001
003
002

"झाले बहु। होतील बहु । परंतु या सम हा ||" या उक्ती प्रमाणे मा. आमदार शिवाजीराव (दादा) पाटील यांनी आपले संपूर्ण जीवन शिक्षक, विद्यार्थी, शेती, शेतकरी, शेतक-यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, समाजाची शैक्षणिक प्रगती व शैक्षणिक विकास यासाठीच वेचले. त्यांचीच ही अखंड संघर्षमय जीवनयात्रा अधोरेखित करणारा त्यांचा हा स्मृतिग्रंथ आहे. कर्मयोग' या शब्दाचा व्युत्पत्यर्थ 'कर्माची युक्ती' किंवा 'कर्माची कुशलता' असा आहे. कोणतेही युक्त कर्म करण्याचा मार्ग किंवा पद्धती म्हणजे कर्मयोग होय. आणि ही पद्धती, मार्ग अवलंबिणारा खरा 'कर्मयोगी' होय. दादांनी तर नेहमी कर्मातच योग शोधला आणि योगालाच कर्म मानले. म्हणूनच दादा खऱ्या अर्थाने 'कर्मयोगी' ठरले. त्यांनी जीवनभर माणसे जमवली, कमवली व जोडली. संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वभावगुण, नैपुण्य, विशेषत्व शोधून, त्याला आकार देऊन त्याचे जीवन विकसित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सहकाऱ्यांनी आपल्यावर विश्वास टाकून आपल्याला निवडून दिले आहे, आज आपण जे काही आहोत ते त्यांच्याचमुळे आणि हे त्यांचे ऋण मानून ते ऋण फेडण्यासाठी ते आयुष्यभर लढत राहिले. आजच्या प्रदर्शनमयी, मुखवट्याच्या दिखाऊ युगात आप्तेष्ट व मित्रांवर निखालस पण मूकं प्रेम करणारे दादा एक वेगळेच व्यक्तिमत्व जाणवते. म्हणून त्यांचा हा स्मृतिग्रंथ आजच्या काळात विशेष महत्त्वाचा ठरतो. म्हणून आजच्या या आधुनिक युगात शिक्षक, पालक, विद्यार्थी, नव्याने नेतृत्व करू इच्छिणारे नेते, कार्यकर्ते या सर्वांच्या दृष्टीने हा ग्रंथ म्हणजे एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. तो प्रत्येकाला दिशादर्शक व मार्गदर्शक ठरेल असा हा बहुमोल ग्रंथ आहे.

ABOUT US

कर्मयोगी आमदार शिवाजीराव पाटील

आमदार शिवाजीराव पाटील यांच्या स्मृति ग्रंथाची डिजिटल टेक्स्ट वाचण्यासाठी समोरील बटन वरती क्लिक करा
front page