ला देश स्वतंत्र झाला. “कसेल त्याची जमीन’ असा कायदा आला म्हणून भाऊरावांना नाशिक सोडून मंचरला यावे लागले. त्यांनी मंचरचा शैक्षणिकदृष्ट्या कायापालट कारायचे ठरविले. कर्मवीर भाऊराव पाटील ह्यांचे अनुयायित्व स्वीकारून त्यांनी रयत शिक्षण संस्थेला वाहून घेतले. त्यांनी आपल्या मुला-मुलींना शिक्षणाचा उदंड वारसा दिला. दादांचे माध्यमिक शिक्षण मंचरलाच झाले. 

महाविद्यालयीन शिक्षणासाठी फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथे प्रवेश घेतला आणि बी. ए. ची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांची पायलट म्हणून निवड झाली होती. परंतु दादांचे पिताश्री कर्मवीर भाऊराव पाटलांचे अनुयायी होते. कर्मवीर भाऊराव पाटलांचा सहवास दादांनी तरुणपणातच अनुभवला होता. शिवाय त्यांनी ‘संस्थेच्या कार्याला आजन्म वाहून घ्यावे,’ अशी तीर्थरूप कर्मवीर अण्णांची मनिषा होती. स्वाभाविकपणे श्रेष्ठांच्या मनोकामनेचा आदर करून दादांनी शिक्षक होण्याचे मनोमन ठरविले. त्यासाठीचे प्रशिक्षण घेण्यासाठी छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे त्यांनी बी. टी. करण्यासाठी प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी रनिंग, क्रॉसकंट्री, फुटबॉल, स्विमिंग, कुस्ती, वेट लिफ्टींग इत्यादी खेळात प्राविण्य संपादित केले आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधला. 

जडणघडणीच्या या काळात त्यांनी फार मोठा मित्र परिवार मिळविला आणि तो आयुष्यभर जपला. सातारा येथे असताना त्यांनी अण्णांच्या ‘कमवा आणि शिका’ ह्या योजनेतूनच शिक्षण घेतले. त्या काळापासून त्यांच्या कानामनावर कर्मवीर अण्णांच्या विचारांचा विलक्षण प्रभाव पडला. बॅ. पी. जी. पाटील, बॅ. सौ. सुमतीबाई पाटील, डॉ. एन. डी. पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील ह्यांचे त्यांना विचारसानिध्य लाभले. त्यांनी ह्याच काळात प्राचार्य नारायणराव भगरे (पंढरपूर), श्री. खवरे (वाळवा), प्रा. केरूळकर (पुणे), श्री. शिंदे सरकार ( पुणे), श्री. भालू भागवत, श्री. ए. के. घोरपडे (सातारा) अशी जिवलग मित्रमंडळी जोडली. याच काळात त्यांनी भटकंती, गाठीभेटी, संघटना, मित्रमंडळे स्थापन करून विचारांचे आदानप्रदान केले आणि आपल्या नेतृत्वगुणांचा विकास केला. त्यांचा शैक्षणिक प्रवास हा ऊर्जा अर्जित करणारा उपक्रम होता. भविष्याचा वेध आणि वर्तमानाचे भान त्यांनी कधीच सुटू दिले नाही. प्रत्येक पाऊल विकासाच्या दिशेने ठेवण्याचा त्यांचा ध्येयध्यास हा विलक्षण होता. भान ठेवून योजना आखणे आणि बेभान होऊन तडीस नेणे असा त्यांचा दुर्दम्य उत्साह कधीच क्षमला नाही. वाशिम येथील डॉ. गोविंदराव चव्हाण यांची सुकन्या डॉ. लीलाबाई ह्यांच्या बरोबर त्यांचा विवाह २५ मे, १९५७ रोजी झाला. पत्नी सेवाभावी, सुलक्षणी आणि व्यवसायाने डॉक्टर असल्याने दादांच्या जीवनात लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या पत्नीने दादांच्या कार्याला सर्वार्थाने वाहून घेतले. त्यांचे आचारविचार ध्यानी घेऊन त्यांच्या संकल्पित कार्याला सदैव परिश्रमपूर्वक आणि नियोजनपूर्वक साथ दिली. 

शैक्षणिक व सामाजिक कार्य 

‘“शिक्षणाने नवसमाज निर्मिती करता येते”, असे शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील ह्यांनी प्रतिपादन केले होते. त्यानुसार बहुजन समाजाच्या उद्धारासाठी ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार व्हावा, ह्या उदात्त हेतूने मंचरसारख्या ग्रामीण भागात भाऊराव गेणूजी पाटील यांनी इ.स. १९५० साली महात्मा गांधी विद्यालय सुरू केले. इमारत नसल्याने गावातील जुने वाडे, मंदिरे ह्या ठिकाणी वर्ग भरत असत. वडिलांच्या इच्छेनुसार आणि कर्मवीर भाऊराव पाटलांच्या उपदेशानुसार शिवाजीराव पाटील तथा दादा रयत शिक्षण संस्थेत शिक्षकाच्या भूमिकेला अनुसरले. अल्पावधितच त्यांच्यावर मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. ती त्यांनी समर्थपणे पार पाडली. वक्तशीरपणा, सचोटी, प्रयोगशीलता, खिलाडूवृत्ती आणि नीटनेटकेपणा इत्यादी गुणांच्या जोरावर एक ‘आदर्श प्राचार्य’ म्हणून त्यांनी संस्था पातळीवर लौकिक संपादन केला. महाळुंगे पडवळ, विंचूर, हडपसर व मंचर इत्यादी ठिकाणी त्यांनी एक यशस्वी प्राचार्य म्हणून अलौकिक असे यश संपादन केले. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील ह्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांचाच एक निष्ठावान अनुयायी म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या विकास आणि विस्तारकार्यास दादांच्या मार्गदर्शनाचा निश्चित लाभ झाला. 

महाळुंगे पडवळ येथे विद्यालयाच्या इमारतीसाठी जागा मिळवून प्रत्यक्ष इमारत उभी करण्यापर्यंत ग्रामस्थांचा सर्व प्रकारचा सहभाग आणि सहकार्य मिळविण्यात दादा यशस्वी झाले. अनेक कर्तृत्ववान विद्यार्थी विद्यार्थिनींना दादांनी येथे घडविले. श्री. के. डी. शिंदे, श्री. बळीराम आवटे व श्री. आर. टी. पोखरकर ह्यासारखे उच्चपदस्थ अधिकारी दादांनी येथे घडविले. विंचूर (नाशिक) सारख्या ठिकाणी माळरानावर विद्यामंदिर उभारण्याचे काम करून एक आदर्श निर्माण केला. अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत असताना उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी म्हणून स्वतःच्या रचनात्मक कार्याचा ठसा उमटविला. स्वतंत्र बाण्याचे, करारी वृत्तीचे परंतु तेवढेच प्रेमळ असणारे प्रशासक म्हणून नेत्रदीपक अशी कामगिरी केली. वडिलांच्या शिक्षणप्रसार कार्याचा वसा व वारसा अतिशय समर्थपणे चालविण्याचे कार्य दादांनी अविरतपणे केले. कर्मवीरांच्या संस्कारात वाढल्याने एक व्रतस्थ प्राचार्य व कुशल प्रशासक म्हणून दादांनी रयत परिवारात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. त्याचीच परिणती म्हणून पुढे रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. 

दादांचा सुवर्णकाळ म्हणजे साधना विद्यालय, हडपसर येथे त्यांनी केलेली शिक्षण साधना होय. खडक फोडून त्यावर ज्ञानमंदिर उभारण्याचे काम ग्रामस्थांच्या सहकार्याने करत सेवक सदनिका बांधण्याचे प्रयोगशील कार्य दादांनी साधना विद्यालयात केले. शालेय परिसरात राहिल्याने कला, क्रीडा व सांस्कृतिक गुणांना वाव देण्याचे काम व अधिकचा वेळ देण्याचा हेतू सफल होतो. विद्यार्थी, शिक्षक व समाजाचे नाते अधिक दृढ होण्यास मदत होते. आदर्श शैक्षणिक संकुल म्हणून विकास करताना, जलतरण तलाव, प्रशस्त मैदान, ग्रंथालय, क्रीडा संकुल आदी सुविधा प्रतिकूल परिस्थितीतून निर्माण केल्या. स्वतः स्वावलंबनाचे धडे देत विद्यार्थी वर्गात लोकप्रियता मिळवून समाजप्रेमी प्राचार्य म्हणून कीर्ती संपादन केली. त्यांच्या हातून पुणे येथील मुख्याध्यापक भवन, शिक्षक संघटना, शिक्षकांच्या समस्या, सेवाशाश्वती, शिक्षणासंबंधी चळवळ इत्यादी कार्य साधना विद्यालयात असतानाच झाले. त्यातूनच विधानपरिषदेवर शिक्षक आमदार म्हणून १९८४ साली ते निवडून आले. त्यांनी सभागृहात अभ्यासपूर्ण भाष्य करणारे शिक्षक प्रतिनिधी म्हणून नावलौकिक मिळविला. तसेच विविध विषयांवर प्रश्न विचारून शिक्षण क्षेत्राला एक दिशा दिली. ते एक दूरदर्शी नेता म्हणून उदयाला आले. याच काळात शेतकरी व कामगार ह्यांच्या समस्या मांडणारे प्रभावी आमदार म्हणून ख्याती मिळविली. शाळा मान्यतेचे निकष आणि त्या प्रश्नातील अडचणी दूर करत अनेक शाळांना मान्यता मिळवून देण्याचे कार्य केले. त्यातूनच विविध सामाजिक प्रश्नांवर आवाज उठविणारे शिक्षक आमदार म्हणून त्यांची सभागृहाला ओळख झाली. 

मंचर ही दादांची जन्मभूमी आंबेगाव तालुक्यात असल्यामुळे त्यांनी नाला बंधारे, केटी बंधारे बांधले. त्यामुळे तालुक्यात पाणी टंचाईचा प्रश्न निकालात निघाला. असा दूरदृष्टिकोन मनी मानसी बाळगून शेतीला पाणीपुरवठा केला. त्यातून त्यांचा सामाजिक दृष्टिकोन किती व्यापक होता ? याचे प्रत्यंतर येते. आज आंबेगाव तालुका हिरवागार पहावयास मिळतो त्यासाठी दादांनी अपार कष्ट घेतले आहेत. मंचर येथे महात्मा गांधी विद्यालय इमारत बांधकाम, मैदान विस्तार, स्वतंत्र प्रयोगशाळा इत्यादी कामात लक्ष घालून साधना विद्यालयाप्रमाणे एक आदर्श विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय साकारण्याचे महत्त्वपूर्ण कार्य दादांनी केले. प्राथमिक विद्यालय आणि सेमी इंग्लिश स्कूलचे वर्ग त्यांनी प्रथम मंचर येथे सुरू करून ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण व इंग्रजी शिक्षणाची सोय केली. आज एक दर्जेदार विद्यालय म्हणून शासन दरबारीसुद्धा मंचरची दखल घेतली जाते. यात दादांच्या दूरदर्शीपणाचा प्रत्यय येतो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या गुणवत्ता वाढीसाठी दादांनी खूप नियोजनपूर्वक मार्गदर्शन केले. आजही त्या गुणवत्तेचा लौकिक संपूर्ण जिल्ह्यात झाला आहे. ते रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष असताना मंचर येथील विस्तारित अठरा खोल्यांची इमारत पूर्णत्वाला गेली. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक रयत सेवकांना प्रेरणा मिळाली आणि मार्गदर्शनाचा उपयोग झाला. अनेक प्राचार्य, प्राध्यापक, अध्यापक, लेखनिक, सेवक व कर्मचारी ह्यांना दादांचे सर्वप्रकारचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. 

अण्णासाहेब आवटे महाविद्यालय हे उत्तर पुणे जिल्ह्यातील शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला आले आहे. त्याच्या उभारणीत १९६६ पासून दादांनी सक्रिय सहभाग घेतला. महाविद्यालयाचा विस्तार आणि विकास आज एकशे पाच एकर क्षेत्रात झाला आहे. पुणे विद्यापीठात ह्या महाविद्यालयाचा लौकिक वाढविण्याठी दादांनी सदैव कृतियुक्त मार्गदर्शन केले. प्रत्येक विकास कामात आपला सहभाग दाखविला. सेवानिवृत्तीनंतरही जीवनाच्या अखेरच्या दिवसापर्यंत त्यांनी आपल्या विकासकार्यात अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाला सर्वोच्च प्राधान्य दिले होते. तरुणांच्या आशा- आकांक्षाचे स्फूर्तिस्थान म्हणून ते ह्या महाविद्यालयाकडे पाहत असत. 

निवृत्तीनंतरही त्यांनी शिक्षक संघटनांना दिशा दिली. मोर्चे, आंदोलने करुन लढा उभारला व शासनदरबारी सनदशीर मार्गाने प्रत्येक शैक्षणिक प्रश्न मार्गी लावला. ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या पटांगणावर अखिल महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ह्यांच्यासमवेत नेतृत्व करत शिक्षक संघटनेला गती आणि दिशा दिली. शासन स्तरावर केलेल्या कामांपैकी सेवा शाश्वती, ग्रंथालय अनुदान, विनाअनुदान शाळासंबंधी अनेक प्रश्नांचा त्यांनी पाठपुरावा केला. ९० च्या दशकानंतर शाळाशाळांतून मार्गदर्शन करत शिक्षक विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्याचे काम दादांनी सातत्याने केले. सामाजिक कामातही त्यांनी सहभाग घेतला. मा. खासदार किसनराव बाणखेलेंसारखे नेतृत्व उभे करण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्यामध्ये गुरु-शिष्य नाते होते. मंचरसारख्या वाढत्या शहरात सदैव शांतता राखण्यासाठी शांतता कमिटीच्या माध्यमातून लोकसमूहाला एक शिस्त लावून दिली. सार्वजनिक उत्सव, सण-समारंभ, इत्यादी प्रसंगी दादांचे मार्गदर्शन लोकसमूहाला दिशादर्शक ठरत असे. मंचरच्या प्रत्येक ग्रामसभेला ते उपस्थित राहत व मार्गदर्शन करत. समाज बांधणीचे महत्त्व लक्षात घेता दादांनी एकूण शिस्त, कामाची नियोजनपूर्वक आखणी इत्यादी बाबींवर जोर दिला आणि मार्गदर्शन करताना विविध प्रकारचे समर्पक असे दृष्टान्त, दाखले देऊन त्यांनी सामाजिक उद्बोधन केले. 

त्यामुळे त्यांची छोटी छोटी भाषणेसुद्धा समूहाला अचूक दिशा देणारी ठरली आणि सुदृढ समाज निर्माण झाला. सामान्य जनतेलाही त्यांचे निवासस्थान ‘शिवनेरी’ मोठा आधार वाटे. हितोपदेश देणारे, सर्वांना प्रेरणा देणारे आणि प्रबोधन करणारे वास्तुकेंद्र म्हणून त्यांचा “शिवनेरी” हा बंगला ठरत आहे. ग्रामस्थांना मार्गदर्शन करून शिक्षणाचे महत्त्व प्रतिपादन करून त्यांनी चांडोली बुद्रुक आणि वडगाव काशिंबेग येथे मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या भाग शाळा प्रयत्नपूर्वक काढल्या. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील आदिवासी समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी ते सतत झटले. आसाणे, माळीण, जांभोरी येथे रयत शिक्षण संस्थेची विद्यालये उभी केली. नारोडी येथील मुक्तादेवी विद्यालय व रांजणी येथील नरसिंह विद्यालय या खासगी शाळा होत्या. त्यांनी ग्रामस्थांचे सहकार्य मिळवून त्या शाळा रयत शिक्षण संस्थेला जोडल्या. 

थोडक्यात आज आंबेगाव तालुक्याचा जो शैक्षणिक आणि सामाजिक विकास झाला त्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या सर्वाधिक शाखा आंबेगाव तालुक्यात सुरू करण्यात दादांचे पिताश्री भाऊराव गेणूजी पाटील आणि स्वतः दादांचे मोठे योगदान आहे. तालुक्याच्या विकासात पाटील घराण्याचे कृतियुक्त योगदान अत्यंत प्रेरणादायी ठरले आहे. 

क्रीडाप्रेम आणि धोरण 

दादांना खेळांची खूप आवड होती. महाळुंगे पडवळ येथे सन १९६३ ते ६८ च्या काळात त्यांनी खेळाडूंना स्पाईक्स शूज, शॉर्टस्, टीशर्टस्, बास्केट बॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, बॉक्सिंग कीट इत्यादी उपलब्ध करून दिले आणि ग्रामीण भागात प्रथम शहरी खेळांची आवड निर्माण केली. डबलबार, सिंगलबार मैदानावर उभारले होते. व्यायाम साहित्यही त्यांनी खेळाडूंना उपलब्ध करून दिले. खेळाच्या बाबतीत महाळुंगे पडवळ येथील हुतात्मा बाबू गेनू विद्यालयाचा दबदबा होता. कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल आणि मैदानी स्पर्धांमध्ये खेळाडू निष्णात असत. एन.सी.सी., आर्मी आणि नेव्हीचे विभागही सुरू केले. 

हडपसर येथे साधना विद्यालयात जिम्नॅशियम, स्विमिंगपूल, प्रशस्त मैदान आणि मुबलक खेळ साहित्य आणि इतर सुविधा त्यांनी खेळाडूंसाठी पुरविल्या होत्या. कर्मवीर क्रीडामंडळालाही त्यांनी ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. श्री. पी. डी. राऊत, श्री. सूर्यवंशी एस. ए. व श्री. साळुंखे तात्यासारखे क्रीडाप्रेमी उभे केले होते. त्यांना खूप प्रोत्साहन दिले. फुटबॉल, हॅन्डबॉल आणि कबड्डीचे अनेक कसदार संघ तयार केले. 

इ.स.१९८६ ला क्रीडाप्रेमी दादा मंचरला प्राचार्य म्हणून आले. महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय मंचर येथील दोन टप्प्यात असलेल्या मैदानाचे सलग एकत्रीकरण करून सपाटीकरण केले. त्यावर कबड्डी खो-खो, व्हॉलीबॉलची मैदाने तयार केली. 

एकदा खेळाच्या मैदानावरून फेरफटका मारताना त्यांनी क्रीडासाहित्याच्या खोलीत प्रवेश केला. क्रीडाशिक्षक श्री. टी. डी. जाधव तेथे उपस्थित होते. त्यांनी विनयाने खेळ साहित्य दादांना दाखविले. दादा म्हणाले, “सर, साहित्य मांडणी छान आहे. परंतु वापरून बाद झालेले साहित्य कोठे आहे ?” जाधव सरांना बाद साहित्य दाखविता आले नाही. दादा उद्गारले, “साहित्य फक्त जपून ठेवू नका सर ! खेळाडूंना द्या. तुटू द्या, खेळाडूंना साहित्य कमी पडता कामा नये. आपण नवीन साहित्य खरेदी करू.’” बाजूला उपस्थित असलेल्या श्री. बाळासाहेब खानदेशे ह्यांना उद्देशून ते म्हणाले, ‘खेळाडू तयार झाले पाहिजेत. त्यासाठीच तर तुम्ही येथे आहात.” ह्या प्रसंगावरुन दादांचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. श्री. बाळासाहेब खानदेशे आणि सौ. कमल खानदेशे ह्यांनी दादांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणा आणि स्फूर्ती घेऊन महात्मा गांधी विद्यालयाचे खेळाडू राष्ट्रीय पातळीवर सातत्याने चमकवले आहेत. खेळाडूंच्या विजयाची वार्ता दादांनी ऐकली की ते शिक्षक आणि खेळाडूंच्या पाठीवर हात ठेवून कौतुक करायला विसरत नसत. श्री. बाळासाहेब खानदेशे ह्यांनी दादांच्या प्रेरणेने मंचर येथे महाराणा प्रताप संस्था स्थापन केली. दादांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी कबड्डी, खो-खो आणि मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. खेळासंबंधी त्यांचे धोरण उदारमतवादी होते. खेळाडूंना चांगली व्यायामशाळा असावी, चांगले जिम्नॅशियम असावे म्हणून मंचर येथे त्यांनी बहुउद्देशीय क्रीडा संकुलाची पायाभरणी केली. त्यासाठी केंद्रसरकारकडून निधी मिळविला. उत्कृष्ट हॉलची निर्मिती त्यांच्याच प्रेरणेने झाली. 

क्रीडास्पर्धांना ते नेहमी भेट देत. सामने पाहणे, पुढे काय होईल? ह्याचा अंदाज बांधत ते खेळाची समीक्षा करत. कुस्ती हा त्यांचा आवडता खेळ होता. खेळाविषयी त्यांच्या मनात कमालीचे आकर्षण होते. खेळाचे प्रेम त्यांनी आपल्या कुटुंबियांच्या मनात आस्था निर्माण करून जोपासले होते. धावण्याचे महत्त्व त्यांनी त्यांचे चिरंजीव अभयला सांगितले होते. अभय धावण्यात हरणाची बरोबरी करेल असा चपळ होता. तो सी. एस. एम. होता. त्याने दिल्लीला आर. डी. परेड अर्थात रिपब्लिक डे परेड केली होती. त्यांचे चिरंजीव उदय आणि त्यांचे सर्व कुटुंब योगासने आणि प्राणायाम नियमित करणारे आहेत. त्यांची योगिक जीवनशैली अभिनव आहे. 

तरुणांना आदेश देताना ते नेहमी म्हणत, “मन, मनगट आणि मस्तकाचा विकास करावयाचा असेल तर तुम्हाला खेळण्यावाचून पर्याय नाही.’ ‘तरुणांचा आहार उत्तम असावा, शरीर सुदृढ असावे, खेळाडूंनी चांगली पुस्तके वाचावीत, वाचनालयात जावे’, अशी त्यांची शिकवण होती. “व्यायामात मन गुंतून ठेवले की माणूस व्यसनात गुंतत नाही’,असे ते नेहमी सांगत. दादांची शरीर प्रकृत्ती उत्तम होती. सेवानिवृत्तीच्या आदल्या दिवशी ते उत्तम व्हॉलीबॉल खेळले. क्रीडाशिक्षक श्री. बाळासाहेब खानदेशे ह्यांनी मारलेला स्मॅश त्यांनी एका हाताने रिटर्न केला होता. त्यांची शारीरिक क्षमता अफाट होती. 

नियमित व्यायाम करणे ही त्यांची नित्याची सवय होती.” ज्या देशाची मैदाने खेळाडूंनी सतत गजबजलेली असतात त्या देशाच्या सीमांवर महायोद्धयांची कमतरता भासत नाही,’’असे ते नेहमी म्हणत. 

सामुदायिक विवाह चळवळ 

अलीकडच्या काळात सामुदायिक विवाहाचे अनेक सोहळे आयोजित केले जातात. वधुवरांना संसारोपयोगी साहित्य, मणी-मंगळसूत्रही दिले जाते त्यासाठी वधुवरांना काही अटी पूर्ण कराव्या लागतात. वराचे वय २१ तर वधूचे वय १८ वर्षे पूर्ण असावे लागते. वधुवरांची शारीरिक व मानसिक अवस्था लग्नासाठी अनुकूल असावी, अशी त्यामागील कायद्याची भूमिका असते. 

सामुदायिक विवाह चळवळ आणि तिची अपरिहार्यता दादांनी स्वतः रचनात्मक कार्य करून सिद्ध केली होती. हुतात्मा बाबू गेनू विद्यालयाचे प्राचार्य असताना महाळुंगे पडवळ येथे त्यांनी दिनांक २९ फेब्रुवारी १९६४ रोजी पाच जोडप्यांचा विवाह सामुदयिकरीत्या लावून दिला होता. शिवाय हा सामुदायिक विवाह विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात पार पडला. कर्मवीर भाऊराव पाटील ह्यांचे चरित्रलेखक व प्रसिद्ध वक्ते श्री. ए. के. घोरपडे ह्यांनी मंगलाष्टके म्हटली होती. फोटोसाठी पुण्याचे सिसोदे फोटोग्राफर म्हणून उपस्थित होते. त्या विवाह सोहळ्याचे फोटो उपलब्ध आहेत. रयत शिक्षक श्री. वि. शं महामुनी ह्यांचा विवाह या सामुदायिक विवाह सोहळ्यात पार पडला. ते ह्या घटनेचे साक्षीदार आहेत. 

दादांचे सांस्कृतिक कार्य 

शिवाजीराव दादा हे व्यक्तिमत्त्व असे होते की, स्वतः कोणाला काही सांगण्याबरोबरच इतरांचे विचार ऐकण्यात त्यांना रस होता. जेथे काही चांगलं ऐकायला मिळेल ते कान देऊन ऐकत असत. मग ते एखाद्या नामांकित वक्त्याचे भाषण असो की एखाद्या विद्यार्थ्याचे निरोप समारंभातील मनोगत असो. त्याचे मुद्दे काढत आणि आवर्जून त्यांचा उल्लेख स्वतःच्या भाषणात ते करीत असत. मंचर येथील शिव व्याख्यानमाला असो की अण्णासाहेब आवटे कॉलेजवर एखाद्याचे भाषण असो दादांची हजेरी त्या ठिकाणी सौभाग्यवती वहिनींना घेऊन असायची. कारण वहिनींनाही त्याची आवड असायची. एखादा वक्ता आपले विचार अतिशय प्रभावीपणे मांडत असताना दादा त्याला दाद द्यायचे, एवढेच नव्हे तर इतर शाळेतील, कॉलेजमधील शिक्षकांना ते “अमूक वक्त्याला बोलवा आणि त्यांचे विचार मुलांना ऐकवा.” असे नेहमी सूचवत. अनेकवेळा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते त्यांच्या घरी वास्तव्यास असत व परिसरातील शाळा कॉलेजात मुलांना व्याख्याने देत असत. 

सांस्कृतिक कार्यक्रमांच्या संदर्भात त्यांना आपली आवड फार जवळून जरी जोपासता आली नसली तरी पारितोषिक वितरण समारंभावेळी त्यातील सहभागी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक त्यांच्याकडून होत असे. महात्मा गांधी विद्यालय व प्राथमिक विद्यालय, मंचर यांनी सादर केलेले कार्यक्रम ते पाहायचे आणि खूप प्रेमाने त्या मुलांना जवळ घेऊन त्यांचे व त्यांच्या शिक्षकांचे कौतुक करायचे. त्यांना खाऊसाठी रोख रक्कम द्यायचे. रयत शिक्षण संस्था, सातारा येथे ९ मे रोजी अण्णांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला रात्री १२ वाजेपर्यंत हजेरी लावणारे दादा आम्ही सर्वांनी पाहिले आहेत. 

स्वतः एक उत्तम खेळाडू असल्यामुळे खेळाडुंविषयी त्यांना विशेष आत्मियता असायची. ते स्वतः विजयी खेळाडूंचे कौतुक करायचे व इतर मुलांनाही खेळात भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करायचे. सांस्कृतिक असो वा क्रीडा समारंभ असो असे उद्घाटन हे दादांनीच करावे अशी सर्वांची इच्छा असायची व पारितोषिक त्यांच्या हातून मिळावे, आपले कौतुक व्हावे असं विद्यार्थ्यांनाही वाटायचे. कलादालनाचे उद्घाटन जेव्हा दादा करायचे तेव्हा टाकाऊपासून टिकाऊ काही वस्तू पाहिल्यानंतर दादांच्या चेहऱ्यावर कौतुकाचे व आश्चर्याचे स्मित हास्य असायचे. 

‘वाचाल तर वाचाल’ ह्या उक्तीचा पुरेपूर प्रत्यय त्यांच्या वाचनाच्या व्यासंगातून दिसायचा. किती आणि काय काय वाचले ? याचे प्रत्यंतर त्यांच्या भाषणातून, लेखनातून व चर्चेतून यायचे. अनेक उदाहरणे त्या वाचनातील असायची. अगदी लेखक, पुस्तकाचे नाव, पान क्रमांकासह उल्लेख असायचे. विद्यार्थ्यांनीही नेहमी वाचन करावे असा त्यांचा आग्रह असायचा. नामांकित लेखकांची पुस्तके त्यांच्या संग्रही असत. नित्यनेमाने त्याचे वाचन ते करायचे. त्यातील विशेष मजकूर अधोरेखित करण्याची त्यांना सवय होती. त्याचे टिपण काढत व प्रसंगानुरूप ते त्याचा उल्लेख करत असत. अगदी कोणतेही वाचनीय साहित्य दादांकडे येवो, मग एखादा शैक्षणिक क्षेत्रातील शासनाचा जी. आर. असो, एखाद्या संघटनेची कार्यपुस्तिका असो किंवा शैक्षणिक संघटनांचे अंक असोत, सगळं अगदी बारकाईने ते वाचत असत. रात्री उशिरापर्यंत लेखन, वाचन करणे, पहाटे ४ वाजता उठून पुन्हा वाचन लेखन करणे असा त्यांचा नित्यक्रम असे. कारण एवढा मोठा सामाजिक शैक्षणिक प्रपंच सांभाळूनही ते वाचन संस्कृती जपत असत. त्यांचे हस्ताक्षर मोत्याप्रमाणे स्वच्छ व सुंदर होते. 

वाचक म्हणून दादांनी आपली श्रीमंती जोपासली. “साहित्य, कला, संस्कृती, संगीत, नाट्य ह्यातल्या एखाद्या कलेशी मैत्री जमवा, पोटापाण्यासाठी हा उद्योग तुम्हाला जगवेल. पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल,” असे ते नेहमी म्हणत. त्यांची सुखाची कल्पना ‘परिपूर्ण दुसऱ्यांसाठी जगणं’ अशी होती. एकसंघ संस्कृती जपण्याचा दादांचा आग्रह असायचा आणि म्हणूनच मंचरमधील मुस्लीम बांधवांच्या सणांना त्यांना बधाई देण्यासाठी, त्यांच्यात सहभागी होण्यासाठी त्यांच्या इफ्तार पार्टीला आवर्जून उपस्थित राहून दादा सांस्कृतिक सलोखा जपत. मंचरच्या धार्मिक व सांस्कृतिक जडणघडणीतही दादांचा मोठा वाटा असे. मराठी साहित्याची आवड असणारे, त्याच्याशी निगडित असणारे दादा म्हणजे एक सांस्कृतिक रसायनच होते. 

संघटनात्मक कार्य 

महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचे लाडके नेते शिक्षक आमदार व महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टी. डी. एफ.) चे माजी अध्यक्ष शिवाजीराव पाटील हे एक कुशल संघटक होते. 

महाराष्ट्राच्या मातीला समाजसुधारणेचे बाळकडू देणाऱ्या शाहू-फुले- आंबेडकर यांच्या विचारांचा व कर्मवीर भाऊराव पाटील. प. पू. डॉ. बापूजी साळुंखे, गो. ग. आगरकर ह्यांच्या शैक्षणिक त्यागाचा वारसा त्यांना लाभला होता. हाच वसा व वारसा पुढे समर्थपणे पेलण्याचे कार्य उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेल्या शिवाजीराव पाटील ह्यांनी केवळ चालविलाच नाही तर शिक्षण क्षेत्राला नवा आयाम देण्याचे प्रयत्न केले. शिक्षण क्षेत्राचा पैलू असलेल्या शिक्षकालादेखील संघटनात्मक ताकद देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रात विचारांची व कार्याची नवी क्रांतीच दादांच्या समर्थ नेतृत्वाने घडवून आणली. हजारो शिक्षकांनी दादांना केवळ आदर्शच मानले नाही तर एक प्रेरणास्त्रोत म्हणून त्यांच्याकडे पाहिले. संघटना उभारताना व संघटनेला दिशा देण्यासाठी दिशादर्शक, करारी, धाडसी व स्वाभिमानी नेतृत्वाची आवश्यकता असते. असे सर्वगुण नेतृत्व म्हणजे दादा होते. सर्व शिक्षकांचे नेते असलेले दादा हे राज्यातील सर्व शिक्षकांसाठी चालते बोलते विद्यापीठच होते. राज्यातील शिक्षकांच्या व मुख्याध्यापकांच्या संघटनांवर अत्यंत तत्परतेने, धाडसाने निर्णय घेऊन त्यांनी आपल्या सक्षम कर्तृत्वाची छाप शिक्षकांच्या मनःपटलावर उमटवली आहे. दादा म्हणजे एकमेवाद्वितीय नेता, कणखर नेतृत्व, परखड विचार व निर्णय घेण्याची महान क्षमता इत्यादी गुणांमुळे चळवळीत पदाधिकारी म्हणून त्यांच्या कार्याचा ठसा शिक्षक चळवळींवर प्रकर्षाने उमटलेला आहे. महाराष्ट्रातील मुख्याध्यापक संघ, शिक्षक संघटना व शिक्षक लोकशाही आघाडी (टी.डी.एफ.) ह्यासह विविध संघटनांवर ते पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वाच्या कालखंडात मुख्याध्यापक व शिक्षकांच्या संघटनामध्ये समन्वय निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. 

महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा ते कोकण व नाशिक, धुळे ते सिंधुदुर्ग एवढ्या मोठ्या भौगोलिक प्रदेशात शिक्षक व मुख्याध्यापक जगतावर त्यांच्या समर्थ नेतृत्वाची छाप होती. त्यांच्या कामाचा झपाटा व लढवय्या बाणा लक्षात घेऊन महाराष्ट्र टी.डी.एफ.ने त्यांना सन १९८३ मध्ये पुणे विभागातून टी. डी. एफ. ची उमेदवारी दिली. त्या उमेदवारीच्या काळात त्यांना महाराष्ट्रातील विविध पुरोगामी संघटनांनी पाठिंबा दिला. त्यांचे माजी विद्यार्थी, सहकारी शिक्षक व टी.डी.एफ. चे हजारो कार्यकर्ते कामाला लागले आणि दादा महाराष्ट्र विधानपरिषदेवर शिक्षकांचे आमदार म्हणून निवडून आले. 

विधानपरिषद सदस्य ह्या नात्याने त्यांनी शिक्षकांच्या व समाजाच्या अनेक समस्यांवर अभ्यासपूर्ण प्रश्न मांडले. त्यांच्या मांडणीमध्ये अभ्यासूवृत्ती, अन्यायाची चीड व विधायकता दिसून यायची. ह्या कालखंडामध्ये विनाअनुदानित शाळांच्या प्रश्नांनी डोके वर काढले होते. अल्प वेतनावर काम करणाऱ्या हजारो प्रशिक्षित पदवीधरांचा प्रश्न गंभीर होता. सदर प्रश्न विधानपरिषदेत चर्चेचा विषय होण्यासाठी त्यांनी विधानपरिषदेतील शिक्षक आमदारांच्या तसेच बाकी सहकारी आमदारांच्या मदतीने विनाअनुदानित शाळांचे प्रश्न अग्रक्रमाने सोडविण्याचा आग्रह धरला. सन १९८३ ते ८९ या कार्यकाळात विधानपरिषदेत सुमारे ३२ विषयांवर शिक्षक व शिक्षणाच्या विविध प्रश्नांवर यशस्वी चर्चा घडवून आणण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. 

दादा पुणे विभागातून आमदार म्हणून काम करत असताना विधिमंडळात विविध विषयांवर चर्चा करून त्यांनी ते प्रश्न सोडविले. विधिमंडळात त्यांनी शिक्षकांचे केवळ नेतृत्वच न करता शिक्षणातील बदलणारे संदर्भ, नवीन शैक्षणिक धोरण व शैक्षणिक विकास आराखडा ह्यावर अभ्यासपूर्ण निवेदने केलीत. त्याबरोबर दुर्गम भागातील आश्रम शाळांचे प्रश्न, त्यांची मान्यता व अनुदान, विनाअनुदानाचा प्रश्न, ग्रामीण भागातील शिक्षकांचे घरभाडे भत्ता, चौथा वेतन आयोग, केंद्राप्रमाणे महागाई भत्ता, इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे स्वेच्छानिवृत्तीची योजना तसेच वैद्यकीय सेवेची सुविधा असे कितीतरी प्रश्न दादांनी विधिमंडळात पुराव्यासह व अभ्यासपूर्ण भाषणाने सोडविले आहेत. विधानपरिषदेत विविध प्रश्नांवर अभ्यासपूर्ण भाष्य करणारे, शिक्षक व शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारे नेते, एक अभ्यासू व प्रगल्भ विचारधारा जोपासणारे शिक्षक आमदार म्हणून त्यांचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांना परिचित आहे. 

दादा तसे कणखर व चिवट, संघटनकुशल लढाऊ नेते होते. परंतु संघटनेत मतभेदाने वेगळ्या असलेल्या विरोधकांशीही त्यांचे सौहार्दाचे व आपुलकीचे नाते होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शील व चारित्र्याची झालर होती. त्यामुळे कडव्या विरोधकांनाही ते आपलेसे वाटायचे. कार्यकर्त्यांशी वागताना त्यांच्यातील माणुसकीचा सतत प्रत्यय यायचा. ते महान नेते होते. तसेच कार्यकर्त्यांचे प्रेमळ मित्रही होते. स्वतः पदरमोड करून ते आपल्या चारचाकी वाहनाने बऱ्याच वेळा स्वतः वाहन चालवीत प्रवास करत. संपूर्ण महाराष्ट्रभर संघटनेच्या कार्यासाठी त्यांची भ्रमंती असे. 

वेळोवेळी येणाऱ्या विधानपरिषदांच्या निवडणुकांमध्ये त्यांचेच मायक्रोप्लॅनिंग असे. निवडणुकीच्या काळात ते सलग ८ ते १० दिवस कार्यकर्त्यांसह प्रवास करीत असत. त्यात विद्यालयातील शिक्षकांच्या सभा, शिक्षक, पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी तसेच समाज व राजकारणातील विविध नेते, संघटक व कायकर्ते ह्यांच्या गाठीभेटी ह्यातच त्यांचा वेळ कसा जायचा, हे कार्यकर्त्यांच्याही लक्षात यायचे नाही. जेथे जात तेथे दादांच्या भोवती मित्र, चाहत्यांचा गराडा असे. “आज माझ्याकडेच जेवण घेतले पाहिजे. तुमच्या सोबत असलेल्या दहा कार्यकर्त्यांची मी सोय केलेली आहे,‘ असे प्रेमाचे व कळकळीचे आमंत्रण दादांना नाकारता येत नसे. होकार देताना मात्र ते म्हणायचे मला “साधी कांदा भाकरीसुद्धा चालेल.” मग तो कार्यकर्ता म्हणायचा, “दादा वाघ कुठे गवत खातो का ?” 

महाराष्ट्र राज्य टी.डी.एफ.चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. तात्या सुळे ह्यांनी कॉ. रेडकर, श्री. भालडे, श्री. शिवाजीराव पाटील, श्री. एन. जी. पाटकर, श्री. प्रकाशभाई मोहाडीकर, श्री. नाना पानसे ह्या सहकाऱ्यांच्या मदतीने शिक्षकांच्या प्रश्नांसाठी टी.डी.एफ.च्या माध्यमातून निकराचे लढे दिले. श्री. तात्या सुळेंनी आपल्या हयातीनंतर टी.डी.एफ.चा उत्तराधिकारी फक्त शिवाजीराव पाटीलच असतील असे हजारो टी.डी.एफ. कार्यकर्त्यांच्या समोर ठामपणे सांगितले किंबहुना ही जबाबदारी त्यांनी आत्ताच स्वीकारावी असे मी आपणा सर्वांच्या वतीने त्यांना आवाहन करतो. त्यावेळेस दादांनी ‘तात्या जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत हे पद आपणाकडेच रहावे’, अशी नम्र इच्छा व्यक्त केली. परंतु तात्यांच्या हयातीनंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मा. दादांना अध्यक्ष पदासाठी अर्ज भरावा लागला व टी.डी.एफ. अंतर्गत अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली व त्यात दादा मोठ्या मताधिक्याने निवडून आले. ह्या घटनेचे श्री. रावसाहेब आवारी, श्री. हनुमंतराव कुबडे, श्री. निवृत्ती करंडे, श्री. लक्ष्मणराव चतूर, श्री. हनुमंतराव भोसले, श्री. महादेव गव्हाणे, श्री. बाळासाहेब खानदेशे, श्री. भागवत सर व श्री. के. एस. ढोमसे हे साक्षीदार आहेत. 

नि:स्पृहपणा, नि:स्वार्थी वृत्ती हा दादांचा स्थायीभाव होता. संघटनेच्या आर्थिक व्यवहारामध्ये ते अत्यंत स्वच्छ, निर्लिप्त व पारदर्शी राहिले. त्यांच्या कार्यशैलीमुळे शेकडो कार्यकर्ते तयार झाले व जणू काही दादा म्हणजे संघटनेचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निर्मितीचा आदर्श कारखानाच होते. कायकर्त्यांमध्ये सचोटी, सेवाभावी वृत्ती, अखंड परिश्रमशीलता असावी हा त्यांचा आग्रह असायचा. दादांच्या कडक आणि कणखर धोरणामुळे काही वेळेला ते कार्यकर्त्यांची कडक शब्दात कानउघाडणी करायचे. अखंड परिश्रम, प्रयत्नातील सातत्य तसेच विजिगीषुवृत्ती ह्यामुळे त्यांचे सान्निध्य सदैव चैतन्यमय असेच असायचे. मरगळलेला कार्यकर्ता त्यांना सहन होत नसायचा. 

दादा टी.डी.एफ.चे अध्यक्ष असताना महाराष्ट्रात मुंबई विभाग वगळता सातपैकी सहा शिक्षक आमदार हे शिक्षक लोकशाही आघाडी (टी. डी. एफ.) चे होते. दादांच्या नेतृत्व काळात महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत सहा आमदार टी.डी.एफ. चे होते. हा दादांच्या कारकिर्दीचा जणू सुवर्णकाळ होता. श्री. नाना बोरसे, श्री. गजेंद्र ऐनापुरे, श्री. व्ही. यू डायगव्हाणे, श्री. वसंतराव खोटरे, श्री. प. म. पाटील तसेच टी.डी.एफ. च्या माध्यमातून टी.डी.एफ. पुरस्कृत केलेले पदवीधर आमदार डॉ. सुधीर तांबे (नाशिक विभाग) तसेच ठाणे विभागातून श्री. निरंजन डावखरे व पुणे विभागातून प्रा. शरद पाटील ह्यांना निवडून आणण्यात दादांचा सिंहाचा वाटा होता. हे यश म्हणजे दादांच्या नेतृत्वाखाली टी.डी.एफ. ची मोठी ताकद होती. वर उल्लेख केलेले आमदार यशस्वी होण्यासाठी दादांनी हजारो किलोमीटरचा प्रवास केला. शिक्षकांचे व कार्यकर्त्यांचे विभागीय मेळावे, तालुका व जिल्हा मेळावे, शाळांमधील शिक्षकांच्या सभा, कधी कधी रात्री अपरात्री कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन प्रचार करणे अशा गोष्टी सातत्याने कराव्या लागल्यामुळे ही यशप्राप्ती झाली. 

दादांच्या माध्यमिक शिक्षक संघटनेतील कुशल नेतृत्वामुळे जरी आमदारकी संपली तरी शिक्षकांची त्यांच्यावरील नितांत श्रद्धा व प्रेम ह्यामुळे त्यांना ह्या संघटनेतच काम करण्याचा आग्रह झाला. दादा सेवानिवृत्त झाले तरी संघटनेच्या कामाचा व्याप त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. संघटना व शिक्षकांसाठी आपल्या खाजगी जीवनाचा व कौटुंबिक जीवनाचा त्याग करून मिळणारी सर्व पेन्शन, पत्नीची पेन्शन पेट्रोलसाठी खर्च करून स्वतः ड्रायव्हिंग करीत अखरेच्या श्वासापर्यंत ते संघटनेचे कार्य करीत होते. 

टी.डी.एफ.च्या संस्थापकांपैकी दादा एक होते. आदरणीय मा. श्री. तात्या सुळे ह्यांनी कॉ. रेडकर, श्री. भालडे, श्री. शिवाजीराव पाटील, श्री. एन. जी. पाटकर, श्री. प्रकाशभाई मोहाडीकर, श्री. नाना पानसे यांच्या विचारातून टी. डी. एफ. ची पंचसूत्री शिक्षकांपर्यंत पोहचविण्याचे काम दादांनी केले. लोकशाही, समाजवाद, विज्ञाननिष्ठा, नियोजन व स्वातंत्र्य ही पंचसुत्रे टी. डी. एफ. ची आहेत. सार्वजनिक जीवनात दादांनी प्रचंड काम केले. परंतु कधीही कोणत्याही प्रलोभनास, अमिषास बळी न पडता प्रचंड ताकदीने शिक्षकांच्या प्रश्नांसाठी दादा नेहमी जागृत राहिले. बहुजन समाजातील शिक्षकांना संघटित करून त्यांच्यामध्ये नेतृत्वाची जाण निर्माण केली. अनेक शिक्षक कार्यकर्ते घडविले. श्री. तात्या सुळे महाराष्ट्र टी.डी.एफ. चे अध्यक्ष असताना श्री. शिवाजीराव पाटील कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत होते. 

दादांना आपल्या अंतःकाळाची जाणीव झाल्यामुळे की काय त्यांनी टी.डी.एफ. चे कार्य अखंड चालविण्यासाठी पुणे येथे महाराष्ट्र विद्यालयात एक महत्त्वाची बैठक १३ मे, २०१५ रोजी आयोजित केली. त्या बैठकीस आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार श्री. विक्रम काळे, आमदार श्री. दत्तात्रय सावंत आणि श्री. के. एस. ढोमसे संघटनेचे महाराष्ट्र पातळीवरील माजी आमदार श्री. गजेंद्र ऐनापुरे, श्री. विजय बहाळकर, श्री. ज्ञानेशर कानडे, श्री. एस. डी. भिरुड, श्री. गजेंद्र लांडे, श्री. एस. डी. जमाले, श्री. हिरालाल पगडाल, श्री. हनुमतंराव भोसले, श्री. गणपतराव तावरे, श्री. राम पाटील, श्री. भारत घुले, श्री. सुरेश वाघमारे इत्यादी प्रमुख उपस्थित होते. सदर बैठकीत टी.डी.एफ. च्या विचारांच्या जवळच्या संघटनांना व कार्यकर्त्यांना एकत्र आणून आपण प्रतिगामी शक्तींना समर्थपणे तोंड दिले पाहिजे व त्यासाठी आपण यापुढे सातत्याने प्रयत्नशील राहुया असे आवाहन केले. ही त्यांची शेवटची बैठक अंतर्मुख करणारी होती. टी. डी. एफ. चा विचार सदैव टिकलाच पाहिजे ही त्यांची आग्रहाची इच्छा होती. 

दादांना तालुका पातळीवरील सामान्य कार्यकर्त्यांचा नावानिशी परिचय असायचा. तालुका, जिल्हा, विभागीय व राज्य संघटना ह्यांच्यावर त्यांची मजबूत पकड होती. त्यांच्या कार्याचा आवाका फार मोठा होता. कार्यकर्त्यांना मुलाप्रमाणे जीव लावणाऱ्या आमच्या दादांची स्मृती अखंड शैक्षणिक विश्वामध्ये राहील. 

दादांनी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेला सदैव उत्तम मार्गदर्शन करून संघटनेमध्ये अधिक बळकटी आणली. दादांच्या निधनानंतर श्री. के. एस. ढोमसे ह्यांनी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष म्हणून आयोजित केलेल्या कार्यकारिणीच्या सभेत दादांच्या संघटनात्मक कार्याची स्मृती चिरंतन स्मरणात रहावी या उद्देशाने महाराष्ट्रातील टी.डी.एफ. च्या आदर्श कार्यकर्त्याला दादांच्या नावाने ‘शिवाजीराव पाटील पुरस्कार’ देण्याचा ठराव संमत करण्यात आला. पुरस्कार निवड समितीने ह्या पहिल्यांदाच देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी के. एस. ढोमसे ह्यांचे नाव एकमताने जाहीर केले. सदर पुरस्कार वितरण सोहळा शिरूर येथे मयुरी मंगल कार्यालयात आयोजित करुन पदवीधर आमदार मा. निरंजन डावखरे ह्यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रमप्रसंगी दादांच्या सुविद्य पत्नी डॉ. लीलाताई पाटील, चि. उदयराव पाटील व सौ. छायाताई पाटील उपस्थित होते. तसेच आमदार मा. बाबुराव पाचर्णे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. प्रदीपदादा कंद, (मुख्य कार्यकारी अधिकारी), मा. कांतिलाल उमाप इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. 

अखेरचे पर्व 

दादांचे विचार पुरोगामी होते. ते केवळ प्राचार्य नव्हते तर एक समाजसुधारक होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते. उत्तम प्रशासक, उत्तम वक्ते, उत्तम संघटक, खंबीर नेतृत्व आणि उत्तम जनसंपर्क यामुळे जीवनाच्या अनेक क्षेत्रात ते प्रभावीपणे वावरले. त्यांनी तत्त्वांशी कधी तडजोड केली नाही. डॉ. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कर्तृत्वाचा त्यांच्या जीवनावर विलक्षण प्रभाव होता. विधानपरिषदेचे सदस्य असताना त्यांनी राजकारणाला समाजकारणाचे अधिष्ठान दिले. अनेक शिक्षक विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना खूप आनंद होत असे. आमदार असतानाही त्यांनी कोणत्या पदाचा लाभ स्वतःला, स्वतःचे कुटुंब (मुलगा) आणि नातेवाईकांना होऊ दिला नाही. निःस्वार्थी जीवनाचा आदर्श त्यांच्या कृतिउक्तीचा धर्म झाला होता. 

दादांचे सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य समाजसेवा व आपल्या चाहत्यांच्या जनसंपर्कात गेले. आंबेगाव तालुक्यात लग्नपत्रिका छापायच्या म्हणजे त्यात प्रमुख उपस्थिती हा एक उल्लेख असणारच. त्यात आजीमाजी खासदार, आमदार व इतर मान्यवरांची नावे असणारच. अर्थात त्यामध्ये दादांचे नावही असायचे. ते शिस्तीचे पक्के. एकाच दिवशी त्यांना ८ ते १० कार्यक्रम असायचे. मग आदल्या दिवशीच झोपायच्या अगोदर दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमांची यादी अतिशय लहान पण सुवाच्च अक्षरात ते कागदावर तयार ठेवायचे. मग २ ते ३ साखरपुड्यांना उपस्थिती लावायची व ज्यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला पोहचू शकले नाहीत, अशांच्या लग्नाला ते उपस्थित राहत. साखरपुड्याची वेळ सगळ्या पत्रिकांवर सकाळी ९ ते ११ असायची. विवाहमुहूर्त मात्र वेगवेगळे असायचे. साखरपुड्याला ते सकाळी ९ वाजता हजर व्हायचे पण तेथे वऱ्हाडी मंडळींचाच पत्ता नसायचा मग ते तो कार्यक्रम सोडून दुसऱ्या कार्यक्रमाला हजेरी लावत असत. लग्नसराईमध्येही हे असेच चालत असायचे. लोकांना वेळेचे महत्त्व नसायचे पण शिवाजीराव पाटील मात्र आयुष्यभर वेळेवर कार्यक्रमांना उपस्थित 

राहण्याचा शिरस्ता पाळत आले. 

वयाची ८० वर्षे पार केल्यानंतर स्वतः गाडी चालवत त्यांचा हा जनसंपर्क चालूच असायचा. आपल्या न जाण्यामुळे एखाद्याला वाईट वाटू नये ह्याची काळजी ते आयुष्यभर घेत आले. मग तो कार्यक्रम छोटा असो की मोठा असो. मोठ्या माणसाचा असो की शिपायाच्या मुलाचा वाढदिवस असो ते उपस्थित राहणारच. दादा हिशोबाचेही पक्के होते. त्यांच्याकडे पैशाची रेलचेल कधीच नव्हती. परंतु आहे त्या पगारामध्ये त्यांनी योग्यप्रकारे नियोजन करून सर्व जबाबदाऱ्या यथोचित पार पाडल्या. संपूर्ण आयुष्यात जे काही केले ते स्वबळावरच. मोठमोठ्या भेटवस्तू त्यांना कधीच आवडत नसत. किंबहुना त्यांना कोणी एखादी भेटवस्तू देणे हेच मुळी आवडत नसायचे. एरवी पुढारी लोकांना जेवढ्या भेटवस्तू मिळतील तेवढ्या हव्याच असतात व त्यात त्यांना मोठेपणाही वाटतो. भेटवस्तू स्वीकारणे आपला हक्क आहे व देणे हे जनतेचे कर्तव्य आहे अशीच बहुतांशी पुढाऱ्यांची धारणा असते. दादा मात्र ह्या सर्वांहून वेगळे होते. प्रसंगानुसार भेटवस्तू स्वीकारावी लागलीच तर त्याची नोंद ते ठेवायचे व योग्य निमित्त शोधून त्याची परतफेड ते आवर्जून करायचे. हे शक्य व्हावे म्हणून त्यांना आपल्या आवाक्याबाहेरच्या भेटवस्तू की ज्यांची ते परतफेड करू शकणार नाहीत त्या त्यांना आवडत नसत. 

मांसाहरी भोजन हा त्यांचा आवडता विषय असायचा. इतरांसारखे सोमवार, गुरुवार पाळणाऱ्यातले ते नव्हते. त्यामुळे दररोज नॉन-व्हेज खायची त्यांची तयारी असायची. त्याला ते वाघाचे खाणे म्हणायचे. मात्र त्यांचा आहार मर्यादित असायचा. समोर ताट आले की त्यातले आवश्यक तेवढेच ठेवून उर्वरित पदार्थ जेवायला सुरुवात करण्याअगोदर काढून ठेवत. आवडीचे जेवण आहे म्हणून ते कधीही जास्त आहार घेत नसत. त्यांच्या उत्तम आरोग्याचे हेच तर एक गुपित होते. 

दादांची उत्तम प्रकृत्ती हे त्यांचे मोठे भांडवल होते. त्यांनी उभ्या आयुष्यात कधी इंजेक्शन घेतलेले किंवा डॉक्टरांच्या गोळ्या घेतल्याचे त्यांच्या घरातील व निकटवर्ती ह्यांनाही पहावयास मिळाले नाही. त्यांना कधी सर्दी झाली नाही की पोटात गडबड आहे, ताप आहे अशी तक्रार संपूर्ण आयुष्यात त्यांनी कधी केली नाही. त्यांचे उपचारही घरगुतीच असायचे. नॉन-व्हेज खाल्ले की ते गुळाचा खडा आवर्जून मागवून घेणार व खाणार. कधी कधी लसणाची पाकळीही खाणार. त्यामुळे त्यांना कधी औषधे लागली नाहीत. 

दिनांक ८ जून, २०१५ रोजी नेहमीप्रमाणे अनेक पूर्वनियोजित कार्यक्रम आणि प्रासंगिक भेटीगाठी, चर्चा, बैठका दादांनी पार पाडल्या. शेवटची बैठक म्हणून अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाची स्थानिक व्यवस्थापन समितीची बैठक दुपारी ४ वाजता पार पडली आणि नेहमीप्रमाणे स्वतः गाडी चालवत पुण्याला काही कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. कार्यक्रम पार पडल्यानंतर रात्री दादा पुन्हा स्वतः गाडी चालवत मंचरला स्वगृही परतले. रात्रीचे भोजन उरकल्यावर दादांनी वर्तमानपत्राचे वाचन केले. प्रवासाच्या दगदगीने डोके दुखल्याची जाणीव होत असल्याने किरकोळ औषधोपचार केले. वर्तमानपत्राची सुव्यवस्थित घडी घातली. डाव्या कुशीवर हात डोक्याखाली घेऊन नेहमीच्या सवयीनुसार शांत झोपी गेले. 

९ जून, २०१५ सूर्य उगवला परंतु दादा झोपेतून उठलेच नाहीत. ती चिरनिद्रा होती. एका कर्मयोग्याने जगाचा निरोप घेतला. एका निरोगी, निरुपद्रवी उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा शेवट त्यांच्या स्वभावाला साजेशा पद्धतीने झाला होता. झोपेतच मृत्यूने त्यांना गाठले होते. डॉक्टर नाही, हॉस्पिटल नाही, औषधे नाही, हॉस्पिटलला भेटायला येणाऱ्या-जाणाऱ्यांची गर्दी नाही हे सर्व त्यांना सहनही झाले नसते. तो त्यांचा स्वभावही नव्हता. नियतीने त्यांच्या प्रामाणिकपणाची, कर्तृत्वाची, निष्ठेची दिलेली सुलभ मृत्यूरूपी अप्रतिम भेट त्यांच्या प्रतिष्ठेला साजेशी होती. दादा गेले. असंख्य नातेवाईक, सगेसोयरे, मित्रमंडळी, रयत सेवक विद्यार्थी आणि शिक्षक शोकसागरात लोटले गेले. परंतु दादांचे अचानक आणि विलक्षण पद्धतीने जाणेही आश्चर्यकारक होते. हजारो विद्यार्थी घडविणारा, कर्मवीर भाऊराव पाटील ह्यांच्या अपरंपार निष्ठेपायी असीम कर्तृत्वाची बहुआयामी क्षमता असूनही शिक्षकीपेशा स्वीकारून अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे सोनं करणारा एक परिस हरपला. एक सरळमार्गी सच्छिल, प्रामाणिक, विद्वान, बहुजनांचा आधार असे दैवदुर्मिळ व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. संत महात्म्यांचे जीवनही त्यांच्यापेक्षा वेगळे नव्हते. फक्त वेष वेगळा होता, अंतरंग महात्म्याचेच होते. हे अनेकांना कळलेले नाही. एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणे हे सामान्यांचे काम नव्हे. ज्यांना ते कळले अशी मोजकीच मंडळी हयात आहेत. 

“मार्गाधार वर्तावे । विश्व हे माहेर लावावे ।। 

| 

अलौकिक नोहावे। लोकांप्रति ।। ” 

(ज्ञानेश्वरी ३/१७१) 

अशी त्यांची जीवन जगण्याची अभिनव रीत होती. त्यांच्या जीवनात ज्ञानसूर्याचे तेज होते. मोगऱ्याचा सुगंध होता. चंदनाची शीतलता आणि चांदण्याची शुभ्रता होती. वक्तृत्व आणि कर्तृत्वाची त्यांच्या जीवनाशी एकरूपता होती. म्हणून दादांचे ‘एक कर्मयोगी’ अशा शब्दातच वर्णन करावे लागेल. 

शब्दांकन संपादक मंडळ, डॉ. ज्ञानेश्वर थोरात, प्रा. वसंत भालेराव मंचर 

Read more at Karmayogeee

]]>
https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b5%e0%a5%8d/feed/ 0
कार्यतत्पर : शिवाजीराव पाटील  https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%b0-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a4%be/ https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%b0-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a4%be/#respond Mon, 08 Jun 2026 06:31:30 +0000 https://karmyogee.com/?post_type=docs&p=2169 Read more at Karmayogeee

]]>
मा. शंकरराव कोल्हे 

माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य 

मा.उपाध्यक्ष, रयत शिक्षण संस्था, सातारा 

माणसाचे आयुष्य हे क्षणभंगुर आहे. परमेश्वराने दिलेला जन्म आणि त्यातून त्याने समाजासाठी केलेलं काम, जीवन जगत असताना दिलेले योगदान ह्यावरच आज प्रत्येकाच्या कामाचा आरसा चकाकत असतो. त्यातून निर्माण झालेले प्रतिबिंब हे जनमानसासमोर उठून दिसते. शिक्षणाने माणूस समृद्ध होतो. परिस्थिती त्याला दैनंदिन जीवन कसे जगायचे हे शिकवते. आत्मसात केलेल्या ज्ञानातून त्याची प्रतिमा तयार होते आणि या शिकवणुकीतून त्याचे कर्म घडत असते. तद्वत मंचर येथील शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष, माजी आमदार शिवाजीराव पाटील यांचे जीवन घडले. त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ हा वसा दीन-दलित, उपेक्षित, बहुजन समाजाच्या घरापर्यंत शिक्षणाची गंगा घेऊन आलेल्या पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील ह्यांनी स्थापन केलेल्या सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून जोपासला त्याला तोड नाही. 

१२ नोव्हेंबर, १९२९ रोजी शिवाजीराव पाटील ह्यांचा शिक्षणमहर्षी भाऊराव गेणूजी पाटील व आई भागिरथीबाई ह्यांच्या उदरी जन्म झाला. लहानपणापासून त्यांना शिक्षणाचे बाळकडू मिळाले. घरातून चांगले संस्कार मिळाले असल्यामुळे शिवाजीराव पाटील ह्यांना कर्मवीर भाऊराव पाटील ह्यांचा सहवास लाभला. त्यांच्या शैक्षणिक कार्यात स्वतःला झोकून देत शिवाजीराव पाटील ह्यांनी उत्तम असे शैक्षणिक कार्य केले. शिरवळ येथील विद्यालयात नोकरीची सुरुवात केली. नोकरीबरोबरच सामाजिक कार्यात स्वतःला गुंतवून घेतले आणि त्यातून सर्वार्थाने उपेक्षित समाजाला शिक्षणाचे बाळकडू दिले. 

स्वातंत्र्यपूर्व काळात अत्यंत प्रतिकूल आणि वंचित, दुर्गम्य वातावरणात कर्मवीर भाऊराव पाटील ह्यांच्या स्वावलंबी शिक्षणाचे बाळकडू अंगी बाणलेल्या माजी आमदार शिवाजीराव पाटील यांनी ‘कमवा आणि शिका’ ह्या योजनेच्या लाभातून आपले शिक्षण पूर्ण केले. ह्या उपकारातून उतराई होण्याकरिता त्यांनी रयत शिक्षण संस्थेतूनच ज्ञानदानाचा श्रीगणेशा केला. स्वातंत्र्यपूर्व व उत्तर कालखंडात झालेल्या देशातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय घडामोडींनी आणि स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या महान कार्याने भारावून गेलेल्या माजी आमदार शिवाजीराव पाटलांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिष्यत्व पत्करुन शैक्षणिक कार्यास स्वत:ला वाहून घेण्याचा संकल्प सोडला. 

त्यांच्या ठायी असलेला प्रामाणिकपणा, जिद्द, विद्यार्थी, सहकारी व संस्थेविषयी असलेल्या आपुलकीने त्यांनी सर्वांचीच मने जिंकून घेतली. अल्पावधीतच मुख्याध्यापकपदाचा बहुमान प्राप्त झाल्यावर त्यांनी महाविद्यालयांच्या प्रगतीसाठी आणखी नेटाने काम सुरु केले. शैक्षणिक प्रकल्प राबविताना येणाऱ्या अडचणींच्या अनुभवातून तावून सुलाखून निघालेल्या शिवाजीरावांनी मुख्याध्यापक व शिक्षकांना संघटित करण्यासाठी शिक्षक लोकशाही आघाडीच्या माध्यमातून उल्लेखनीय असे कार्य केले. 

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी येथील स्वातंत्र्यवीरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत इंग्रज राजवटीविरुद्ध लढा दिला. अहिंसेच्या मार्गाने आंदोलन चालविण्याची धुरा महात्मा गांधी यांच्याकडे होती. त्यांनी स्वदेशी वस्तू वापरण्यावर जोर दिला. इंग्रजांनी तयार केलेल्या कपड्यांची होळी पुणे जिल्ह्यातील महाळुंगे पडवळ या गावचे सुपुत्र देशभक्त हुतात्मा बाबू गेणू सैद यांनी केली. त्यांचे हे आंदोलन देशभर गाजले. अशा महाळुंगे पडवळ येथील शाळेचे मुख्याध्यापक होण्याचा मान शिवाजीराव पाटील यांना मिळाला. त्यांनी देशभक्तीत रस दाखवत, स्वातंत्र्यपूर्व चळवळींचा इतिहास जाणून घेत त्याचे धडे शाळेत शिकणाऱ्या मुला-मुलींना दिले, महाळुंगे पडवळ गाव जगाच्या नकाशावर देशभक्त हुतात्मा बाबू गेणू सैद यांनी कशा पद्धतीने नेले याचा इतिहास शिवाजीराव विसरले नाहीत आणि भविष्यात घडणाऱ्या पिढीलाही त्याचा त्यांनी विसर पडू दिला नाही. 

शिक्षणाचा आधुनिक भगीरथ आणि खेड्यापाड्यापर्यंत ही गंगा वाहून नेणाऱ्या डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्यात शिवाजीराव पाटील यांनी हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी मावळ्यांनी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना साथ दिली त्याप्रमाणेच स्वतःला झोकून दिले आणि या योगदानातूनच रयत शिक्षण संस्था संपूर्ण आशिया खंडात सर्वात मोठी शैक्षणिक संस्था म्हणून नावारूपाला आली. 

रयत शिक्षण संस्थेशी नाळ जोडलेल्या व शैक्षणिक कार्याचा वसा घेतलेल्या शिवाजीरावांच्या कामाने प्रभावित झालेल्या शिक्षकांनी त्यांना आपले प्रतिनिधी म्हणून विधानपरिषदेत आमदार म्हणून पाठविले. विधानपरिषदेत शिवाजीरावांनी राज्यातील शासनाच्या शैक्षणिक धोरणाला बळ व दिशा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. हे करत असताना प्रत्यक्ष पहावयास मिळालेल्या व त्या अनुभवातून त्यांनी भाषणे, घडवून आणलेल्या चर्चा या माध्यमातून शासनाला अनेक शैक्षणिक क्रांतिकारी निर्णय घेण्यास भाग पाडले. त्यांच्या कर्तबगारी व अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्त्वाने प्रेरित झालेले मंत्री, आजी माजी लोकप्रतिनिधी, शासकीय निमशासकीय अधिकारी त्यांचे मार्गदर्शन घेत. रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि शिक्षक मतदार संघाचे आमदार म्हणून त्यांचा मला चांगल्या प्रकारे सहवास मिळाला. शिवाजीराव पाटील यांच्या शैक्षणिक बुद्धिमत्तेच्या जोरावर आम्ही विधिमंडळाची अधिवेशनं गाजविली. ज्या ज्या वेळी राज्यातील शिक्षकांसंदर्भात विधिमंडळात चर्चा घडत त्या त्या वेळी मी शिवाजीराव पाटलांबरोबरच राहून त्यांच्या अडलेल्या कामात सहकार्य देत असे. त्यांच्या शैक्षणिक कार्याने मी प्रभावित होऊन, प्रेरणा घेऊन कोपरगावच्या परिसरात आम्ही अनेक शैक्षणिक प्रकल्प राबविले. शैक्षणिक क्षेत्र, शिक्षक संघटना, शिक्षण संस्थांना त्यांनी सामाजिक व्यासपीठाचे अधिष्ठान प्राप्त करून दिले. राजकीय क्षेत्रात रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, अॅड. रावसाहेब शिंदे, माजी खासदार किसनराव बाणखेले यांचा सहवास लाभला. त्यातून त्यांची राजकीय प्रगल्भता वाढीस लागली व त्यातून त्यांचेही कार्य बहरले. त्यांचे प्रत्येक क्षेत्रातील कार्य आजही दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहे. वाचन, निसर्ग सफर हे त्यांचे विशेष छंद होते. निसर्गाची त्यांना आवड होती म्हणूनच त्यांनी ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेश सर्वांना दिला. खंबीर प्रशासक, लढाऊ शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक, उत्कृष्ट विधिमंडळपटू, अष्टपैलू नेतृत्व अशा कितीतरी उपाध्यांनी त्यांना संबोधले तरी ते कमीच आहे. त्यांच्या जाण्याने आपण एका अष्टपैलू व्यक्तिमत्त्वास मुकलो आहोत.

Read more at Karmayogeee

]]>
https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%b0-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a4%be/feed/ 0
एक ध्येयवादी व आदर्श रयत सेवक  https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%80-%e0%a4%b5-%e0%a4%86%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6-%e0%a4%b0%e0%a4%af%e0%a4%a4-%e0%a4%b8/ https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%80-%e0%a4%b5-%e0%a4%86%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6-%e0%a4%b0%e0%a4%af%e0%a4%a4-%e0%a4%b8/#respond Mon, 08 Jun 2026 06:32:22 +0000 https://karmyogee.com/?post_type=docs&p=2171 Read more at Karmayogeee

]]>

मा. अशोक शंकरराव काळे 

माजी आमदार, कोपरगाव 

राज्याच्या शिक्षक चळवळीत नवचैतन्य ओतून त्या चळवळीला निश्चित असे विधायक चळवळीचे रूप देणारे शिक्षकांचे लाडके नेते, असंख्य कर्तबगार विद्यार्थ्यांचे महागुरु, पुरोगामी विचारवंत व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव पाटील यांचे दिनांक ९ जून, २०१५ रोजी निधन झाले. कृतज्ञतेच्या भावनेतून शिवाजीराव पाटील यांच्या स्मृती शब्दबद्ध करून त्या राज्यातील सुजाण हितचिंतकापर्यंत पोहचविण्याच्या हेतूने मा. आमदार स्व. शिवाजीराव पाटील स्मृतिग्रंथ निर्माण होत आहे. निश्चितच हा स्मृतिग्रंथ तरूणांना प्रेरणादायी ठरेल. या स्मृतिग्रंथासाठी शिवाजीराव पाटील सरांबद्दलच्या स्मृती व विचार लेखी स्वरूपात देण्याबाबत समितीने अपेक्षा व्यक्त केली, त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. 

शिवाजीराव पाटील यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते भाऊराव गेणूजी पाटील व आई भागिरथीबाई यांच्याकडून त्यांना समाजकार्याचे बाळकडू मिळाले. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी सातारा येथील श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालयात त्यांना प्रवेश मिळाला. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा सहवास त्यांना लहानपणापासूनच लाभला. महाविद्यालयीन शिक्षणानंतर इतरत्र नोकरी न करता त्यांनी रयत शिक्षण संस्थेचे उपशिक्षक म्हणून नोकरीची सुरूवात केली. काही वर्षातच त्यांची संस्थेचे महाळुंगे पडवळ, जि. पुणे येथील माध्यमिक शाळेत मुख्याध्यापकपदी नेमणूक झाली. या गावी शाळेचे वर्ग मंदिरात भरत होते, शाळेला स्वतंत्र इमारत नव्हती. शिवाजीरावांनी विद्यार्थी व स्थानिक गावकऱ्यांच्या श्रमदानाने विद्यालयाच्या आवारात विहीर खोदली. सर्व सोईंनीयुक्त अशा शालेय इमारतीचे काम देखील गावकऱ्यांच्या मदतीने पूर्ण केले. या विद्यालयात काम करीत असताना त्यांनी अनेक गुणवंत विद्यार्थी घडविले. देशात तसेच विदेशात देखील त्यांचे अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत असल्याचा त्यांना विशेष अभिमान होता. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, विंचूर, ता. निफाड या शाखेतील त्यांचे शैक्षणिक काम विशेष उल्लेखनीय होते. विंचूर शाळेच्या इमारतीसह अनेक सुधारणा त्यांनी केल्या. रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे इन्स्पेक्टर म्हणून त्यांनी उत्कृष्टपणे काम केले. माझे वडील रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन, कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब यांचेशी त्यांचे जवळचे संबंध होते. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आदरणीय शरदरावजी पवारसाहेब तसेच आदरणीय कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब यांच्या सहवासात त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात बहुमोल कार्य केले. याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे. मी अहमदनगर येथे महाविद्यालयात शिक्षण घेत होतो, त्यावेळी स्व. शिवाजीराव पाटील हे रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागात मुख्याध्यापक व इन्स्पेक्टर म्हणून काम करीत असताना त्यांच्या आदरणीय काळेसाहेब यांचेशी विविध विषयांवर चर्चा होत असत. त्यावेळी पाटील सर यांचेशी माझी ओळख झाली व जवळून संबंध आला. संपूर्ण आयुष्य त्यांनी शिक्षण कार्यासाठी वाहून घेतले नव्हे तर ते एक आदर्श शिक्षक म्हणून जगले. ते अतिशय शिस्तप्रिय होते. ज्या ज्या विद्यालयात शिवाजीराव पाटील सरांनी काम केले त्या त्या विद्यालयांचा त्यांच्या काळात भव्य विकास झालेला बघावयास मिळतो. शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे परिसरात हडपसर येथील साधना विद्यालयात त्यांनी प्राचार्य म्हणून अनेक वर्षे काम केले. संस्थेमध्ये जी काही बोटांवर मोजण्याइतपत माध्यमिक विद्यालये आहेत त्यात हडपसर येथील साधना विद्यालयाचा सर्वात वरचा क्रमांक लागतो. या विद्यालयाच्या सर्वांगीण विकासाच्या वाटचालीत शिवाजीराव पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. संस्थेमध्ये काम करीत असताना विद्यालयाचे प्राचार्य व संस्था, समाज, शिक्षक वर्ग, विद्यार्थी व पालक या सर्वांना जोडणारा एक आदर्श दुवा म्हणून स्व. शिवाजीराव पाटील सर यांनी आयुष्य वेचले. रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व काही दिवस त्यांनी लाईफ मेंबर बोर्डाचे प्रमुख म्हणूनही चांगले काम केले. अनंत अडचणींवर मात करण्याचे धैर्य व चिकाटी हे व्यक्तिगत गुण एखाद्या कार्यात यश संपादन करण्यास कारणीभूत होतात. अशक्य वाटणारे कार्य या गुणांमळे सिद्धीस जाते व तसे कर्म करणाऱ्या व्यक्ती ह्या लोकोत्तर गणल्या जातात. म्हणून शिवाजीराव पाटील सर थोर होते. रयत शिक्षण संस्थेत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचार व ध्येयाने प्रेरित झालेले आणि संस्थेकरिता सर्वस्व वाहून घेतलेले जे मोजके सेवक होऊन गेले, त्यात शिवाजीराव पाटील सर यांचे नाव सुवर्णाक्षरात नोंदवावे लागेल असे मी म्हटले तर ते वावगे होणार नाही. 

अलौकिक अशा कार्यशैलीमुळे शिवाजीराव पाटील हे सन १९८४ मध्ये पुणे विभागातून शिक्षक लोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून महाराष्ट्र विधानपरिषदेवर आमदार म्हणून बहुमताने निवडून गेले. त्यावेळी शिक्षक संघटनेला एक खंबीर व अभ्यासू, समाजाभिमुख शिक्षक नेतृत्व लाभले. शिक्षक आमदार, शिक्षकांचा नेता म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम महाराष्ट्र विधान मंडळात केले. राज्याच्या शैक्षणिक धोरणाला एक चांगली दिशा देण्याचे महान ऐतिहासिक कार्य शिवाजीराव पाटील यांनी त्यावेळी केले. त्यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविला. 

शिवाजीराव पाटील सर आज आपणात नाहीत पण आपण आयुष्यभर केलेले काम व आपण दिलेले प्रेम हे कायम स्मरणात रहाणार आहे. आपण दिलेला लढावू वृत्तीचा आदर्श सर्वांसमोर कायम राहणार आहे. शिवाजीराव पाटील सर आपल्या पवित्र स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो. 

Read more at Karmayogeee

]]>
https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%80-%e0%a4%b5-%e0%a4%86%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6-%e0%a4%b0%e0%a4%af%e0%a4%a4-%e0%a4%b8/feed/ 0
अलौकिक व्यक्तिमत्त्वः शिवाजीराव पाटील  https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%85%e0%a4%b2%e0%a5%8c%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%83-%e0%a4%b6%e0%a4%bf/ https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%85%e0%a4%b2%e0%a5%8c%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%83-%e0%a4%b6%e0%a4%bf/#respond Mon, 08 Jun 2026 09:02:54 +0000 https://karmyogee.com/?post_type=docs&p=2328 Read more at Karmayogeee

]]>
मा. शिवाजीराव आढळराव पाटील माजी खासदार, शिरुर लोकसभा

अलौकिक व्यक्तिमत्त्वः शिवाजीराव पाटील 

मा. शिवाजीराव आढळराव पाटील 

माजी खासदार, शिरुर लोकसभा 

माझ्या लहानपणपासून ज्यांना मी एक आदर्श राजकारणी, आदर्श विचारवंत व शिक्षणतज्ज्ञ म्हणून मानत आलो असे शिवाजीदादा पाटील पुढे आयुष्यात मला गुरु म्हणून लाभतील असे क्वचितच माझ्या मनात कधी आले असेल. असे गुरुतुल्य ‘शिवाजीदादा’ म्हणजे निर्भिड, शिस्तप्रिय अन् स्पष्टवक्तेपणा असलेलं अलौकिक व्यक्तिमत्त्व होय. 

मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. समाजात जगत असताना मानवाचे आचार, विचार अन् संस्कृती समाजातील इतर घटकांवर आपल्या कर्तृत्वाने प्रभाव पाडत असतात. त्यापैकी प्रभावी व्यक्ती म्हणून मी शिवाजीदादांकडे आजवर पाहत आलो आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर दादांचा सहवास मला लाभला. त्यांच्या मार्गदर्शनाने मी कृतकृत्य झालो. मला आठवतंय, सन १९८५-८७ च्या सुमारास माझ्या लांडेवाडीसारख्या छोट्याशा गावात आम्ही सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन हायस्कूल सुरू करण्याचा निर्णय घेतला. आपल्या गावात हायस्कूल सुरू व्हावे हे माझं स्वप्न होतं. 

शिवाजीदादा त्यावेळी विधानपरिषद सदस्य होते. दादांची भेट घेऊन शाळा उभारण्याचा मनोदय मी व्यक्त केला. दादांनी माझ्या निर्णयाचे स्वागत केले. त्यावेळी महाराष्ट्र शासनाची पंचायतराज समिती लांडेवाडी ग्रामपंचायतीची पाहणी करण्यासाठी आली असता त्यांनी गावासाठी शाळेची आवश्यकता लक्षात घेऊन हे काम हाती घेण्यास दुजोरा दिला. पुढे शाळेला शासन मान्यता मिळवून देण्यासाठी शासन दरबारी स्वतःहून पुढाकार घेतला. पुढे दादांच्याच हस्ते शाळेचा श्रीगणेशा झाला. त्यावेळी दादांचे मिळालेले मार्गदर्शन मला शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असताना, उच्च दर्जाच्या शिक्षण संकुलाची उभारणी करताना अनेकदा लाभले. शिवाय, कला महोत्सवांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून शिक्षकांना व पालकांनाही दादांचे मार्गदर्शन मंत्रमुग्ध करायचे. पूर्वीचा खेड व आताचा शिरूर लोकसभा मतदार संघाचा खासदार म्हणून काम करीत असताना जेव्हा जेव्हा भेटीचे योग येत ते तेव्हा तेव्हा शिवाजीदादांशी विकासकामांबद्दल चर्चा व्हायच्या. लोकसभेतील माझी भाषणे ते आवर्जून पहायचे. मला दूरध्वनी करून माझ्या भाषणांचे व मी विचारलेल्या प्रश्नांचे कौतुकही करायचे. तर कधी संसदेत कोणते मुद्दे उपस्थित करायला हवेत ? कोणकोणते प्रश्न विचारले पाहिजेत? याविषयी ते मला हक्काने सूचना करायचे. त्यांच्या सूचनांचा व अनुभवाचा मला चांगला उपयोग होत असे. 

संकटं टाळता येणं शक्य नाही. एखाद्या समस्येकडे पाहण्याची आपली दृष्टी, ताकद विचारांमध्ये असते. राजकीय जीवनात अनेकदा माझ्यापुढे समस्या, अडचणी उभ्या ठाकल्या. त्यातून बाहेर पडण्यासाठी वेळोवळी दादांचे मौलिक मार्गदर्शन व विचार मला लाभले. त्यांच्यातील निर्भिडपणा, वक्तशीरपणा, स्पष्टवक्तेपणा जसा मला जाणवला तसेच त्यांचे निस्पृह मनही जाणवले. त्यामुळेच की काय त्यांच्याशी व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांशी माझे व माझ्या कुटुंबीयांचे गेल्या कित्येक वर्षांपासूनचे भावनिक नाते निर्माण झाले आहे. या नात्यामध्ये आम्ही सर्व गुंफलो आहोत. गेल्या काही वर्षांपूर्वी माझे ‘अनाहत’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. या आत्मचरित्र प्रकाशनाचे शिवाजीदादा साक्षीदार. त्यावेळी दादांनी केलेल्या कौतुकाच्या वर्षावाने मी पुरता भारावून गेलो होतो. ती एकप्रकारे गुरुने शिष्याला दिलेली शाबासकी होती. त्यांनी दिलेल्या कौतुकाच्या थापेनं माझ्यातील जिद्द व समाजसेवा करण्याची वृत्ती आणखीनच दुणावली गेली. दादा जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत काम करीत राहिले. समाज भावनेने प्रेरित होऊन सतत इतरांना त्यांचा न्याय्य हक्क देण्यासाठी व्यस्त राहिले. ज्यांच्याकडे विचारांचा भक्कम पाया नाही अशा माणसांच्या आयुष्याची इमारत भक्कमपणे उभी राहू शकत नाही. आयुष्यभर आपल्या परखड विचारांची शिदोरी गाठीशी बांधलेल्या शिवाजीदादांचा वैचारिक वसा समाजाने घेण्याची खरी गरज आहे. वयाची ऐंशी पार करूनही एखाद्या तरूणाला लाजवेल अशा अफाट जिद्दीने अन् वेगाने समाजासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या शिवाजीदादांची आठवण निघाली तरी मन अतिशय प्रफुल्लित होतं. त्यामुळेच त्यांच्या स्मृती माझ्यासह अनेकांच्या मनात कायमच्याच सुवर्णाक्षरांनी कोरल्या गेल्या आहेत.

Read more at Karmayogeee

]]>
https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%85%e0%a4%b2%e0%a5%8c%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%83-%e0%a4%b6%e0%a4%bf/feed/ 0
एक चालते बोलते विद्यापीठः शिवाजीराव पाटील  https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%a0/ https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%a0/#respond Mon, 08 Jun 2026 09:15:10 +0000 https://karmyogee.com/?post_type=docs&p=2330 Read more at Karmayogeee

]]>
मा. दिलीप वळसे पाटील आमदार, आंबेगाव शिरुर, 

माजी विधानसभा अध्यक्ष माजी गृह मंत्री, महाराष्ट्र राज्य 

महाराष्ट्रातील शैक्षणिक चळवळीत आणि शिक्षक चळवळीत चैतन्य ओतण्यासाठी सतत भिंगरीसारखे फिरणारे आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली व्हावीत म्हणून सतत जागरुक राहणारे शिवाजीराव पाटील यांनी झोपेत असतानाच शांतपणे या जगाचा निरोप घेतला हा एक दैवदुर्विलासच म्हणायला हवा. शिवाजीराव पाटील असे अचानक निघून जातील असे कुणास स्वप्नातही वाटत नसेल. त्यांच्या अशा अवेळी जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांप्रमाणेच त्यांच्या असंख्य विद्यार्थ्यांचे, त्यांच्या असंख्य चाहत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे, शैक्षणिक संस्थांचे, शैक्षणिक चळवळीचे, शिक्षक चळवळीचे, रयत शिक्षण संस्थेचे आणि एकूणच शिक्षण क्षेत्राचे अपरिमित नुकसान झाले आहे. 

शिवाजीराव पाटील यांचा उत्साह त्यांच्या वयाच्या ८५ वर्षांनतरही एखाद्या तरुणाला लाजवेल असाच होता. ते जेव्हा आमदार होते तेव्हापण कधी ते आमदारांसारखे वागलेच नाहीत. आमदार असतानाही त्यांनी कार्यकर्त्याचा पिंड जपला. लहानमोठ्या कार्यकर्त्यांचे प्रश्नही त्यांना आभाळाइतके मोठे वाटत आणि ते सुटले पाहिजेत म्हणून ते सतत आग्रही असत. कार्यकर्त्यांचे प्रश्न मग ते शिक्षणातील असो, नोकरीसंदर्भातील असो, महसूल किंवा गृह विभागातील असो ते सोडवलेच पाहिजेत म्हणून ते आग्रही असत आणि त्यांचे प्रश्न आपल्या परीने सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असत. शिवाजीराव पाटील यांच्यातील अंगभूत उत्साहच कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना भिडताना मला नवी उर्मी, नवा उत्साह आणि नवा विधायक विचार देऊन जाई. शिवाजीराव पाटील जसे अचानक मुंबईत येत तसे काम झाले की कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन मंचरची वाटही वेळी अवेळीच धरत. त्यांच्या वेळीअवेळी येण्या-जाण्याची काळजी वाटत असे. पण त्यांच्याबरोबरचे कार्यकर्त्यांचे मोहोळ पाहिले की थोडी काळजी कमी होई. मंचर ते मुंबई हा प्रवास त्यांचा बराचसा नेहमीचाच झाला होता. 

शिवाजीराव पाटील हे केवळ शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेले व्यक्तिमत्त्व नव्हते तर ते एक चालते बोलते विद्यापीठच होते हे त्यांचा शिक्षण क्षेत्रातील वावर पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल. शिवाजीराव पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या शिवाजी कॉलेजमधून ‘कमवा व शिका’ या योजनेतून आपले शिक्षण पूर्ण केले. तिथेच कर्मवीर भाऊराव पाटील यांचा सहवास त्यांना लाभला आणि त्यांच्या परिसस्पर्शाने शिवाजीराव पाटील यांचे संपूर्ण जीवनच उजळून गेले. इतकेच नव्हे तर त्यांनी आपले सारे जीवनच रयत शिक्षण संस्थेला समर्पित केले. त्या समर्पणातूनच खऱ्या अर्थाने ते रयतमय झाले आणि रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षपदापर्यंत त्यांनी झेप घेतली. रयत शिक्षण संस्थेत अध्यापनाचे कार्य करीत असतानाच ग्रामस्थांच्या मदतीने महाळुंगे-पडवळ, हडपसर आणि नाशिक जिल्ह्यात विंचूर येथे शाळेसाठी भव्य अशा इमारतींची निर्मिती केली. यातच त्यांच्या कार्याचा आवाका आपणास जाणवतो. 

सुकाणू समिती, माध्यमिक शालांत परीक्षा मंडळ, पुणे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे, जॉईंट कौन्सिल शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य., महाराष्ट्र राज्य शिक्षण सुधार राज्य सल्लागार समिती या संस्थांचे सदस्य म्हणून काम करताना शिवाजीराव पाटील यांनी त्या क्षेत्रात मोलाची भर घातली. पुणे विद्यापीठाच्या विधिसभेचे सदस्य, पुणे जिल्हा ॲमॅच्युअर अॅथलेटिक्स असोशिएशन, ऑल इंडिया फेडरेशन ऑफ हेड मास्टर्स असोशिएशन या संस्थांचे उपाध्यक्ष म्हणूनही शिवाजीराव पाटील यांनी यशस्वी धुरा वाहिली. पुणे जिल्हा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महासंघ, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महासंघ ( विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र) या संस्थांचे अध्यक्ष म्हणून काम करताना शिवाजीराव पाटील यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला. 

संस्था आणि संघटनांच्या व्यापाशिवाय समाजातील अनेक वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची सतत धडपड चालू असे. ‘दिल्याने वाढते ते ज्ञान’ या तत्त्वाचे ते पाईक आणि उपासक होते. विशेषतः हे ज्ञान समाजातल्या दुर्बल घटकांपर्यंत पोहोचले पाहिजे हा त्यांचा हव्यास आणि हट्ट होता. म्हणूनच आदिवासी खेड्यापाड्यात त्यांनी पायपीट केली. तिथल्या लाजऱ्याबुजऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली करून दिली. इतकेच नव्हे तर त्यांना अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्याचे पवित्र कार्य शिवाजीराव पाटील यांनी अविरत व अथकपणे पार पाडले. 

१९८४ ते १९९० या काळात विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून गेल्यावरही शिवाजीराव पाटील यांनी आपल्यातला शिक्षक सजग आणि प्रभावी ठेवला. त्यांनी शिक्षण क्षेत्राला एक नवी दिशा, एक नवी उभारी देण्याचा प्रयत्न तर केलाच पण त्याचबरोबर एक सच्चा समाजसेवक तितकाच प्रभावी ठेवला हे त्यांच्या विधानपरिषदेतील सर्वव्यापक आणि अभ्यासपूर्ण भाषणांमधून आपणास दिसून येईल. शिवाजीराव पाटील यांचा समाजातील वावर हा सर्वांना प्रेरणादायी असाच होता. एक पुरोगामी विचारवंत, रंजल्या गांजलेल्यांना आपल्या जवळ घेणारा, त्यांच्या दुःखांवर फुंकर घालणारा आणि ‘नाहीरे’ जवळ ‘आहेरेची’ भूमिका घेऊन मदतीचा हात देणारा भला माणूस म्हणूनही ते सर्वपरिचित होते. संत गाडगे महाराजांचे प्रबोधन जसे त्यांच्या रोमारोमात भिणले होते तशीच साने गुरुजींची माया आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांची सेवावृत्तीही तितकीच भिणली होती. आदर्श कशाला म्हणावे याचे उत्तर शिवाजीराव पाटील यांच्याकडे पाहिले की आपोआप मिळून जात असे. असा एक सुपुत्र आंबेगाव तालुक्याला लाभला हे आपले भाग्यच म्हणायला हवे. 

९ जून, २०१५ रोजी पहाटे आपल्यातून ते निघून गेले असले तरी त्यांचे विचार ते आपल्यासाठी मागे ठेवून गेले आहेत. त्यांचे आदर्श ते मागे ठेवून गेले आहेत. अविरत अथकपणे लढण्याची वृत्ती ते मागे ठेवून गेले आहेत. माणसाने माणसाला जवळ केले पाहिजे, त्यांची सुखदुःखे समजून घेऊन ती दूर केली पाहिजेत ही शिकवण ते आपल्यासाठी ठेवून गेले आहेत. आयुष्यभर जी तत्त्वे त्यांनी जपली ती आपण प्राणपणाने जपणे आणि त्यांनी दाखविलेल्या विधायक विचाराच्या मार्गाने वाटचाल करुन तालुक्याचा समतोल विकास करण्यासाठी कटिबद्ध होणे हीच त्यांना खऱ्या अर्थाने वाहिलेली श्रद्धांजली ठरेल. शिवाजीराव पाटील यांच्या हव्याहव्याशा सहवासाला आणि त्यांच्या सुहास्य दर्शनाला तालुक्यातीलच नव्हे तर राज्यातील त्यांचे असंख्य विद्यार्थी आणि कार्यकर्ते मुकले आहेत. त्यांच्याशी सुसंवाद करुन आंबेगाव तालुक्याच्या विकासाला आणखी कशी गती द्यायची याची चर्चा करण्याऐवजी त्यांच्या स्मृतिग्रंथासाठी शब्द सुमनांजली मला वाहावी लागत आहे याचे मनस्वी दुःख वाटते. त्यांचे जीवन हाच एक आदर्श होता. तो आदर्श आपण शेवटपर्यंत जपण्याचा प्रयत्न करूया इतकेच याप्रसंगी मला म्हणावेसे वाटते. कृतज्ञतेच्या भावनेतून निर्माण होत असलेला शिवाजीराव पाटील स्मृतिग्रंथ महाराष्ट्रातील त्यांच्या असंख्य विद्यार्थ्यांना आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा देत राहील असा मला विश्वास आहे.

Read more at Karmayogeee

]]>
https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%a0/feed/ 0
शिक्षणक्षेत्रातील दीपस्तंभ  https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%aa%e0%a4%b8%e0%a5%8d/ https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%aa%e0%a4%b8%e0%a5%8d/#respond Mon, 08 Jun 2026 09:18:53 +0000 https://karmyogee.com/?post_type=docs&p=2333 Read more at Karmayogeee

]]>
आ. डॉ. पतंगराव कदम माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य, संस्थापक भारती विद्यापीठ

रयत शिक्षण संस्थेच्या सर्वसाधारण मंडळावर व व्यवस्थापन मंडळावर काम करताना मला प्राचार्य शिवाजीराव पाटील यांच्या रयतमधील, शिक्षण क्षेत्रातील समर्पित कार्याची माहिती मिळाली. त्यांचे व माझे चांगले स्नेहसंबंध होते व ते वाढत गेले. रयत शिक्षण संस्थेच्या मंचर येथील अण्णासाहेब आवटे कॉलेजचे प्राचार्य म्हणून प्र. आ. तथा आप्पासाहेब पानवळ हे आमचे स्नेही काम करीत असताना काही कार्यक्रमांच्या निमित्ताने माझे मंचरच्या कॉलेजमध्ये येणे-जाणे होत असे. त्या काळातच मंचरचे तळमळीचे नेते मा. किसनराव बाणखेले यांचाही माझा चांगला स्नेह जमला. याच भूमीत दिलीपराव वळसे-पाटील यांचेही नेतृत्व उदयाला आले व वाढले. मंचर, आंबेगाव ही कर्तृत्वाची व नेतृत्वाची समृद्ध भूमी आहे असे मला वाटते. 

शिवाजीरावांच्या पंच्याहत्तरीनिमित्त पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात २००५ मध्ये आयोजित केलेल्या त्यांच्या ‘अमृतमहोत्सव’ समारंभास प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली होती. मंचर येथील समृद्ध भूमीमध्ये एका सुसंस्कृत, त्यागी, शिक्षणप्रेमी कुटुंबामध्ये जन्मलेल्या माजी आमदार शिवाजीराव पाटील यांचा तो ‘गौरव सोहळा’ आजही माझ्या स्मरणात आहे. 

मंचर येथील शिवाजीराव पाटील यांच्या घराण्याला समृद्ध शैक्षणिक, सामाजिक वारसा आहे. त्यांचे वडील भाऊराव गेणूजी पाटील नाशिक येथील ट्रेनिंग कॉलेजचे शिस्तप्रिय प्राचार्य होते. त्यांच्या मातोश्री भागीरथी यासुद्धा सुशिक्षित व शिक्षणसंपन्न कुटुंबातून आलेल्या होत्या. शिवाजीरावांच्या वडिलांनी नोकरी सोडून मंचर येथे स्वतंत्र शिक्षणसंस्था स्थापन केली. खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यात तेरा हायस्कूल्स सुरू केली. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे आणि भाऊरावांचे स्नेहसंबंध होते. मंचर येथील त्यांच्या घरी १९५३ मध्ये तीन दिवस कर्मवीर अण्णांनी केलेल्या मुक्कामामध्ये या दोघांमध्ये प्रदीर्घ चर्चा होऊन भाऊरावांनी आपली संस्था व सर्व शाखा रयत शिक्षण संस्थेत विलीन केल्या. एवढेच नव्हे तर त्यावेळेपासून हे संपूर्ण घराणे रयतमय झाले. 

शिवाजीराव हे भाग्यवान कार्यकर्ते होते. त्यांना कर्मवीर अण्णांचा निकटचा सहवास लाभला. त्यांचा आशीर्वाद मिळाला. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी सातारा येथील रयतच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये घेतले. त्यांनी रयत शिक्षण संस्थेला वाहून घेतले. शिवाजीरावांची शैक्षणिक कारकीर्द उत्तुंग यशांनी समृद्ध आहे. १९५५ पासून ही शिक्षणसेवेची कारकीर्द सुरू झाली. शिरवळ, महाळुंगे- पडवळ, विंचूर (नाशिक) येथे मुख्याध्यापक व हडपसर, मंचर येथे प्राचार्य म्हणून त्यांनी धडाडीने काम केले. ते ज्या शाखेत गेले ती शाखा त्यांनी सर्वांगसुंदर केली. शाळांना मोफत जागा मिळविल्या, स्वावलंबनाने इमारती उभ्या केल्या, मैदाने तयार केली. इंग्रजीचे आपले तास ते स्वतःच घेत. रयत शिक्षण संस्थेतील त्यांचे उत्तम योगदान लक्षात घेऊन १९७२ मध्ये त्यांना रयतचे ‘लाईफ मेंबर’ करण्यात आले व त्याच वर्षी त्यांची रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे ‘इन्स्पेक्टर’ म्हणून अहमदनगर येथे बदली झाली. कडक शिस्त, नियमितपणा, गुणवत्ता आणि परिश्रम या बाबींवर सतत भर देऊन या विभागातील सर्व शाखांमध्ये त्यांनी शिस्तीची व गुणवत्तेची परंपरा निर्माण केली. कामकाजामध्ये कठोर शिस्त असूनही त्यांनी सहकाऱ्यांमध्ये कटुता येऊ न देता जिव्हाळा जपला. 

जून १९७५ मध्ये शिवाजीराव हडपसर येथील साधना विद्यालयाचे प्राचार्य म्हणून रूजू झाले. साधना विद्यालयाला एक चांगले नेतृत्व मिळाल्याचे मला त्यावेळी समाधान झाले. कारण १९६१ ते १९६६ या काळात या ठिकाणीच मी माझ्या जीवनकार्याचा पाया घातला होता. त्यामुळे साधना शैक्षणिक संकुलाशी माझे वेगळे भावनिक नाते आहे. पुणे शहराचे उपनगर असलेले हडपसर हे बागायतदारांचे आणि राष्ट्रसेवादलाच्या मुशीत घडलेल्या कार्यकर्त्यांचे उपनगर म्हणून परिचित होते. त्यावेळी साधना विद्यालयाची जागा ६ एकर १५ गुंठे होती. या जागेमध्ये पूर्वीचे प्राचार्य श्री. ए. डी. साळुंके, श्री. शं. मा. डिंगणे व श्री. व्ही. व्ही. पंडित यांनी मोठ्या परिश्रमाने भव्य व सुंदर इमारती बांधल्या. शिवाजीरावांनी त्यामध्ये सेवक निवासस्थान, प्राचार्य निवास, क्रीडांगण, कंपाऊंडवॉल, जिम्नॅशियम, विस्तारित इमारती ही कामे धडाडीने करून ‘साधना संकुला’चे वैभव वाढविले. रयतचे हडपसर येथील ‘साधना शैक्षणिक संकुल’ हे रयत शिक्षण संस्थेचे भूषण आहे असे मला वाटते. कर्मवीर आण्णांचा सहवास व शिकवण मिळालेल्या, त्याग – निष्ठा – परिश्रम या गुणत्रयीवर विश्वास असलेल्या सुरूवातीच्या पिढीतील कार्यकर्त्यांनी या संकुलाची सर्वांगसुंदर उभारणी केली आहे. या संकुलाचा पाया घालण्याची व त्याच्या उभारणीमध्ये महत्त्वाचे योगदान करण्याची मलाही संधी मिळाली. 

शिवाजीरावांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक, प्राचार्य, इन्स्पेक्टर, आजीव सभासद व उपाध्यक्ष या पदांवर उत्तम व संस्मरणीय योगदान दिले. रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये महत्त्वाच्या व जबाबदारीच्या पदांवर असूनही त्यांनी शिक्षक संघटनेमध्ये केलेले कार्यसुद्धा उल्लेखनीय आहे. महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे ते क्रियाशील कार्याध्यक्ष होते. राष्ट्रीय मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही शिवाजीरावांनी राष्ट्रीय स्तरावर काम केले. शिक्षक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले. हडपसर येथे काम करीत असताना १९८४ मध्ये शिवाजीराव शिक्षक मतदार संघातून विधानपरिषदेचे आमदार झाले. शिवाजीराव हडपसर येथे १९७५ ते १९८६ या काळात होते. या काळात निरनिराळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने वेळोवेळी साधनामध्ये जाण्याची मला संधी मिळाली त्या त्या वेळी शिवाजीरावांनी दूरदृष्टीने व परिश्रमाने तेथे घडविलेले परिवर्तन मी पाहिले आहे. 

रयत शिक्षण संस्थेत विविध ठिकाणी शिवाजीरावांनी केलेले काम पाहिले की लक्षात येते शिवाजीराव हे तळमळीचे शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक, निष्ठावंत रयत सेवक, शिस्तप्रिय प्रशासक होते. त्यांनी आयुष्यभर सामाजिक बांधिलकीचे भान ठेवले. त्यामुळे सामाजिक क्षेत्रामध्ये जिद्दीचा व धडाडीचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी ख्याती प्राप्त केली. निर्मळ चारित्र्य, चोख व्यवहार, कडक शिस्त, माणुसकी, उत्तम संघटन कौशल्य, अढळ ध्येयनिष्ठा अशी त्यांच्या संपन्न व्यक्तिमत्त्वाची अनेक वैशिष्ट्ये होती. शिवाजीराव पाटील हे महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची पताका खांद्यावर घेऊन निःस्वार्थी भूमिकेतून कार्य करणारे थोर व सच्चे रयतसेवक होते यात संशय नाही. रयत शिक्षण संस्थेच्या बैठकांनिमित्त तसेच अनेक कार्यक्रमांमधून शिवाजीरावांची व माझी वरचेवर भेट होत असे. त्यांचे वय झाले तरी त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि उदंड उत्साह इतरांना प्रेरणादायी वाटत असे. मार्च, २०१५ मध्ये ते मला वरळी, मुंबई येथे भेटले होते. त्यानंतर तीन-चार महिन्यांनी ते आपल्यामधून गेले. तथापि शिवाजीराव पाटील यांचे उत्तुंग जीवनकार्य भावी पिढीस दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरेल असा मला ठाम विश्वास वाटतो.

Read more at Karmayogeee

]]>
https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%aa%e0%a4%b8%e0%a5%8d/feed/ 0
रयतेचे पाईक व कार्यक्षम आमदार  https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%b0%e0%a4%af%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%95-%e0%a4%b5-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%ae-%e0%a4%86/ https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%b0%e0%a4%af%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%95-%e0%a4%b5-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%ae-%e0%a4%86/#respond Mon, 08 Jun 2026 09:29:45 +0000 https://karmyogee.com/?post_type=docs&p=2338 Read more at Karmayogeee

]]>
रयतेचे पाईक व कार्यक्षम आमदार 

मा. डॉ. सुधीर तांबे माजी आमदार, विधानपरिषद, नाशिक पदवीधर मतदार संघ.

कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या कार्याने प्रेरित झालेले व संपूर्ण जीवन शिक्षण क्षेत्रासाठी वाहून घेणारे हाडाचे शिक्षक असलेले बाणेदार शिवाजीराव पाटील हे रयतेचे पाईक असलेले कार्यक्षम आमदार म्हणून सदैव प्रेरणादायी ठरणारे व्यक्तिमत्त्व होते. वडील शिक्षणमहर्षी भाऊराव गेणूजी पाटील व आई भागीरथीबाई यांच्याकडून त्यांना शिक्षण व समाजकार्याचे बाळकडू मिळाले. बालपणी त्यांना कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांचा सहवास लाभला. त्यांच्या विचारांनी प्रभावित झालेले शिवाजीराव पाटील यांनी अविरतपणे रयतेचे सेवक म्हणून काम केले. 

रयत शिक्षण संस्थेत उपशिक्षक, प्राचार्य ते टी.डी.एफ. चे शिक्षक आमदार व शेवटी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष या त्यांच्या जीवनातील टप्प्यांवर त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा निर्माण केला. हाडाचे शिक्षक असलेले आमदार पाटील हे विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. सदैव कार्यरत राहणे हा त्यांच्या जीवनाचा ध्यास होता. त्यांनी मुख्याध्यापक संघटनेचे अनेक वर्षे नेतृत्व करून मुख्याध्यापक संघाला एक चांगली दिशा दिली. महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिक धोरणाला एक वेगळे वळण देणारे एक मोठे व्यासपीठ त्यांनी मुख्याध्यापक महासंघाच्या माध्यमातून उभे केले. 

महाराष्ट्रातील माध्यमिक शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेत १९८४ साली पुणे विभागातून शिवाजीराव पाटील शिक्षक लोकशाही आघाडीचे (टी.डी.एफ.) आमदार म्हणून बहुमताने निवडून आले. त्यावेळचे शिक्षक संघटनेचे नेते आदरणीय तात्या सुळे, कै. पाटकर, प्रकाशभाई मोहाडीकर, शेखर कासार, नाना पानसे या सर्व सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळवण्यात त्यांना यश आले व त्यातून शिक्षक संघटनेला एक खंबीर, उदार, समाजाभिमुख शिक्षक नेतृत्व मिळाले. उभ्या महाराष्ट्रात प्रत्येक शाळा व शिक्षकापर्यंत संघटना शिवाजीराव पाटलांच्यामुळे पोहचली. त्यांच्यामुळेच संघटनेला एक लढाऊ स्वरूप आले व संघटनेच्या शैक्षणिक कार्यासाठी एक आदर्श पायंडा त्यांनी घालून दिला. शिक्षक संघटना ही फक्त मागण्या पदरात पाडून घेणारी संघटना न राहता ती शिक्षण प्रक्रियेत एक जबाबदार घटक म्हणून कशी कार्यरत राहील, विद्यार्थी आणि शिक्षक कल्याणाचे हे महत्कार्य कसे चांगले होईल या ध्येयासक्तीने शिवाजीराव पाटील यांनी या संघटनेला चांगली दिशा दिली. 

शिक्षक आमदार, शिक्षकांचा नेता म्हणून आदर्श व लढाऊ कार्य केले. विधिमंडळात महाराष्ट्राच्या शैक्षणिक धोरणाला एक चांगली दिशा देण्याचे ऐतिहासिक असे कार्य शिवाजीराव पाटीलांनी केले. त्यांनी शासनाला अनेक बाबतीत योग्य शैक्षणिक धोरण राबवायला भाग पाडले. त्यांची विधानपरिषदेतील भाषणे, त्यांनी घडवून आणलेल्या चर्चा व त्यात मांडलेले शैक्षणिक विचार शिक्षण क्षेत्रात मैलाचे दगड व मार्गदर्शक ठरले आहेत. अनेक महत्त्वाच्या बाबतीत महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री व वरिष्ठ शिक्षण अधिकारी शिवाजीराव पाटलांचे मत विचारात घेत असत. आमदारकीच्या काळात व पुढेही संघटनेचे अध्यक्ष असताना शेवटपर्यंत महाराष्ट्रभर हा माणूस पायाला भिंगरी बांधून हिंडत राहिला. संघटनेचे व शैक्षणिक जागृतीचे काम करण्यासाठी ते दऱ्याखोऱ्यात, आदिवासी व महाराष्ट्राच्या इतरही भागात सदैव हिंडतच राहिला. शिवाजीराव पाटील यांनी एक शिक्षक आमदार म्हणून केलेले कार्य, एक अभ्यासू शैक्षणिक कार्याला आदर्श दिशा देणारे, बहुजन समाज व सामान्य शिक्षक, शिक्षण प्रसार, दर्जेदार शिक्षण याला एक वळण देणारे कार्यसम्राट आमदार म्हणून सर्वांच्या स्मरणात राहणारे आहे. 

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शाळा शाळांपर्यंत, प्रत्येक शिक्षकांपर्यंत हा अवलिया शिक्षक आमदार, शिक्षक नेता शेवटपर्यंत भेटत राहिला. थांबणे हा जणू शिवाजीरावांचा पिंडच नव्हता. सतत कार्यरत राहणे व कामाकरीता भ्रमंती करणे हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभावच होता. महाराष्ट्रातील शिक्षकांचा ते एक आवाज होते, सर्वांचे आदर्श, सर्वांचे आधारस्तंभ, सर्वांचे नेते होते. तसेच सर्वांचे हितचिंतक, स्नेही व जीवाभावाचे मित्रही होते. सर्वांना जोडणारा जणू तो एक सेतू होता. दुवा होता. 

शिक्षक संघटना, रयत शिक्षण संस्था इतर शैक्षणिक संस्था व शैक्षणिक कार्यासाठी ते शेवटपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपला संदेश पोहचवत राहिले. शिवाजीराव पाटलांचा स्वभाव व त्यांची काम करण्याची पद्धत काही वेगळीच होती. सर्वांना बरोबर घेऊन जाणारी त्यांची आगळीवेगळी पद्धत होती. एक तळमळीचा आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक व आदर्श मुख्याध्यापक म्हणून उत्तम प्रशासक, प्रसंगी कठोर पण तितकाच मृदू, मुलायम अंत:करणाचा माणूस म्हणून त्यांचा स्वभाव सर्वांना ज्ञात होता. तसेच संस्थेच्या प्रशासनातही आपल्या कामाचा प्रभावी ठसा उमटविणारे पण सर्वांच्या हिताची चिंता वाहणारे, शिक्षकांचे खरे हितचिंतक, मार्गदर्शक, समाजाभिमुख स्वभाव व कार्य असणारे हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. शिवाजीरावांशी परिचय झालेल्या, त्यांच्या सान्निध्यात गेलेल्या प्रत्येकाला याचा अनुभव आला आहे. त्यांच्या जवळ गेलेला मनुष्य, त्यांचा स्नेही, चाहताच बनून जायचा. समाजाच्या सर्व स्तरातील सर्वांना ते आपल्या स्वभाववैशिष्ट्यांमुळे आपल्याबरोबर न्यायचे. त्यामुळे सर्वांना ते आपलेच आणि हवेहवेसे वाटायचे. म्हणून ते सर्वांना प्रिय असे सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्वाचे आदर्श पुरुष होते. शिस्त व वक्तशीरपणा याबाबत माजी शिक्षक आमदार व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील उर्फ दादा सतत सतर्क होते. विचार मांडताना समाजहीत समोर ठेवून ते बोलत असत. ‘मोडेन पण वाकणार नाही’, हे तत्त्व त्यांनी आयुष्यभर जपले. त्यांनी दिलेल्या ज्ञानातून हजारो विद्यार्थी राज्यात मोठ्या अधिकारी पदावर व प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. माणसे जोडणे व त्यांची मैत्री टिकवून ठेवणे हा दादांचा आवडता छंद होता. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यांचे दैनंदिन कामकाजही वाखाणण्यासारखे होते. प्रवासाचा त्यांनी कधीही कंटाळा केला नाही. वय ८७ वर्षे होऊनही ते सुरक्षितपणे व सफाईने त्यांची जीप चालवत असत. याविषयी सर्वांनाच कुतुहल होते. दररोजच्या कामाचे वेळापत्रक तयार करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर त्यांचा कटाक्ष होता. ठरलेल्या कार्यक्रमात त्यांच्याकडून सहसा कधीही बदल होत नसे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या स्मृती अजुनही नजरेआड होत नाहीत. सर्वसामान्य जनतेचे व शिक्षकांचे प्रभावी व कुशल नेतृत्व म्हणजे शिवाजीराव पाटील उर्फ दादा यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

Read more at Karmayogeee

]]>
https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%b0%e0%a4%af%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%95-%e0%a4%b5-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%ae-%e0%a4%86/feed/ 0
एक असामान्य व्यक्तिमत्त्व  https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d/ https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d/#respond Mon, 08 Jun 2026 11:24:46 +0000 https://karmyogee.com/?post_type=docs&p=2381 Read more at Karmayogeee

]]>
मा. श्री. लक्ष्मणराव चतूर माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, पुणे

जीवन म्हणजे जन्म व मरण ठरलेले. परंतु आमच्यासारख्या जवळच्या कार्यकर्त्यांना चाळीस वर्षापूर्वी ते जसे दिसायचे तसे आजपर्यंत थोड्याफार फरकाने वाटायचे. त्यांचे जाणे हे आम्हाला अकल्पनीय व धक्कादायक वाटते. पिळदार शरीर, तजेलदार व तुकतुकीत चेहरा, उन्नत भालप्रदेश, सरळ व काहीशी बाकदार नासिका, आश्वासक व भेदक नजर, रंग रूप व शरीराची ठेवण यात असलेला मराठी बाज, बलवान बाहू, भरदार छाती, ऐटदार चाल, डोक्यावरील करडे केस मागे सावरलेले, कानाच्या पाळ्याही जरा मोठाल्या! शब्दामध्ये धार होती, विचार ठाम होते, मुद्दयांच्या मांडणीमध्ये स्पष्टता व पारदर्शिपणा होता. हजारो लोकांमध्ये दादांचे व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्यपूर्ण वाटायचे. 

इंग्रजीमध्ये एक म्हण आहे He came he saw and he conquered. (तो आला, त्याने पाहिले, त्याने जिंकले) असाच नगर जिल्ह्यात शिक्षकांचा मेळावा होता. शिक्षकांच्या समस्यांबद्दल काथ्याकूट चाललेला होता. वातावरण मरगळलेले होते. शेवटी दादा अध्यक्षीय भाषणासाठी उभे राहिले. हजारो शिक्षकांच्या कंटाळलेल्या सभेत एकदम पिनड्रॉप सायलेन्स. दादांनी तब्बल एक तास सर्व मुद्दयांचे खंडन-मंडन करून सभा जिंकली. छबिलदास हायस्कूल, दादर मुंबई येथील सभा किंवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मोर्चेकरी शिक्षकांची सभा असो, दादांच्या विचारांमध्ये ठामपणा असायचा. दादांचे कर्तृत्त्व, वक्तृत्त्व व व्यक्तिमत्त्व एकमेवाद्वितीय होते. 

तांबड्या मातीतील एकेकाळचे झुंजार मल्ल असल्याने, त्यांना कधी आलेल्या प्रतिकुलतेतही आपण जिंकणारच अशा जिद्दीने ते रहायचे. शिवाजीराव पाटील अत्यंत निसर्गप्रेमी होते. कोकणात संघटनेच्या कामी प्रवास करताना कोकणातील दुतर्फा फुललेली सावर, मोगिरी, पांगारा, पळस आणि नारंगी पिवळी सर्पगंधाची फुले त्यांना आकर्षित करून घ्यायची. गाडीचा प्रवास चालू असताना मावळतीच्या उन्हात, पूर्वेकडच्या डोंगर खलाटीवर सप्तरंगी इंद्रधनुष्य पाहून गाडी तेथेच थांबणार व त्या सुंदर निसर्गाचा आस्वाद घेणार. कोकणातील समुद्रकिनारा त्यांना सदैव रमणीय वाटायचा. डिंभा, वडज या धरणांच्या जलाशयांच्या सान्निध्यात हटकून फेरफटका मारायचे. चांदण्या रात्रीत वडज धरणाच्या कडेला मित्रमंडळी व परिवारासह वनभोजन करण्यात त्यांना मनस्वी आनंद वाटायचा. 

वृक्ष, वेली व फुले यांच्यावर त्यांचे फार प्रेम असायचे. एक आठवण अंगावर शहारे आणणारी अशी होती ती अशी, चाकणच्या पश्चिम भागात शरद जोशींच्या आंबेठाण गावाजवळून आम्ही डोंगराच्या कुशीत असलेल्या एका कार्यकर्त्याच्या गावी चाललो होतो. गाडीत फक्त आम्ही तिघे होतो. दादा, मी व पाठीमागच्या सिटवर बसलेल्या वहिनी. त्या ओसाड, बोडक्या प्रदेशात पानाफुलांच्या सांभाराने दृष्टी वेधणारा एक डबडबीत वृक्ष दादांनी उजव्या बाजूला पाहिला. स्टिअरींग हातात असताना ते प्रत्येक सेकंद दोन सेकंदाला त्या वृक्षाकडे पाहत होते. आम्हालाही दाखवत होते. गाडीसाठी रस्ता अडचणींचा आहे. हे म्हणण्याचे धाडस माझ्यामध्ये नव्हते आणि पुढच्या ३/४ सेकंदांतच कचकन ब्रेक लावून दादांनी गाडी थांबविली. त्यावेळी गाडी एक फुट उंच उडून आदळली आणि रस्त्याच्या उजव्या बाजूच्या १५ फुट खोल असलेल्या घळईच्या काठावर गाडी थांबली. घळईच्या तळाला खोल दगडाचा टपरा होता. मोठ्या कठीण प्रसंगातून आम्ही वाचलो ते केवळ दादांच्या समय सुचकतेमुळे व त्यांच्या योग्य प्रतिक्षिप्त क्रियेमुळेच. त्या प्रसंगाचे भाष्य करताना दादा म्हणाले, “चालयचेच आपले जीवन हे फुलांसारखे आहे. म्हणजे क्षणभंगुर आहे.” 

दादांना सह्याद्री माथ्यावरील कडेपठार व खोल-खोल घळ्यातून वाहणारे जलप्रवाह, दुतर्फा असलेली हिरवी पोपटी भातशेती तसेच मोहाची फुललेली सुंदर फुले पाहण्यात मोठी अभिरूची असायची. जुन्नर भागातील मी व शिक्षक संघटनेचे नेते के. एस. ढोमसे आम्ही दादांना वनभोजनासाठी आग्रहाने निमंत्रित केले. दादांना समृद्ध निसर्गाचे आकर्षण होते. दादांच्या सोबत वहिनी (लीलाताई पाटील) त्यांचा प्रिय नातू चि. रणजित तसेच रावसाहेब आवारी, वसंतराव काळभोर, के. एस. ढोमसे, लाजारस उपार, हनुमंतराव कुबडे हे सपत्निक आलेले होते. अत्यंत महत्त्वाची व्यक्ती म्हणजे स्वयंस्फूर्ती व दादांवरील भक्तीने, दादांना सदैव साथ देणारे बाळासाहेब खानदेशे जणू काही शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांसारखा जीवा महालाच होय. त्यावेळी मावळतीच्या उन्हांमध्ये हिरड्यांची कोवळी फळे, चैत्र महिन्यात फुललेले वनवृक्ष तसेच दऱ्याघाटातून पश्चिमेकडे कोकणाचे दूर खोलीवर पसरलेले विहंगमय दृश्य पाहून दादा इतके आनंदी, उत्साही झालेले आम्ही पाहिले. घाटघर गावचे त्यावेळचे सरपंच मा. चंद्रकांत शिंगाडे यांनी आमचा सर्वांचा योग्य पाहुणचार केला. शेवटी जुन्नर येथे सौ. श्री. ढोमसे ह्यांचे हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला. असाच कार्यक्रम आहुपे घाटावर आयोजित व्हावा अशी दादांची इच्छा तांत्रिक अडचणींमुळे आम्हाला पूर्ण करता आली नाही. त्याचे शल्य आम्हाला आजही बोचत आहे. व दादांच्या दैनंदिन जीवनात हाकेसरशी धावून येणाऱ्यांमध्ये सर्वश्री बयाजी थोरात, बाजीराव गुंजाळ, नाथा पडवळ, हरिभाऊ मोरडे, विजय गाडे, भीमराव बाणखेले, के. एस. ढोमसे, सखारामतात्या शिंदे, बळी आवटे, कैलास कांबळे असे अनेकजण आहेत. हे जवळचे स्नेही व दादांच्या सावलीत वावरणारी मंडळी दादांच्या वियोगाने व्यथित झालेली आहेत. लहानपणी एकत्र शिकलेल्यांपैकी तुळशीराम गांजाळे व दादा यांना एकमेकांच्या घरी जाऊन हे नव्वदीतले मित्र दिलखुलास गप्पा गोष्टी करायचे. दादांचे माजी विद्यार्थी माजी खासदार स्व. किसनराव बाणखेले व प्रा. ठकसेन बाणखेले हे एकनिष्ठ अनुयायी होते. दादांचा शब्द त्यांनी कधी खाली पडू दिला नाही. खासदार मा. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशीही त्यांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते. अशा रीतिने सांगण्यासारख्या आठवणी बऱ्याच आहेत. विस्तार भयास्तव दादांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करुन येथेच थांबतो. 

Read more at Karmayogeee

]]>
https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d/feed/ 0
सासरे देवो भव  https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%8b-%e0%a4%ad%e0%a4%b5/ https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%8b-%e0%a4%ad%e0%a4%b5/#respond Mon, 08 Jun 2026 11:18:22 +0000 https://karmyogee.com/?post_type=docs&p=2379 Read more at Karmayogeee

]]>
सौ. छाया उदयराव पाटील शिवनेरी, मंचर, पुणे

मी आणि उदयराव १९८८ सली विवाहाच्या बंधनात बांधले गेलो आणि त्या दिवसापासून कु. छाया तुकाराम ढोले ही सौ. छाया उदयराव पाटील बनली. मी पाटील घराण्याची सून म्हणून ‘शिवनेरी’ बंगल्यात पाऊल ठेवले आणि पूर्ण पाटीलमय होऊन गेले. तसे पहिले तर माझे आजपर्यंतचे सर्व आयुष्य मुंबईत गेले. मी मुंबईतच जगले- शिकले- वाढले. त्यामुळे मला गावच्या वातावरणाचा काहीच अंदाज नव्हता. त्यावेळी आमचे गाव फार छोटे आणि मोजकेच होते. शहरी वातावरणाची मला सवय होती. त्याच सवयी आमच्या घरात होत्या. गावाकडचे गावपण आमच्या घरात नव्हते. याला कारण म्हणजे माझे सासरे शिवाजीराव पाटील व माझ्या सासुबाई डॉ. सौ. लीलाबाई पाटील. 

आमच्या घरातील वातावरण शहरी असल्यामुळे मी लवकरच या घरात रुळले. सुरुवातीला मी घरात काहीही केले तरी त्याचे कौतुकच व्हायचे. लग्न झाल्यानंतर या घराणे, पूर्ण पाटील कुटुंबीयांनी माझे खूप कोडकौतुक केले. मला या घरात सुरुवातीला नवीन सून म्हणून आल्यावरही आणि नंतरही कधीही परकेपणा जाणवला नाही. हे घर आणि या घरातील माणसे कधीही मला दूरची वाटली नाहीत. या माणसांनी मला नेहमी मुलीप्रमाणेच वागवले. या घरातील सर्व व्यक्तींच्या मनात माझ्याबद्दल आत्मियता असल्याचे मला सतत जाणवायचे. त्यामुळे हे घर कधीही मला सासर वाटले नाही. तर माहेर कम सासर म्हणूनच मी इथे नांदू लागले. मुलुंड (माझे माहेर) ते मंचर यामधील अंतर एकदम कमी झाले. 

पुढे थोड्याच दिवसांनी कु. रणजितचा जन्म झाला. त्या दिवशी दादांचे मुंबईला अधिवेशन चालू होते. त्यांनी दिवसभर अधिवेशन पार पाडले आणि रात्री उशिरा रणाजितला पाहायला आले. त्याचवेळी त्यांनी ‘रण जिंकणारा तो रणजित’ असे त्याचे नामकरणही केले. त्यांना रणजितच्या जन्माचा फार आनंद झाला होता. त्या आनंदाच्या भरातच त्यांनी दुसऱ्या दिवशी अख्या शाखेला पेढे वाटले. नुसते पेढेच वाटले असे नाही तर त्यांचे काही सहकारी व गावातील काही मंडळींना त्यांनी जेवणाची मेजवानीच दिली. माझ्या सासऱ्यांना म्हणतात ना, ‘खानेवालों को खाने का बहाना चाहिए’ अगदी तसंच नेहमी जेवणाची मेजवानी देण्यासाठी काही तरी बहानाच लागत असे आणि तेही नॉनव्हेजचे. ते नेहमी म्हणत, “वाघ काय गवत खातो का ?” स्नेह्यांना, मित्रांना, आप्तेष्टांना जेवू घालण्यात त्यांना कोण आनंद मिळे. 

यानंतर ते जेव्हा जेव्हा घरी असत तेव्हा तेव्हा ते आपला बराचसा वेळ कु. रणजित बरोबर घालवत. त्याच्यासोबत खेळताना ते लहानांपेक्षाही लहान होऊन जात.. ते घरी असले की त्याची मालिश करीत. त्याच्याबरोबर अनेक प्रकारचे खेळ खेळत. त्याला ते हवेत वर अलगद फेकत व पुन्हा झेलत, हातावर उभे करत. आमच्या ‘ बँगोला ‘ ( आमचा अल्सेशियन कुत्रा ) खाऊ घालीत. त्यांचा असा हा दिनक्रम रणजितबरोबर ठरलेला असे. यातून ते जणू काही प्राण्यांना आपलेसे कसे करावे ? जीवनात बॅलन्स कसा राखावा ? याचे धडेच देत होते. रणजितला शिस्तीचे धडे देण्यामध्ये, त्याच्यावर संस्कार करण्यात व त्याला घडविण्यामध्ये त्यांची फार मोठी साथ आम्हा दोघा उभयतांना मिळाली. देशासाठी, लोकांसाठी काम करावे ही शिकवण त्याला आजोबांकडूनच मिळाली. तो ज्यावेळी योग गुरु रामदेवबाबांकडे गेला होता. तेथून परत आल्यावर त्यांनी त्याला त्याच्याकडे तेथील कामाविषयी चौकशी केली. त्यावेळी ते त्याला म्हणाले, ‘‘आपल्या घराची परंपरा आहे की, लोकांचे भले व चांगले होईल असेच काम करायचे. तुला ती संधी मिळाली आहे. या गोष्टीचा फायदा घे. नाव कमव आणि मोठा हो. तोच आम्हाला अभिमान आहे.” हेच बाळकडू लहानपणापासून दादांनी त्याला दिले व रणजितनेही ते सार्थकी लावले. 

सगळे म्हणतात की, दादा खूप कडक व रागीट; पण मी म्हणेन ते चुकीचे आहे. त्यांचे ‘नाठाळाच्या माथी हाणू काठी’ या उक्तिप्रमाणे होते. जे लोक चुकीचे, खोटे होते त्यांनाच ते रागीट आणि कडक होते. त्यांनी नेहमीच सत्याची साथ दिली. अरे ते किती प्रेमळ, हळवे आणि संवेदशील होते ते मी अनुभवले आहे. माझे लग्न झाल्यावर आम्ही आमच्या लग्नाचा व्हिडिओ बघत होतो. माझा लग्नानंतरच्या बोळवणीचा प्रसंग पाहून दादांना स्वतःला रडू आवरेना. ते उठून आत आले आणि म्हणाले, “मला नाही बघवत’ आणि ते तोंड धुवून आपल्या रूममध्ये बसले. 

दुसरा प्रसंग आमच्या आईंना पहिल्यांदा अचानक काही त्रास झाल्यामुळे आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दादा त्यावेळी टी.डी.एफ. च्या दौऱ्यावर होते. त्यांना कळताच ते आईंना बघायला ताबतोब आले. त्यावेळी त्या धीरोदात्त माणसाच्या डोळ्यात मी चक्क अश्रू पाहिले. तेव्हा मला कळले की, बाहेरून इतका नारळासारखा कडक असणारा माणूस आतून किती हळवा आहे. 

दादांनी व सौ. आईंनी मला घरामध्ये खूप प्रेम दिले. त्यांनी माझ्याकडे कधी सून म्हणून पाहिलेच नाही. आपल्या लेकीवर तिचे आई-वडील जेवढे प्रेम करतात, जेवढी माया करतात तेवढीच माया, तेवढेच प्रेम मला या उभयतांनी दिले. घरात विचारांचे, राहण्याचे, वागण्याचे, बोलण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले. महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत मला सामावून घेतले. मला माझ्या विचारांना त्यांनी खूप जपले. माझे लग्न झाले तेव्हा घरातील काही मंडळींना असे वाटत होते की, आपल्या परंपरेनुसार माझेही छाया हे नाव बदलून माझ्या हसऱ्या स्वभावाप्रमाणे स्मिता हे नाव द्यावे. परंतु मला नेहमीच वाटे की जन्मल्यापासून ते आजपर्यंत आपणाला आपल्या आई-वडिलांनी ठेवलेल्या नावानेच ओळखले जात होते. ते नाव ही एकच गोष्ट अशी आहे जी आपल्या आई वडिलांची आठवण म्हणून सतत आपल्या बरोबरच राहणार आहे अगदी अपल्या शेवटच्या श्वासापर्यंत. म्हणून मी माझे हे सर्व विचार आईंना सांगितले. आईंनी ते दादांना सांगीतले तेव्हा दादा म्हणाले, “तिची इच्छा नसेल नाव बदलण्याची तर नका बदलू. राहू द्या आहे ते.‘“ त्यांनी मला कधीच कशाची उणीव भासू दिली नाही. 

ते मातृभक्त ही फार होते. ते नेहमी बाहेर पडताना दादींच्या फोटोला नमस्कार करूनच बाहेर पडायचे. सगळ्यांना मदत करणे, अडी-अडचणीत असणाऱ्या लोकांना मदत करणे हे तर त्यांच्या रक्तात भिनले होते. आमचे फॅमिली फ्रेंड, ड्रायव्हर मामू जमील शेख यांना Heart Operation सांगितले होते. पण त्याचा खर्च तर खूप होता. मग काय ? ते म्हणाले, “दादा मला शक्य नाही.” त्यावेळी त्यांनी रणजितच्या वडिलांना सांगितले, “उदय, सध्या तू माणूंना मदत कर. बाकी मी बघतो.” त्यांनी त्यावेळी वेगवेगळ्या संस्थां, क्लब यांना पत्रव्यवहार करून आणि हो मुख्यमंत्री फंड निधीमधूनसुद्धा मामूंना बरीच मदत मिळवून दिली. यानंतर आमचे सरकती श्री बयाजी हे त्यांच्या मुलाला पुढील शिक्षण देण्यासाठी हतबल झाले होते. ते एक दिवस घरी आले आणि दादांना म्हणाले, ‘“दादा माझी काही अमितला पुढे शिकवण्याची ऐपत नाही. मोठ्या अभिला शिकवून मी थकलो. तुम्ही अमितला कॉलेजवर नोकरीसाठी लावून द्या.” त्यावर दादांनी मला व त्यांच्या काँग्रेसला हाक मारली (काँग्रेस म्हणजे आमच्या आई, दादा आईंना नेहमी काँग्रेस म्हणत). ते म्हणाले, “बघ, हा काय म्हणतो ते ऐक,” आणि त्यांनी त्यांचे म्हणणे सांगितले. त्यावेळी मी बयाजींना म्हणाले की, ” आम्ही त्याला शिक्षणासाठी दत्तक घेतो. त्याला काय हवे ? काय नको ? ते बघतो.” त्यावेळी दादांनी त्याला पुढील शिक्षणासाठी अॅडमिशन घेऊन दिले आणि तो मुलगा आता एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर काम करत आहे. 

त्यावेळी कधी गरीब, श्रीमंत, नोकर, मालक हा भेदभाव दादांनी केला नाही. आमच्या घरी वडगाव- पीरची कु. प्रमिला शिंदे ही मुलगी दहावी झाल्यानंतर आली. घरची परिस्थिती बेताची म्हणून आमच्याकडेच राहायची. मला घरामध्ये खूप मदत करायची. सगळ्या गोष्टी अगदी माझ्यासारखीच करायची. घरातल्या स्वयंपाकापासून ते साफसफाई,पाहुण्यांची उठबस, दादा आणि आई, दादी यांची बडदास्त करण्यापर्यंत. ती लहानपणी भाजली होती. थोडे दिवसांनी तिचे मानेचे दुखणे चालू झाले. दादांनी तिला डॉक्टरांकडे नेऊन सगळ्या हव्या त्या तपासण्या करून, एक्सपर्ट डॉक्टरांचा सल्ला घेऊन तिचे operation with plastic surgery करून तिचे दुखणे घालवून देखणे केले. आज ती प्राचार्य दत्तात्रय बनसोडे यांच्याशी विवाह करून आपल्या संसारात आनंदी आहे. या अनुभवातून मला एवढेच सांगायचे आहे की, दादांना सभोवतालच्या माणसांचे दुःख, वेदना, कष्ट सहन व्हायचे नाही. त्यांच्याच्याने ते पहावत नसे. त्यासाठी ते स्वतःच्या ऐपतीप्रमाणे यथाशक्ती प्रयत्न करून मदत करत. आमच्या जुन्या घरात गरीब, हुशार, होतकरू मुलांना शिक्षणासाठी ठेवून घेत व वेळप्रसंगी त्यांना मदत करणे ही परंपरा त्यांनी महाळुंगे पडवळपासून मंचरपर्यंत जपली. त्यातील उदाहरण द्यायचे झाले तर विजय गाडे सर, चंदू गाडे सर, भालेराव सर, घावटेनाना या जुन्या पिढीतील व्यक्तींची नावे देता येतील. आताची म्हणजे माझ्या लग्नानंतरची तरुण पिढींची नावे द्यायची झाली तर युवराज, रामदास गाढवे, गोरक्ष चिकणे सर ही मुले आता मोठ्या पदावर कार्यरत आहेत. 

ते जसे हळवे होते तसे ते प्रेमळही होते. लहान मुलांबरोबर खेळताना ते अगदी लहान होऊन जात. मुलांना फुटबॉल, बॅट बॉल व इतर खेळणी आणून देत. आई नेहमी सांगत दादा हडपसरला गेले की मुलींना बांगड्या, बाहुल्या, कोणाला भातुकलीचा खेळ इत्यादी खेळणी आणून देत व ती खेळायची कशी हेही शिकवत. ते स्वतः उत्तम व्हॉलीबॉल प्लेअर होते. त्यांनी रणजितला पाचवीमध्ये गेल्यावर जगाचा नकाशा आणला. कारण त्याला नकाशा वाचनाची आवड निर्माण व्हावी व जगात किती देश व राज्य आहेत हे माहित व्हावे. त्यांनी त्याला रणगाडा, लढाऊ विमान तसेच पहिली सायकल आणि चार चाकी गाडीही त्यांनीच घेऊन दिली. आणि हो चार चाकीचा Expert Driver तो त्यांच्याबरोबर जाऊनच बनला. त्याचा एक अनुभव सांगते. नवीन गाडी आणली की आम्ही आमच्या कुलदेवतेला जात असू. त्याही दिवशी अम्ही निघालो तेव्हा त्यांनी ड्रायव्हर सीटवर रणजितला बसवले व चल म्हणाले. त्याने गाडी रस्त्याला फार वेगात चालवली. त्यांनी वाट पाहिली की हा थोडा स्पीड कमी करेल म्हणून पण रणजितच तो. तो काही स्पीड कमी करेना. काही वेळाने आजोबा त्याला म्हणाले, “जरा गाडी बाजूला घे!” त्याला काही समजेना. ते गाडीतून उतरले आणि त्याला शांतपणे म्हणाले, “तुला स्पीड कमी करायचा असेल तरच मी येतो, अन्यथा इथेच थांबतो.” त्यांच्या आवाजातील शांत जरब रणजितच्या लक्षात आली आणि ती आजतागायत लक्षात आहे. दादा वयाच्या ५७व्या वर्षी चार चाकी गाडी चालवायला शिकले असले तरी Expert and safe control driving ही शिकवण दादांनी त्याला दिली. पोहणे, किल्ले चढणे, व्यायाम करणे, धावणे या सर्व सवयी त्यांच्या वडिलांच्या बरोबरीने दादांनी रणजित व त्याचे मित्र या सर्वांमध्ये निर्माण केल्या. 

दादांनी सर्वांच्या अंगी काही चांगल्या सवयी बनवल्या. त्यापैकी एक म्हणजे ‘कोणतीही गोष्ट जेव्हाच्या तेव्हा आणि तिथल्या तिथे’ ठेवण्याचे संस्कार त्यांनी सर्वांवर केले. त्याचबरोबर हिशोब व्यवस्थित ठेवणे, बँकेच्या नोंदी वेळच्यावेळी लिहिणे ही सवय दादांनीच लावली. चांगल्या वस्तुंचा संग्रह करणे, शेती उपयोगी गोष्टींचा संग्रह करणे. गाडीसाठी लागणारे पान्हे, शेती उपयुक्त वस्तू म्हणजे रोटर, हरळी कटर मशीन आशा गोष्टी खरेदी कराव्यात तर दादांनीच. 

दादांची दूरदृष्टी तर इतकी की विचारता सोय नाही. शेतकरी बांधवांना सोबत घेऊन, त्यांना एकत्र करून शेतीमध्ये पाण्याची पहिल्यांदा लिफ्ट आणली ती दादांनी. दादा शेती तज्ज्ञ होते. काही दिवसांनी त्यांच्या लक्षात आले की, आपल्या मागे या पोरीला म्हणजे मला शेती जमणार नाही. म्हणून त्यांनी आमच्या शेतीत चिकू, नारळ, सीताफळीच्या बागा केल्या आणि माझी शेतीविषयक चिंता दूर केली. मला ते नेहमी सांगत, घरामागील जी मोठी विहीर आहे, ती मी आणि सखा दोघांनी मिळून बांधली. दूरदृष्टीचे दुसरे उदाहरण म्हणजे माझे ग्रॅज्युएटचे सर्टिफिकेट हे सौ. छाया उदयराव पाटील या नावानेच मिळावे म्हणून त्यांनी मोठ्या तत्परतेने माझे नाव सरकारी गॅझेटमध्ये बदल करून घेऊन सौ. पाटील या नावाने मला मिळवून दिले. सगळ्या कामात पारंगतता असायची. नसली तर ती अभ्यासपूर्ण माहिती घेऊन मिळवायची व यश संपादन करायचे याकडे त्यांचा कल असे. आमच्या दादांना कोणतीही गोष्ट जमत नसायची असे नाही. ते all in one होते, असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. म्हणूनच की काय अखेरचा निरोपही आम्हाला कोणालाही कशाचाच त्रास न होऊ देता त्यांनी घेतला व आयुष्याच्या शेवटच्या प्रक्रियेतही ते माहीर ठरले. जगात म्हण आहे 

मातृ देवो भव । पितृ देवो भव ।। 

यापुढे जाऊन मी म्हणेन 

सासरे देवो भव । सासु देवो भव ।। अशी उक्तिसुद्धा जोडायला हवी. 

माझे सासरे व सासू यांना माझं शतशः नमन

Read more at Karmayogeee

]]>
https://karmyogee.com/Karmyogee/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%8b-%e0%a4%ad%e0%a4%b5/feed/ 0